Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिर्के खून खटल्यात निकम सरकारी वकील

0
0
शुभम शिर्के या विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी आरोपींवर कोर्टात आरोप दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नववीतील विद्यार्थ्यांमध्ये कोयत्याने हाणामारी

0
0
बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी दोघा विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केले आहेत. एका विद्यार्थ्याला पाच टाके पडले असून त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जादूटोणाविरोधी कायद्याला यंदाच्या अधिवेशनाचे आश्वासन

0
0
सध्या सुरु असणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनातच जादूटोणाविरोधी कायदा करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कळवले आहे.

मित्राच्या खूनप्रकरणी सातवर्षे सक्तमजुरी

0
0
घरातील कामे करत नाही तसेच सतत मोबाइलवर गप्पा मारुन झोपमोड करतो या कारणावरुन चिडून मित्राचा खून केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या फिल्म्ससह तंत्राचा मास्टरक्लास

0
0
विद्यार्थ्यांच्या फिल्म्स, त्यांच्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा ‘मास्टरक्लास’, तंत्र आणि अर्थ यासह इतर पूरक बाबींचे मार्गदर्शन आणि ‘विझड्म ट्री’खाली देशातील इतर फिल्म स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी पहिल्या राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात उपलब्ध होणार आहे.

नगरसेविका बहिरट यांचे सदस्यत्व रद्द

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर मुंबई हायकोर्टाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. त्याबरोबरच खोटी याचिका दाखल केल्याबाबत त्यांना २५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

महापौर निवासस्थानी पाण्याची मोठी गळती

0
0
घोले रोडवरील महापौर निवासस्थानासमोरील रस्त्यावर बुधवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या संदर्भात भारतीय किसान संघाचे अरविंद जाधव यांनी ‘मटा’ला माहिती दिली.

अनधिकृत बांधकामांविरुद्ध पुन्हा कारवाई

0
0
मुंब्र्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. बुधवारी बाणेर, मुंढवा आणि घोरपडीगाव परिसरातील इमारती पाडण्यात आल्या.

आला, आंबा आला

0
0
पुणेकरांना पाडव्याला आंब्याची चव चाखता यावी, यासाठी मार्केट यार्डात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आडते असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते झाले.

‘आरटीओ’च्या कारवाईला वेग

0
0
रिक्षा चालकांवर सुरू करण्यात आलेल्या कारवाईचा जोर बुधवारी कायम होता. ‘आरटीओ’कडून दिवसभरात ७० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम १३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचे ‘आरटीओ’चे प्रमुख अरुण येवला यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांचा ‘यू-टर्न’!

0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी नदीपात्रात दीर्घकाळ चालणाऱ्या सर्कस अथवा प्रदर्शनांसारख्या इव्हेंटला परवानगी न देण्याचा वाहतूक पोलिसांना निर्णय अल्पकाळच टिकला.

कचरा डेपोतील आग भडकली

0
0
उरळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेली आग तीन दिवस उलटून गेले, तरी विझत नसल्याने महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाची दमछाक झाली आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार

0
0
नारायणगावजवळील नगर-कल्याण रस्त्यावर एका अपंग कल्याण केंद्रामधील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. शाळेतील शिपायानेच हे कृत्य केले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पिण्याचे पाणी पळवू नका

0
0
‘उजनी धरणात पाणी सोडताना खडकवासला प्रकल्पातील पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याला धक्का लागला नसला, तरी उन्हाळ्यातील संभाव्य संकट अद्याप टळलेले नाही.

भामा-आसखेड, आंद्रचे पाणी उजनीत

0
0
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे जिल्ह्यातील भामा-आसखेड व आंद्र धरणांतून उजनी धरणात चार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

पुण्यात उत्साहाची गुढी!

0
0
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर घर, सोने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कार-बाइक, फॅशनेबल कपडे खरेदीसाठी बुधवारी बाजारपेठ फुलून गेली.

जातिअंतासाठी विद्यार्थ्यांचा जागर

0
0
भारतीय समाजरचना ही जातींची श्रेणीबद्ध उतरंड असून, हीच उतरंड दलितांच्या प्रगतीला मारक आहे, या भूमिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्थेविरोधात लढा उभारला. डॉ. आंबेडकरांनी 'अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकातून या व्यवस्थेचे दाहक वास्तव विशद केले आहे.

सेट-नेट पात्रता मिळविण्यासाठी मुदतवाढ?

0
0
बिगर सेट-नेट प्राध्यापकांना पात्रतेतून सूट न देता, त्यांना अशी पात्रता मिळविण्यासाठी आणखी तीन वर्षांची मुदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा मानस राज्याच्या उच्च आणि तंत्रशित्रण विभागाने दर्शविला आहे.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विघ्नहर्ता भोजन प्रसाद

0
0
दुष्काळी भागातील मात्र, पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अखिल मंडई मंडळाने सुरू केलेली विघ्नहर्ता भोजन प्रसाद योजना मंगळवारपासून सुरू झाली. येत्या जूनअखेरपर्यंत योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोज दहा रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे.

रेडिएशन पातळी तपासणीची सक्ती हवी

0
0
शहरातील अनधिकृत मोबाइल टॉवर्स नियमित करण्यापूर्वी इमारतींची स्ट्रक्चरल तपासणी आणि त्या टॉवरची रेडिएशन पातळी तपासणीचे प्रमाणपत्रही सक्तीचे करण्यात यावे, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images