Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्यटकांच्या सुविधांचा दुष्काळ

$
0
0
महाबळेश्वरमधील वाढत्या पर्यटकांच्या संख्येचा ताण तेथील हवामानाबरोबरच स्थानिक सोयी-सुविधांवरही पडत आहे. हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यात आल्याने परिसरातील विकासकामांवरही बंधने आली आहेत.

स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’ने शहरातील हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला असून स्वाइन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वीसवर पोहोचली आहे. शहरात नव्याने सात जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यातील तीन पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत.

नगरसेवकांविरुद्धच्या कारवाईस मंजुरी

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड आणि मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे यांच्याविरोधात कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये माहिती सादर करण्यास सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

राज्यात सुरू होणार स्वयंअर्थसहाय्यित शाळा

$
0
0
राज्यात महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियमानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०१३-१४) नवीन शाळा सुरू करण्यासाठी सरकारकडे काही प्रस्ताव दाखल झाले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली.

‘जीआर’च्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचे शटर बंद

$
0
0
स्थानिक संस्था करातील (एलबीटी) काही तरतुदींबाबत मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात केलेल्या घोषणेचा शासन निर्णय (जीआर) त्वरीत काढण्याच्या मागणीसाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ‘बंद’ला सोमवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

विद्यापीठात स्वतंत्र विद्यार्थी सुविधा केंद्र

$
0
0
पुणे विद्यापीठात स्वतंत्र विद्यार्थी सुविधा केंद्र उभारण्यास मॅनेजमेंट कौन्सिलने सोमवारी हिरवा कंदील दाखविला. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट सिस्टिम लागू करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. मॅनेजमेंट कौन्सिलची सोमवारी बैठक झाली.

अक्षयराजची निव्वळ आश्वासनावर बोळवण

$
0
0
बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रँडमास्टर किताब पटकाविणाऱ्या अक्षयराज कोरेची सोमवारी राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निव्वळ आश्वासनांवर बोळवण केली.

‘जाड पडताळणी ३१ मे पर्यंत पूर्ण करू’

$
0
0
राज्यात जात पडताळणीचे एक लाख २० हजार अर्ज प्रलंबित असून ते ३१ मे पर्यंत निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिले आहे. ही माहिती आमदार जयदेव गायकवाड यांनी दिली.

स्वारगेट उड्डाणपुलाला हिरवा कंदील

$
0
0
वाजवीपेक्षा अधिक खर्चामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या स्वारगेट उड्डाणपुलाच्या प्रस्तावास अखेर स्थायी समितीने सोमवारी मान्यता दिली.

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने भोसरी ‘एमआयडीसी’ परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड केले. या टोळीने विश्रांतवाडी, आळंदी, चाकण या ठिकाणी महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

‘मार्ड’चा पुण्यात तूर्त संप नाही

$
0
0
राज्यातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना (मार्ड) स्टायपेंड वाढवून मिळावा, यासाठी मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये आजपासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या संपात तूर्त आमचा सहभाग नाही, असे ससून हॉस्पिटलमधील ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी सोमवारी स्पष्ट केले.

कल्याणी देशपांडेला पोलिस कोठडी

$
0
0
मुंबईतील एका तरुणीला मॉडेलिंगचे काम देण्याचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या कल्याणी देशपांडे हिला बुधवारपर्यंत (ता. २५) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कारचालकांवर कारवाई सुरूच

$
0
0
शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्यांवर सोमवारीही कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी दिवसभरात १०२ कारचालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दहा हजार दोनशे रुपयांच्या दंडाची वसुली केली.

मिलिंद जोशींनी राजीनामा दिला नव्हे; घेतला

$
0
0
बनावट पत्र आणि बनावट सहीद्वारे महामंडळाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले असले, तरी तरुण वयातील कारकीर्दीवर परिणाम होऊ नये, यासाठी राजीनामा घेऊन प्रा. जोशी यांना अभय देण्यात आल्याचे साहित्य परिषदेतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

चित्रपटात ‘साउंड’ची भूमिका महत्त्वाची

$
0
0
‘भारतीय चित्रपटसृष्टी फारच भन्नाट आहे. संगीत, नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख संगम भारतीय चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो. परदेशी चित्रपटांइतकेच उत्तम तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञही वापरतात.

सहल घोटाळ्यावरून पालिकेच्या सभेत वाद

$
0
0
शिक्षण मंडळातील सहल घोटाळ्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी तब्बल दीड तास गदारोळ झाला. अखेर या गैरप्रकारांना जबाबदार असलेल्या सदस्यांवर कारवाईसाठी राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, असा अहवाल पाठविल्याचे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी स्पष्ट केले.

‘निवडणुकीच्या परीक्षेसाठी ‘राष्ट्रवादी’ची पूर्वतयारी

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात लढविलेल्या मतदारसंघांतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत येत्या २६ आणि २७ एप्रिलला या पक्षाने बैठक आयोजित केली आहे.

चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0
बदलीच्या चर्चेला न जुमानता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या पाच कार्यकारी अभियंत्यांच्या सोमवारी (२२ एप्रिल) तडकाफडकी बदल्या केल्या. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

एमपीएससीची १८ मे रोजी परीक्षा

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता १८ मे रोजी होणार आहे. मात्र, याच दिवशी इंजिनीअरिंग; तसेच अन्य शाखांच्या अनेक उमेदवारांच्या इतर परीक्षाही असल्याने त्यांनी नेमक्या कोणत्या परीक्षेला बसायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे.

चाऱ्यासोबत पशुखाद्य देणार

$
0
0
दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये आता चाऱ्यासोबतच पौष्टिक पशुखाद्यही पुरविण्यात येणार आहे. यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घेतला असल्याचा निर्णय नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images