Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अतुल दाते यांच्या दोन सीडींचे प्रकाशन

$
0
0
‘कलेची ओढ ही जातिवंत कलाकारालाच असते. त्यामुळे भवतालच्या बाजारू वातावणात प्रेक्षकांचा अनुनय न करता ध्येयानं वेगळे काम करणे महत्त्वाचे आहे,’ अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी व्यक्त केली.

मंदिरे, लेणी, चौकीवर 'हेरिटेज'ची 'गुढी'!

$
0
0
पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये (हेरिटेज) आता मंदिरे, लेण्यांबरोबरच पोलिस चौकी, हॉटेल्सचीही भर पडली असून ८५ ठिकाणांना महापालिकेने अधिकृतपणे 'हेरिटेज'चा दर्जा दिला आहे. पांचाळेश्वर मंदिर, पांडव लेणी यांच्यासह शहरातील २८ मंदिरांचा त्यामध्ये समावेश आहे.

'स्वारगेट'च्या विस्तारासाठी जागेची चाचपणी

$
0
0
स्वारगेट बसस्थानकावरील वाहतूक कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने शंकरशेठ रोडवरील एसटीच्या जागेमध्ये स्थानकाचा विस्तार करणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू केली आहे.

सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पातील पाण्याला शेतीचा वीजदर

$
0
0
शहरातील सांडपाणी शुद्ध करून कालव्याद्वारे शेतीसाठी पुरविण्यात येणार असल्यामुळे या प्रकल्पासाठी शेतीच्या दराने वीजदर आकारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच पुणे महापालिकेस केल्या आहेत.

ईशान्य भारतातील शाळांसाठी विवेकानंद केंद्राची हाक

$
0
0
विवेकानंद केंद्रातर्फे ईशान्य भारतात चालविण्यात येणाऱ्या शाळांकरिता पदवीधर स्वयंसेवकांची गरज असून, त्यासाठी या केंद्राचे पथक या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात येत आहे. हे पथक पुण्यात ३० एप्रिल रोजी येणार आहे.

गुंठेवारी कायदा पुन्हा लागू करण्याची मागणी

$
0
0
बारामती नगरपरिषदेने गुंठेवारी बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हजारो बांधकामेही नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तीन दिवसांत ब्रॉडबँड कनेक्शन

$
0
0
गेल्या वर्षभरात चार नवीन एक्सेंजच्या माध्यमातून भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ब्रॉडबँड सेवेचा विस्तार केला आहे. त्यामुळे, यापुढे ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तीन दिवसांत ब्रॉडबँडचे कनेक्शन मिळू शकणार आहे.

सौंदर्य बघा; पण क्लिक करू नका!

$
0
0
जपानी शैलीनुसार साकारण्यात आलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानातील लँडस्केप सौंदर्याचा आनंद घ्या, निवांत वेळ बसा पण उद्यानाचे फोटो मात्र काढू नका... असा अजब नियम घालून महापालिकेच्या उद्यान विभागाने फोटोग्राफीवर बंदी आणली आहे.

सिम्बायोसिसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघा विद्यार्थ्यांची २३ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघा आरोपींनी दोन्ही विद्यार्थ्यांना बनावट पावत्या दिल्या असून, त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रिक्षा बंद टाळण्यासाठी मोहन जोशींचा पुढाकार

$
0
0
रिक्षा चालकांवरील नवीन नियम, ई-मीटर आणि इतर प्रलंबित प्रश्नासाठी रिक्षा चालक मालक संघटनेने पुकारलेला राज्यव्यापी बंद टाळण्यासाठी आमदार मोहन जोशी आणि परिवहन अधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.

वीणा आणि विजय देव यांना सार्थक पुरस्कार प्रदान

$
0
0
एकमेकांना समजून घेत, एकमेकांना साथ देतानाच परस्परांना प्रोत्साहन देत, आवडीनिवडी जपत आपल्याबरोबरच समाजालाही आनंद देण्याऱ्या परिपूर्ण सहजीवनाची प्रचिती गुरुवारी आली.

उरळीमध्ये कचऱ्याचे ढीगच्या ढीग

$
0
0
उरळी देवाची कचराडेपोत लागलेली आग अद्याप पूर्णपणे विझवणे शक्य झालेले नाही. येत्या दोन दिवसांत आग विझवली गेली नाही, तर शहरात कचऱ्याचा प्रश्न उग्र बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेपोमध्ये येणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे ८० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत असून, उर्वरित कचऱ्याचे ढीग साठू लागले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान परिषदेची कार्यशाळा

$
0
0
मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विज्ञान-तंत्रज्ञानविषयक एकदिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, येत्या २० आणि २७ एप्रिल रोजी ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रचनेतून नवरचना’ ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

महात्मा फुले जयंती उत्साहात

$
0
0
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संस्था संघटनांनी फुले यांना अभिवादन केले. संस्थांतर्फे दिवसभर प्रबोधनपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाल्यांचा मार्ग बदलण्याचा पालिकेचा अधिकार रद्द करा

$
0
0
शहरातील नाल्यांचे ‘प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट’ या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. मात्र, विकास नियंत्रण नियमावलीतील रिक्वार्यमेंट ऑफ साइटमधील तरतुदीमुळे नाल्यांचा मार्ग बदलण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहे.

शि.प्र.मंडळीला दिलेल्या जागेचे वाटप रद्द

$
0
0
चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर येथील शैक्षणिक भूखंडाचा वापर विहित मुदतीत सुरू न केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शिक्षण प्रसारक मंडळीस दिलेल्या जागेचे वाटप रद्द केले आहे.

शहराध्यक्षपदाचा पाळणा आठवडाभरात हलणार

$
0
0
प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया सुरू होणार असून महिन्याभरात शहराध्यक्षांची निवड होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात बदललेल्या समीकरणांचे पडसाद पुण्यातही उमटण्याची जोरदार चर्चा आहे.

हार्डवेअरमध्ये आघाडीची संधी जनता राजवटीमुळे गमावली

$
0
0
जनता सरकारने १९७७ मध्ये परकीय कंपन्यांना देशाबाहेर काढण्याची भूमिका घेतल्यामुळे 'आयबीएम'सारख्या कंपन्या देशातून बाहेर गेल्या. त्याचे परिणाम भारत अजूनही भोगत आहे. हा दुर्दैवी निर्णय घेतल्यामुळेच भारत हार्डवेअरच्या क्षेत्रात मागे पडला, अशी खंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केली.

बलात्कारीत मुलींची संख्या तीनवर

$
0
0
नारायणगावजवळील नगर-कल्याण रस्त्यावर एका अपंग कल्याण केंद्रामध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पीडित मुलींची संख्या तीन झाली आहे. यातील एका मुलीने काही महिन्यांपूर्वीच अत्याचार होत असल्याची तक्रार शाळेकडे केली होती.

आठ ‍वर्षांच्या मुलीचे अपहरण; सुटका

$
0
0
मिठानगर येथून एका आठ वर्षांच्या लहान मुलीचे बुधवारी दुपारी दुचाकीस्वाराने अपहरण केल्याचा प्रकार घडला. या मुलीला येवलेवाडी येथे सोडून देण्यात आले होते. स्थानिकांनी नियंत्रण कक्षात फोन करून माहिती दिल्याने ती चिमरुडी आपल्या घरी सुखरूप पोहोचली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images