Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नऊ एप्रिलला बँकाचा बंद नाही

0
0
‘एलबीटी’ आणि रुपी बँकेवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी सध्या कोणत्याही स्वरुपाच्या बंदमध्ये पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका सहभागी होणार नाहीत.

‘मल्टिप्लेक्स’ला ७१ कोटींचा दणका

0
0
प्रेक्षकांना दिलेल्या करमणूक करमाफीचे पैसे स्वतःच्या खिशात घालणाऱ्या शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटर्सकडून ७१ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यापाऱ्यांचा 'बंद' स्थगित

0
0
जाचक अटींमधून मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा, अशा सरकारच्या दुहेरी पावलांमुळे एलबीटीच्या विरोधात गेले सहा दिवस सुरू असलेला बंद व्यापाऱ्यांनी स्थगित केला.

निसर्गसंपन्न पुणं

0
0
शहर कोणतेही असले तरी त्याच्या भौतिक विकासाचा पाया हा नेहमी पर्यावरण असतो. पुण्याला उत्तम जैवविविधतेचे वरदान मिळाले आहे. परंतु, अलीकडे गंभीर समस्याही पुढे येत आहेत. शहराच्या प्रगतीचे आव्हान स्वीकारायचे असेल, तर त्यासाठी पुण्याच्या जैवविविधतेची ही ओळख जपायलाच हवी.....

पुण्याच्या रस्त्यांवर धावत होता ‘मृत्यू’!

0
0
एका माथेफिरू एसटी ड्रायव्हरने स्वारगेट एसटी स्थानकातील बस पळवून बेधुंद संचार करीत नऊ निष्पापांचा बळी घेत ३७ नागरिकांना जखमी केले.... रस्त्यावरील नागरिकांसह दुचाकी, रिक्षा, चारचाकी मोटारींचा चुराडा करत अक्षरशः त्याने रक्ताचा सडा अंथरला... सकाळी आठच्या सुमारास रस्त्यांवर बाहेर पडलेले चाकरमाने, महाविद्यालयीन तरुण, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूची जणू होळीच त्याने खेळली.

माझे पर्यावरण

0
0
भविष्यात पुण्याचा विकास होणारच आहे, तो कोणी थांबवू शकणार नाही. परंतु, सुखकर भविष्यासाठी गरज आहे नियोजनाची. यासाठी केवळ प्रशासन नव्हे तर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

दर्जेदार पाठ्यपुस्तकांसाठी नॅशनल टेक्स्टबुक कौन्सिल?

0
0
शासकीय यंत्रणेबाहेरच्या शाळांची पाठ्यपुस्तके आणि त्याला पर्याय म्हणून उपलब्ध पुस्तकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नॅशनल टेक्स्टबुक कौन्सिल’ या यंत्रणेची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे.

पाडव्याला उभारा ‘आंब्याची गुढी’

0
0
गुढीपाडव्याच्या तोंडावर आंबा पुन्हा स्वस्त होऊ लागला आहे. मुख्यत: रत्नागिरी हापूसचा भाव उतरला आहे. एप्रिलच्या प‌हिल्या आठवड्यातच फळ बाजार आंब्यांनी बहरू लागला असून, आता तयार आंबा बाजारात दाखल झाला आहे.

कोथींबीर, मेथी आटोक्यात

0
0
उन्हाचा कडाका वाढला असूनही बाजारात भाज्यांची पुरेशी आवक होत आहे. बंदच्या भीतीमुळे भाज्यांना मोठी मागणी असली, तरी अद्याप भाव टिकून आहेत. कोथींबीर, मेथीचे भाव आटोक्यात असून, गवार मात्र महागली आहे.

खरेदीच्या धडाक्यामुळे वाहतूक ‘आडवी’

0
0
मंगळवारपासून व्यापारी पुन्हा संपावर जातील की काय, अशी भीती वाटल्याने जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी एकच गर्दी केलेल्या नागरिकांमुळे मार्केटयार्डसह शहर व परिसरातील सर्वच बाजारपेठांमधील वाहतूकव्यवस्था रविवारी कोलमडली.

जीवनावश्यक खरेदीसाठी ‘युद्ध अमुचे सुरू...’

0
0
व्यापारीवर्गाने सहा दिवस वेठीस धरल्यानंतर अखेर शनिवारपासून शहर व परिसरातील दुकाने उघडू लागली आणि रविवारच्या सुटीचे निमित्त साधून सर्वसामान्य नागरिकांनी जीवनावश्यक खरेदीसाठी एकच गर्दी केली.

प्रतिज्ञापत्र सादर करा

0
0
‘राज्य सेवा पूर्वपरीक्षेपासून एकही उमेदवार वंचित राहणार नाही,’ अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) दिले असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी ‘मटा’ला दिली.

सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांनी घेतली विद्यार्थ्यांची ‘विकेट

0
0
परीक्षेचे स्वरूप बहुतांशी पूर्वीच्या ‘एआयईईई’प्रमाणेच राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी पहिली ‘जेईई-मेन्स’ पूर्णपणे ‘गुगली’ नव्हती. मात्र, विषयाशी संबंधित; पण सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्नांनी विद्यार्थ्यांची ‘विकेट’ काढली.

‘डीपी’तील तरतुदी अगम्य

0
0
‘विकास आराखडा तयार करताना सामान्य नागरिकांचा विचार करण्यात आलेला नाही. केवळ बिल्डरधार्जिण्या विकास आराखड्यातील अनेक तरतुदी अगम्य आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांवर तिप्पट कर आवश्यक

0
0
देशातील ग्रामीण जनतेचा विशेषतः महिलांचा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर भर असल्याने तंबाखूजन्य पदार्थांवर तिप्पट कर लावावा, अशी विनंती ‘टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर’चे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी राज्य सरकारला केली आहे.

नोकरदार होताहेत ताणतणावाचे बळी

0
0
बेभरवशाची नोकरी, घरापासून दूर राहाण्याची आलेली वेळ, प्रचंड कष्ट उपसूनही नोकरीत मिळणारे असमाधान, कमी पगारामुळे कुटुंबीयांच्या इच्छा पूर्ण न झाल्याने अपेक्षाभंग.. अशा प्रतिकूल परिस्थितीत नोकरदार मानसिक ताण-तणावाला बळी पडत आहेत.

‘एलबीटी’ची किमान मर्यादा वाढणार?

0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) मुद्यावर उद्या (सोमवारी) राज्य सरकारच्या पातळीवर काही बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एलबीटीच्या नोंदणीसाठी उलाढालीची किमान मर्यादा वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून तसे झाल्यास छोट्या व्यापाऱ्यांची नोंदणीतून सुटका होण्याची आशा आहे.

राज्यभरात उकाड्यात वाढ

0
0
राज्यभरात उन्हाचा चटका वाढला असून, बहुतांश शहरात पारा ४० अंशांच्या पुढे पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली. शहरात ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

चांदीच्या विटा चोरणारा गायबच

0
0
स्वारगेट पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून गायब झालेल्या चांदीच्या चार विटा तीन वर्षांपासून सापडलेल्या नाहीत. चोराने खऱ्या विटांऐवजी नकली विटा ठेवल्या आणि पोलिस ठाण्यातच चोरी केली.

टँकरच्या दरात ३०० रुपयांची वाढ

0
0
शहराच्या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे नवे दर जाहीर झाले असून पूर्वीच्या तुलनेत त्यामध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या काही काळात टँकरचालक मनमानी पद्धतीने दर आकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने हे दर जाहीर करण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images