Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिसांत तक्रार करा एका SMSवर

$
0
0
पोलिस नियंत्रण कक्षात ‘१००’ नंबरप्रमाणेच आता तक्रारदारांना ‘एसएमएस’द्वारे तक्रार करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील ७७९८१००१०० या मोबाइल नंबरवर यापुढे तक्रार स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली.

अजितदादा धडाडी दाखविणार?

$
0
0
संपूर्ण देशामध्ये क्रीडाक्षेत्राची सूत्रे राजकारणी मंडळींच्या हातात असू नयेत असा सूर लागत असताना महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची (एमओए) सूत्रे मात्र मंगळवारी अधिकृतपणे शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे जात आहेत.

कोथरूडः बिल्डिंगला भीषण आग

$
0
0
पुण्यात कोथरुड येथील त्रिमूर्ती हाइट्स ही सहा मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं परिसरात हाहाकार उडाला आहे. इमारतीत ३० ते ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होतेय.

'त्याने' केली प्रेयसीची हत्या?

$
0
0
पुण्यातील भोसरी परिसरात एका प्रियकराने प्रेयसीला फासावर चढवून मग आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र तसे करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मारहाण करून लुटणारे ३ अटकेत

$
0
0
परिहार चौकातील हॉटेल पेशवासमोर सोमवारी मध्यरात्री दोघा युवकांना मारहाण करत त्यांच्याकडील रक्कम लुटणाऱ्या तिघांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली.

सामूहिक स्थलांतराचा रौप्यमहोत्सव

$
0
0
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील २५ वर्षे यंदा पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांनी ‘मटा’शी केलेला हा विशेष संवाद

‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गाने तिघांचा बळी

$
0
0
‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गामुळे पुणे जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे; तर राज्यात आतापर्यंत राज्यात २०९ जणांना लागण झाली असून, ३२ मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलीवर हल्ला प्रकरणी एकाला सक्तमजुरी

$
0
0
बांधकामावरील मुकादमाने पैसे न दिल्याच्या रागातून त्याच्या मुलीवर कोयत्याने वार करुन तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रेल्वे बजेटमध्ये पुण्याला वीस कोटी

$
0
0
केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वाट्याला २० कोटी रुपयांची रक्कम आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला मिळालेल्या या रकमेमुळे पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन दरम्यान असणारा फुटओव्हर ब्रिज, अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले नवीन डीआरएम ऑफिसचे काम पूर्ण करणे शक्य होणार आहे.

बंधा-यांच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडून १० कोटी रुपये

$
0
0
केंद्र सरकारच्या ‘ट्रिपल आर’ योजनेतून पुण्यातील २४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या बंधाऱ्यांमध्ये पुढील पाणी साठेल अशा पद्धतीने काम केले जाणार आहे.

एसटी ड्रायव्हरवर डबल ड्युटीचा ताण

$
0
0
दरवर्षी निवृत्त होणारे कर्मचारी आणि नवीन भरतीतील कर्मचाऱ्यांची संख्या यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे उन्हाळी सुटीच्या काळात एसटीच्या ड्रायव्हरना डबल ड्युटीचा ताण सहन करावा लागणार असल्याचे समोर आले आहे.

आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट अन् भयग्रस्त मने....

$
0
0
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट पाहून घाबरलेल्या रहिवाशांचा मदतीसाठी आरडाओरडा.... धुराचे लोट लिफ्ट आणि जिन्याच्या पॅसेजमधून इमारतीत पसरत आहेत.... इमारतीतील लाईट गेल्याने रहिवाशांतील भीती वाढली आहे....

भेदरलेले कोथरूडकर अन् नशीबवान चिमुकला!

$
0
0
‘त्रिमूर्ती हाइट्स’ या इमारतीच्या पार्किंगमध्ये सुरू असलेले आगीचे तांडव आणि धुरांच्या लोटांमुळे बघ्यांच्या गर्दीबरोबर इमारतीतील नागरिकही भेदरून गेले होते. फायर ब्रिगेडच्या जवानांनी लॅडर, स्कायलिफ्टने इमारतीतून सुटका केल्यानंतर काही रहिवाशांना रडू कोसळले होते, तर सुटका झालेल्या चार महिन्यांच्या चिमुकल्यासाठी सर्वांनाच हायसे वाटले!

‘एलबीटी’चा मार्ग मोकळा

$
0
0
राज्यातील प्रमुख शहरांमधील नियोजित स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये येत्या सोमवारपासून (एक एप्रिल) ‘एलबीटी’ लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘सहारा’चा सत्यशोधन अहवाल सरकार-दरबारी

$
0
0
सहारा ग्रुपच्या लोणावळ्यातील ‘अॅम्बी व्हॅली’ प्रकल्पासंदर्भातील सत्यशोधन अहवाल जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला सादर केला.

तुकाराम बीज यात्रेसाठी जादा बसेसची सोय

$
0
0
तुकाराम बीज यात्रेच्या निमित्ताने देहू आणि आळंदीकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी २८ ते ३० मार्च दरम्यान एसटीतर्फे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

अश्लील मेसेजप्रकरणी एकाला अटक

$
0
0
येरवडा येथील बीपीओ कंपनीच्या ‘एचआर’ मॅनेजरला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी एका कथित वकिलाला लष्कर पोलिसांनी अटक केली. सुहास रसाळ (वय ४३, रा. विकासनगर, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळेच दुष्काळ

$
0
0
पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळेच राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षांनी जाहीर केलेला धोरणांचा परिपाक म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्याची खणखणीत टीका महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली.

‘नेट’चा निकाल जाहीर

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) ३० डिसेंबर, २०१२ ला प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) म्हणून पात्र होण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’चा (नेट) निकाल सोमवारी जाहीर झाला.

विकास आराखड्यावर आयुक्तांची सही

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यावर (डीपी) महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी स्वाक्षरी केली असून, येत्या दोन दिवसांत तो प्रसिद्ध होणार असल्याचे समजते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images