Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आगीचे कारण अस्पष्टच

0
0
कोथरूड येथील सुतार दवाख्यानासमोरील त्रिमूर्ती हाइट्स या सात मजली इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. पोलिसांनी स्थानिकांकडे चौकशी सुरू केली आहे, तर महावितरण कंपनीच्या निरीक्षकांनी पाहणी केली आहे.

गटाराच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0
0
पावसाळी गटारांच्या कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून भवानी पेठेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. जुना मोटार स्टँड परिसरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

मीरा बोरवणकरांच्या मुलाला मारहाण

0
0
कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालक, पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मुलाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांना चतृ:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, जामिनावर सुटका झाली आली आहे.

येत्या १५ व १६ एप्रिलला रिक्षा संघटनांतर्फे ‘बंद’

0
0
थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या मुद्द्यावरून ‘बेमुदत बंद’च्या तयारीत असलेल्या रिक्षा संघटनांनी आता येत्या १५ आणि १६ एप्रिलला बंद पुकारला आहे. ‘बंद’मध्ये राज्यभरातील रिक्षाचालक सहभागी होणार असून, या काळात आमदारांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘चार एफएसआय’चे नियंत्रण हवे

0
0
अत्यंत खर्चिक अशा मेट्रो प्रकल्पाला आधार देण्यासाठी मेट्रो कॉरिडॉरमध्ये चार एफएसआयची खैरात करण्यात येणार आहे. या वाढीव एफएसआयमुळे या परिसरात सिमेंट-कॉँक्रिटचे जंगल उभे राहणार आहे.

चांदेरे बंधूंवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0
0
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या दोघा मुलांसह पाच आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बाणेर येथील पेट्रोलपंपासमोर मंगळवारी सायंकाळी एका वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

२८ मार्चपासूनचा बेमुदत बंद मागे

0
0
‘लोकल बॉडी टॅक्स’च्या (एलबीटी) निर्णयाला स्थागिती देण्याची विनंतरी मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर व्यापारी नमले आहेत. २८ मार्चपासून पुकारलेला बेमुदत बंद ‘द पूना मर्चंटस चेंबर’ने मागे घेतला असून, १ एप्रिल रोजी लाक्षणिक बंद जाहीर केला आहे.

आजच्या मुहूर्तावर अखेर जुन्या ‘डीपी’चे प्रकाशन

0
0
अनेक वादविवाद आणि प्रशासकीय-राजकीय प्रक्रियांच्या अडचणींमधून पार होऊन शहराच्या जुन्या हद्दीचा आराखडा (डीपी) आज प्रकाशित होणार आहे. आराखड्याबरोबरच शहराची नवी विकास नियंत्रण नियमावलीही प्रसिद्ध होणार असून, या दोन्हींमधून शहराच्या पुढील वीस वर्षांच्या नियोजनाची दिशाही स्पष्ट होणार आहे.

पा‌लिकेत घोटाळ्यांची मालिका कायम

0
0
शिक्षण मंडळातील सहल घोटाळ्यापाठोपाठ आता महापालिकेत महोत्सव घोटाळा समोर आला आहे. एकाच घरातील संस्थांनी महापालिकेच्या दोन महोत्सवांचे टेंडर खिशात घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे.

सेटटॉप बॉक्स... ७५ टक्के ओके!

0
0
दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिलेल्या सूचनेनंतर शहरातील ७५ टक्के ग्राहकांनी आपल्या टीव्हीला सेटटॉप बॉक्स बसविले आहेत. ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स न लावणाऱ्या ग्राहकांना एक एप्रिलपासून केबल दिसणार नाही. देशपातळीवर सेट टॉप बसविण्याचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे.

कोथरूड येथे पूर्ववैमनस्यातून खून

0
0
कोथरूड येथे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा मंगळवारी मध्यरात्री खून करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘एलबीटी’विरोधकांचा फैसला शनिवारी

0
0
पुणे शहरासह राज्यातील विविध महापालिका शहरांत राज्य सरकारने ‘एलबीटी’ लागू केल्याने त्या विरोधात बेमुदत बंदची हाक देण्यासाठी येत्या शनिवारी (३० मार्च) राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘परीक्षेवर बहिष्कार ही पेशाशी प्रतारणा’

0
0
परीक्षेचे आयोजन हा प्राध्यापकांच्या कामकाजाचाच भाग असल्याने त्यांनी त्याबाबत हयगय करणे म्हणजे आपल्या पेशाशी प्रतारणा करण्यासारखे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

रमाबाईंऐवजी छापला पंडिता रमाबाईंचा फोटो

0
0
रमाबाई महादेव रानडे आणि पंडिता रमाबाई या दोन वेगवेगळ्या विदुषी असल्या, तरी आयसीएसई बोर्डाच्या इतिहास तज्ज्ञांना मात्र त्या एकच असल्याचे दिसते.

ढिगाऱ्यातील अर्ज शोधायचाय?

0
0
अर्जांची कम्प्युटराइज्ड नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘टपाल ट्रॅकिंग सॉफ्टवेअर’मुळे गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या प्रत्येक अर्जाची सविस्तर आणि अद्ययावत माहिती ‘एका क्लिक’वर मिळते आहे.

ब्रिटिश लायब्ररीत मुलांसाठी ‘समर रीडिंग चॅलेंज’

0
0
मुलांना वाचनाची आवड लागावी, त्यांना वाचनाविषयी आत्मीयता वाटावी आणि नेमके वाचावे कसे याविषयी त्यांना सखोल माहिती मिळावी यासाठी ब्रिटिश लायब्ररीने समर रीडिंग चॅलेंज या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.

दिवेगावात ‘आरटीओ’च्या नव्या ऑफिसचा मार्ग मोकळा

0
0
पुरंदर तालुक्यातील दिवेगावात ‘आरटीओ’चे नवे ऑफिस सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गावकऱ्यांनी या निर्णयाला ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला असून, पुढील वर्षभरात ऑफिस सुरू होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, पुणे ‘आरटीओ’तील कामाचा भार हलका होणार आहे.

यूपीएससीची परीक्षा मातृभाषेतूनही

0
0
इंग्रजी आणि हिंदी वगळता इतर भाषांमधून पेपर न देण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला देशपातळीवर झालेला विरोध लक्षात घेत, उमेदवारांसाठी जाचक ठरणारी ही अट बदलून आयोगाने नवी अधिसूचना मंगळवारी जाहीर केली.

‘एसटीआय’च्या निकालाची प्रतिक्षा यादी लावा

0
0
राज्य लोकसेवा आयोगाने नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबरोबरच परीक्षेची प्रतिक्षा यादीही (वेटिंग लिस्ट) त्वरीत जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी लोकसेवा आयोगाकडे केली आहे.

कवी ग्रेस यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम

0
0
अनन्वय फाउंडेशनतर्फे कवी ग्रेस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या (२९ मार्च) सायंकाळी साडे सहा वाजता निवारा वृद्धाश्रम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images