Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘साडेतीन वर्षां’त डॉक्टरांचा प्रस्ताव फेटाळला

$
0
0
शहरासह ग्रामीण भागातील सामान्यांना डॉक्टरांची कमतरता भासत असल्याने त्यावर उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणलेल्या साडेतीन वर्षांच्या ‘बीएसस्सी’ (कम्युनिटी हेल्थ) या अभ्यासक्रमाच्या प्रस्तावाला संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समितीने ‘बाहेरचा रस्ता’ दाखविला.

गँगरीनच्या संसर्गानंतरही शेतक-याला जीवदान

$
0
0
उजव्या हाताच्या काट्यामुळे झालेल्या जंतूसंसर्गामुळे गँगरीन होऊन किडनीची प्रक्रिया बंद पडल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या औषधोपचारामुळे अखेर ८० वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याला जीवदान मिळाले.

मार्केड यार्डाचा श्वास कोंडला

$
0
0
रोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या मार्केट यार्डातील फळ आणि पालेभाज्या बाजार स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि असुरक्षिततेच्या गर्तेत अडकला आहे. विशेष म्हणजे, बेशिस्त वाहनचालक आणि दारातच लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे बाजाराचा श्वास कोंडला आहे.

पुढा-याची पाण्यावरील मक्तेदारी मोडून काढा

$
0
0
‘काही ठिकाणी असलेल्या पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे आपल्याकडे काही सत्तास्थाने बनली आहेत. त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी लोकसहभाग बळकट करण्यासोबतच, पाण्याशी संबंधित राजकारण, अर्थकारण समजून घेत पर्यायी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी रविवारी व्यक्त केले.

रंग उधळा; पाणी नको

$
0
0
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होळी, रंगपंचमी खेळण्यासाठी आयोजित केलेल्या पार्ट्यांना परवानागी देऊ नये, तसेच शहरातील वसतिगृहांनी दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी शहरातील विविध संस्था संघटनांनी केली आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी अकराशे टाक्या

$
0
0
उन्हाळ्याच्या वाढत्या चटक्याबरोबरच पाण्याची गरज वाढू लागली असून दुष्काळी गावांत पाणी साठविण्यासाठी १ हजार १६५ टाक्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्यासह दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा खर्च सहाशे कोटी रुपयांच्या आसपास गेला आहे.

संतोष माने केसचा निकाल ३ एप्रिलला

$
0
0
स्वारगेट येथून बस पळवून संतोष माने या बसचालकाने मृत्यूचे थैमान घालत आठजणांचा बळी घेऊन ३५ जणांना जखमी केले होते. या केसचा निकाल तीन एप्रिलला लागणार आहे. या केसमधील दोन्ही पक्षांचा कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

लागवडीपूर्वीच वृक्ष सुकले

$
0
0
राज्यात शंभर कोटी झाडे लावण्याच्या शासनाच्या उपक्रमावर दुष्काळाचे पडसाद उमटले असून पाणीटंचाईमुळे बहुंताश जिल्ह्यांची यावर्षीची टार्गेट कमी करण्यात आली आहेत.

कारच्या अपघातात पादचारी ठार

$
0
0
महमंदवाडी ते सैय्यदनगर या रस्त्यावर कार चालकाने पादचा-याला चिरडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
शिवसागर सिटी येथे पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा ओढण्यास पैसे न दिल्याने मारहाण

$
0
0
दारु व गांजा पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार कसबा पेठेतील मुजूमदार बोळ येथे शनिवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत बाळकृष्ण पवार (वय २६, रा. कसबा पेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मोक्काच्या गुन्ह्यातून साखळीचोरांना वगळले

$
0
0
सोनसाखळी चोरीच्या आरोपावरुन मोक्का लावण्यात आलेल्या चौघा आरोपींना कोर्टाने मोक्काच्या गुन्ह्यातून वगळले आहे. प्रत्यक्षदर्शी आरोपींचा कोणत्याही संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळला नसून त्यांना मोक्कातून वगळयात यावे असे कोर्टाने आदेशात नमूद केले आहे.

गावठी पिस्तूल विकणा-या परप्रांतीयांना अटक

$
0
0
गावठी पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या परप्रांतातील दोघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि सहा काडतुसे असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. खडीमशीन चौकात मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता ही कारवाई झाली.

शहरातील युवतींना स्वसंरक्षणाचे धडे

$
0
0
स्वसंरक्षणासाठी १५ ते २५ वयोगटातील युवतींना कराटे, तायक्वांदो आणि ज्यूदोचे मोफत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने सोमवारी मंजूर केला. युवतींना २०० मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बाळाला विहिरीत फेकणा-या आईविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
आपल्या दहा महिन्याच्या बाळासह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेविरुद्ध बाळाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहिरीत युवक बुडाला?

$
0
0
महाराष्ट्रीय मंडळाच्या विहिरीत सोमवारी रात्री एक युवक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे कपडे आणि मोबाइल फोन विहिरीजवळ सापडले असून, फायर ब्रिगेडच्या जवानांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

वादाच्या भोव-यात... शिक्षण मंडळाची सहल

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी राबविलेली टेंडर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असून, सदस्यांनी एकत्र येऊन जादा दराने खर्च केल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी सोमवारी केला.

वृक्षगणनेतही मोबाइल क्रांती

$
0
0
तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे आता मोबाइलद्वारे वृक्षगणना करता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी फक्त मोबाइलवर ‘जिओटॅग फोटोग्राफ सिस्टिम’ (जीएफएस) हवी! या यंत्रणेचा वापर करून पुण्यातील कोणत्याही एका प्रभागात वृक्षगणनेचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

नागरी समस्यांवरही ‘अॅप’चा तोडगा

$
0
0
नागरी समस्या सोडविण्यासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार मोबाइल अॅप्लिकेशनची (अॅप) मदत घेणार आहे. यासाठी सरकार ‘मायक्रोसॉफ्ट’च्या मदतीने शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा या विषयीचे अॅप्स विकसित करणार आहे.

घरबसल्या मिळवा पासपोर्टची माहिती

$
0
0
पासपोर्ट प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने वर्षभरापूर्वी पासपोर्ट प्रक्रिया ऑनलाइन केली. आता ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पासपोर्ट विभागाने ‘एम पासपोर्ट सेवा’ हे नवे अॅप्लिकेशन विकसित केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images