Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

...तर पेपर तपासणीही योग्य नियोजनानुसार करू

0
0
प्राध्यापकांचा बहिष्कार असतानाही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत सुरू करण्याचे आव्हान पेलणाऱ्या पुणे विद्यापीठाने आता पेपर तपासणीचेही आव्हान पेलण्याची तयारी सुरू केली आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाई प्रभागनिहाय

0
0
अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभाग यांच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या पद्धतीत बदल करून आता प्रभागनिहाय कारवाई होणार आहे. या पद्धतीचा आराखडा तयार झाला असून, येत्या दोन दिवसांनी कारवाईला सुरुवात होणार आहे.

प्रॉपर्टी टॅक्स चुकविणा-याचे नाव फक्त SMS करा

0
0
निवासी जागेचा वापर बिगरनिवासी करणारे किंवा भोगवटापत्र न घेता घराचा वापर करणाऱ्या प्रॉपर्टीधारकांकडून टॅक्स वसूल करण्यासाठी करआकारणी आणि करसंकलन विभागाने नवी योजना आखली आहे.

तापमान आणखी वाढणार

0
0
शहर आणि परिसरात सोमवारी उन्हाचा चटका वाढला असून, ३८.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातही सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली आहे.

आरक्षित जागा ताब्यात मिळेना

0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या १९८७च्या विकास आराखड्यात दर्शविलेल्या ४७ प्रकारच्या आरक्षणांपैकी २१ प्रकारांच्या आरक्षणांच्या जागा ताब्यात घेण्यात महापालिकेस शून्य टक्के यश मिळाले आहे. तसेच २६ प्रकारांच्या आरक्षणांमधील २८ टक्के जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

महागड्या पुलासाठी ‘दादा’गिरी

0
0
महापालिकेती ऐपत नसताना स्वारगेट येथील महागड्या दराचा उड्डाणपूल पुणेकरांच्या गळ्यात मारण्यासाठी राज्य सरकारची ‘दादा’गिरी सुरू झाली आहे. महापालिका स्वतः हे काम सुमारे २५ टक्के कमी खर्चात करण्यास तयार असताना ‘हे काम राज्य रस्ते विकास महामंडळालाच (एमएसआरडीसी) द्यावे,’ असे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सोडले.

स्कॉलरशिप आधारमुळे रखडली

0
0
दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही मार्च अखेरपर्यंत ७२ हजार लाभार्थ्यांपैकी केवळ ९ हजार ४४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ‘कॅश ट्रान्सफर’ करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

‘एलबीटी’ची चर्चा फिसकटली

0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधातील व्यापारी आणि मु्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील चर्चा सोमवारी फिसकटली. ‘कोणत्याही परिस्थितीत ‘एलबीटी’ रद्द होणार नाही,’ अशा भूमिकेवर राज्य सरकार ठाम राहिले.

फाशीला विरोध करणाऱ्याना फटकारे

0
0
पुण्याच्या रस्त्यांवर भरधाव एसटी चालवत नऊ जणांना चिरडणारा आणि ३७ जणांना जखमी करणारा माथेफिरू बसचालक संतोष माने याला जिल्हा सेशन कोर्टाने सोमवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयाने फाशीला विरोध करणाऱ्या मानवाधिकारवाल्यांनाही फैलावर घेतले.

हिंदू महासभा निवडणुकीच्या रिंगणात

0
0
‘अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे २०१४ ची लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार आहे. हिंदूंच्या अधिकारांच्या रक्षणासाठी महासभेतर्फे ही निवडणूक लढविण्यात येणार आहे,’ अशी माहिती महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. राकेश रंजन यांनी दिली.

पिण्याचे पाणी बांधकामाला नाही

0
0
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर समस्या भेडसावत असल्याने बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले आहे.

हद्दीबाहेरही ‘एलबीटी’

0
0
महापालिका हद्दीबाहेर गोडाउन असलेल्या मात्र, शहरात वाहनांची विक्री करणाऱ्या डीलर्सनी ‘एलबीटी’ भरल्याची खातरजमा करूनच वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना प‌िंपरी- चिंचवड महापालिकेने पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (पिंपरी) दिल्या आहेत.

दोन लाखांच्या औषध विक्रीस मनाई

0
0
विविध कंपन्यांच्या खोकल्याच्या औषधांवरील लेबलमध्ये जनरिक नावाचा उल्लेख नसल्याने सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या औषधांच्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे.

सिंहगड रोडवरील अपघातात दुचाकीस्वार ठार

0
0
सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सायकलस्वार मुलाला चुकविण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर डोके आपटल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

चैत्यभूमी स्मारकाचा आराखडा तयार

0
0
इंदू मिल येथील साडेबारा एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आं‌तरराष्ट्रीय स्मारकाचे संकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.

गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा

0
0
खराडीतील जमिनीप्रकरणी अतुल गोयल यांच्यासह आठ व्यक्तींविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेचे पंधरा वर्षांपूर्वी बनावट मान्यतापत्र तयार करून जमिनीची खरेदी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

औरंगाबादच्या तरुणाचा झाला होता एन्काउंटर

0
0
मुळचा बीड येथील; मात्र औरंगाबाद येथे स्थायिक झालेला एक तरुण काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर घुसखोरी करताना २००७मध्ये झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गरवारे बालभवनसाठी टेंडर प्रक्रिया

0
0
गरवारे बालभवन हा महापालिकेकडून संयुक्त प्रकल्प म्हणून राबवला जाणार असून, टेंडर प्रक्रिया राबवूनच हा प्रकल्प चालवण्यासाठी खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.

‘जातपडताळणी’तील दोघांना अटक

0
0
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या समाज कल्याणामधील कंत्राटी कामगारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

‘जहांगीर’च्या दोघांना अटक

0
0
जहांगीर हॉस्पिटल येथे अॅडमिट झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य योजनेतून आलेल्या पैशांचे वाटप न करता चार लाख १५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हॉस्पिटलच्या दोघा कर्मचाऱ्यांना कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images