Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुष्काळातील ‘अडचणी’वर मदत गटाकडून मात

0
0
दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये पाण्याचे युद्ध सुरू असताना वैद्यकीय समस्यांनीही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः महिलांच्या आरोग्याशी निगडित समस्या वाढणार असल्याने पुण्यातील दुष्काळ मदत गटातर्फे दुष्काळग्रस्त भागात पुढील चार महिने सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्जात दुरुस्तीची संधी

0
0
‘एमटी-सीईटी’साठी ऑनलाइन अर्ज भरताना ज्या विद्यार्थ्यांकडून नावात, सहीसह फोटो अपलोड करण्यात किंवा जन्मतारीख लिहिण्यात अनावधानाने चूक झाली असेल, त्या विद्यार्थ्यांना ती दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे.

मेट्रो की असमतोल विकासाची गाडी?

0
0
केंद्र व राज्य अर्थसंकल्पामधील तरतुदींचे पाठबळ मिळाल्याने पुण्याच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचा चालना मिळण्याची भाषा केली जात असली, तरी त्यामुळे शहरात विकासाचा असमतोल होण्याची भीती व्यक्त होत आहे.

... आणि अखेर ‘तो’ खाली उतरला

0
0
मालधक्का येथील रेल्वे गोडाउनच्या शेडवर चढलेल्या एका वेड्याने पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांची चांगलीच दमझाक केली. त्याला चाळीस फुट उंच शेडवरून खाली उतरविण्यासाठी नागरिकांनी त्याला झाडावर चढून खाऊ-पिऊ घातले. मात्र, त्याने शेडवरून झाडावर आणि झाडावरून जमिनीवर उडी मारत पळ काढला.

मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी भाषेचा समावेश असला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी पोस्ट ऑफिसच्या बोर्डावर काळे फासल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे नगरसेविका बहिरट अपात्र

0
0
जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वैध नसल्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मंगळवारी देण्यात आला.

होळी पार्ट्यांवर प्रशासनाचे लक्ष

0
0
होळी, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाचा वॉच असणार आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्या पार्टी आयोजकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.

कोथरूडमध्ये आगीचे तांडव

0
0
कोथरुड येथील सुतार दवाख्यानासमोरील त्रिमूर्ती हाईटस या सात मजली इमारतीला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत ४६ दुचाकी, तर चार चारचाकी जळून खाक झाल्या.

जर्मन बेकरी निकाल १५ एप्रिलला

0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मिर्झा हिमायत बेग हा एकमेव आरोपी अटक करण्यात आला असून त्याच्याविरूद्ध् कोर्टात सुरू असलेली सुनावणी नुकतीच संपली आहे. या केसचे कामकाज अंतिम टप्प्यात असून पुढील तारखेला १५ एप्रिल रोजी या केसचा निकाल अपेक्षित आहे.

मीरा बोरवणकरांच्या मुलांना मारहाण

0
0
अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यांना आज दुपारी दोन वाजता शिवाजी नगर कोर्टात हजर केले जाईल. पोलिसांनी मारहाण करणा-यांनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे.

बाबूराव चांदेरे यांच्या मुलांवर गुन्हा

0
0
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या दोघा मुलांसह पाच आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बाणेर येथील पेट्रोलपंपासमोर मंगळवारी सायंकाळी एका वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘नो पार्किंग’पेक्षा अतिक्रमणे हटविण्याची गरज

0
0
फर्ग्युसन रोड आणि जंगली महाराज रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सम-विषम पार्किंगचा उपक्रम, ट्रॅफिक पोलिसांचे पेट्रोलिंग असे उपक्रम राबवणे शक्य आहे.

टेंडर वाद हल्लाप्रकरणी आणखी १ अटकेत

0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या आवारात टेंडरच्या वादातून झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रंगात रंगले पुणेकर

0
0
एकमेकांना रंग लावण्यासाठी होत असलेली धावपळ..., कॉलेज कट्ट्यावर झालेली तरुणाईची गर्दी.., बाइकवरून शहरात फिरणारी मुलांची टोळकी..., आणि रंग लावल्यानंतर होत असलेला जल्लोष अशा उत्साही वातावरणात शहरात बुधवारी धुळवड साजरी करण्यात आली.

कोर्टकचेरीच्या कचाट्यात न अडकता मिटली केस

0
0
व्यवसायातील तीन भागीदारांनी फसविल्यामुळे तो थेट कोर्टात केस दाखल करण्याच्या तयारीत होता. मात्र, कोर्टकचेरीच्या कचाट्यात न अडकता त्याची केस मिटली. त्याला तीन भागीदारांनी एक लाख दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले.

विद्यार्थी योजनांचा बजेटमधून श्रीगणेशा

0
0
स्थानिक विद्यार्थ्यांना संशोधन आणि उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यासोबतच, देशपातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाकडे वळविण्यासाठी विद्यापीठाने नव्या योजना आखल्या आहेत.

रिक्त पदांच्या ५ टक्के अनुकंपा भरतीस मान्यता

0
0
जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयातील रिकाम्या असलेल्या एकूण जागेच्या पाच टक्के जागा अनुकंपा तत्वावर भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्यातील १३४ जागा अनुकंपा पद्धतीने भरल्या जाणार आहेत.

देवराईच्या ‘अपूर्वा’ईची राष्ट्रीय पातळीवर दखल

0
0
देवराई आणि त्यामध्ये आढळणारी जैवविविधता हा पर्यावरण अभ्यासकांसाठी महत्त्वाचा भाग आहे. त्याच वेळी देवराईची स्थानिक समाजावर रुढी- परंपरांच्या माध्यमातून उमटणारी छाप ही सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उल्लेखनीय संशोधन ठरू शकते.

पासपोर्ट केंद्र-पोलिसांत रंगले ‘युद्ध’

0
0
पासपोर्ट प्रक्रियेतील दिरंगाईवरून पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोलिस आयुक्तालयांमध्ये चांगलेच युद्ध रंगले आहे. पासपोर्ट कार्यालय पोलिसांविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केल्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्राने मंगळवारी थेट पोलिसांकडे अडलेल्या अर्जांची सविस्तर आकडेवारीच जाहीर केली आहे.

झेड ब्रिजजवळ दुचाकीस्वाराला लुटले

0
0
झेड ब्रिजजवळ मंगळवारी मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी एका दुचाकीस्वाराला अडवून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावल्याचा प्रकार घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images