Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एलबीटी’विरोधात व्यापारी हायकोर्टात

$
0
0
लोकल बॉडी टॅक्ससंदर्भात (एलबीटी) दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुणे व्यापारी महासंघाने ‘एलबीटी’च्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

परीक्षा विभागामुळे कुलगुरुंची अग्निपरीक्षा

$
0
0
परीक्षा विभागातील कामकाज सुधारणा आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागांचा प्रश्न सोडविण्याविषयी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीमध्ये निर्माण झालेला तिढा शनिवारी सुटला. या बाबींसोबतच परीक्षा विभागातील गैरकारभारांमुळे मलिन होणारी विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या अधिसभा सदस्यांच्या मागणीलाही कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मान्यता दिली.

मित्राच्या पैशावर डल्ला मारणा-यास अटक

$
0
0
मित्राने उधारीवर आणलेले पैसे पळविल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली. मनोज पवार (वय २७ रा. अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

टँकरचालकांची मनमानी दरआकारणी

$
0
0
उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसत असतानाच शहरात टँकरचालकांची मनमानी सुरू झाली आहे. महापालिकेचे नवे दरपत्रकही अद्याप जाहीर झालेले नसल्यामुळे अनिर्बंध पद्धतीने पाण्यासाठी दरआकारणी सुरू झाल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.

‘एक्सडीआर’ टीबीचे पेशंट आढळले

$
0
0
प्रभावी औषधांना दाद प्रतिसाद देण्यास तयार नसणाऱ्या टीबीच्या जंतूप्रकारातील ‘एक्सडीआर’ (एक्सटेन्सिव्ह रेझिस्टंट टू अँटी टीबी ड्रग्ज) टीबीचे दोन पेशंट पुण्यात आढळले आहेत. विशेषतः हा पेशंट शहराच्या पेठांमधील असून, दुसरा पेशंट हा कॉलेजचा विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले.

संत तुकाराम आजही लोकप्रिय

$
0
0
एककाळ गाजवलेला ‘संत तुकाराम’ हा सिनेमा ‘युवादिल फिल्म फेस्टिव्हल’मधून मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची संधी मिळणार म्हणून पुणेकरांनी गर्दी केली होती. या संधीत आणखी सुवर्णसंधी मिळाली, ती प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि सतीश राजवाडे यांना भेटण्याची!

हजारे यांचा आता जनतंत्र मोर्चा

$
0
0
जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जनतंत्र मोर्चाच्या माध्यमातून देशभर दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यातील पहिली सभा जालियनवाला बाग येथे होणार आहे. त्यानंतर देशभरात ३५ सभा घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी येथे दिली.

दुष्काळात 'रेन डान्स' हवा कशाला?

$
0
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होळी, धुलवड आणि रंगपंचमीला वॉटर पार्क व वॉटर स्पोर्टसमध्ये रेन डान्ससारखे प्रकार टाळण्याची सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी केली आहे.

वसतिगृहांना मिळणार रखडलेले अनुदान

$
0
0
‘रखडलेल्या अनुदानासंदर्भात सरकारच्या पातळीवर सकारात्मक निर्णय होणार असून, ते लवकरच विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे समाजकल्याण संचालनालयाचे आयुक्त आर. के. गायकवाड सांगितले.

विमा कंपनीला ग्राहकमंचाचा दणका

$
0
0
विमा उतरविल्यानंतर दोनच दिवसांनी गाडी चोरीला गेलेल्या वाहनमालकाला विम्याची ठरलेली रक्कम देण्याऐवजी तडजोड करुन कमी रक्कम स्वीकारण्याचा पर्याय देणाऱ्या इन्श्युरन्स कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

मराठी लेखकांबद्दल नाराजी

$
0
0
‘पांढरपेशेपणा बाजूला ठेवून समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल विचार केला आणि लेखन केल्यास मराठी साहित्य समृद्ध होईल,’ अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

मासिकांनी घडवले नवे लेखक-वाचक

$
0
0
‘अनेक कादंब-या, ग्रंथ, पुस्तके प्रथमतः मासिकांमधूनच प्रसिद्ध झाले आहेत. नवे लेखक घडविण्याबरोबरच नवीन वाचक घडविण्याचे महत्त्वाचे कामही मराठी मासिकांनी केले. हेच काम अजूनही सुरू आहे, असे मत अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांनी रविवारी व्यक्त केले.

‘बनावट ई-तिकीट; फौजदारी कारवाई करा’

$
0
0
नेहरूनगरमधील पीएमपी डेपोमध्ये बनावट, अनधिकृत इ तिकीटींग मशिन सापडल्याचा आरोप करीत याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाच्या वतीने रविवारी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावरही कारवाईची मागणी केली आहे.

भाज्या कडाडल्या

$
0
0
उन्हाचा कडाका वाढत असतानाच भाज्यांचे भावही कडाडले आहेत. लसूण, आले, टोमॅटो, गवार, शेवगा, काकडी, मटार, कोबी, फ्लॉवरचे भाव वाढले आहेत. आता महिनाभर तरीही या फळभाज्यांचे भाव उतरण्याची शक्यता कमी आहे. तर, मुबलक आवक झाल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.

विमानतळ आधुनिकीकरणाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

$
0
0
लोहगाव विमानतळाच्या परिसरातील आधुनिकीकरणाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात झाली असून त्यामध्ये विमाने उभी करण्यासाठी सहा नवे हॅगर्स, नवीन प्रशासकीय इमारतीचाचा समावेश आहे. येत्या वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याचे लोहगाव विमानतळाचे संचालक पी. एस. आर. के. सुधाकरन यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाकडून होणार बोगस डॉक्टरांचे ‘ऑपरेशन’

$
0
0
शहर व ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू केली जाणार असून, अशा बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

ट्रॅव्हल कंपन्या-एजंट रोखण्यास ‘पोलिस परेड’

$
0
0
एसटीचे प्रवासी पळविणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंटांना रोखण्यासाठी शहरातील एसटी स्टॅण्डच्या आवारात स्वतंत्र पोलिस नेमण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी रविवारी ही माहिती दिली.

प्राचार्यांच्या कार्यनिष्ठेवर सरकारचे प्रश्नचिन्ह

$
0
0
प्राध्यापकांच्या बहिष्कार आंदोलनाविषयी शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निर्णयामध्ये प्राचार्यांच्या कार्यनिष्ठेविषयी शंका घेणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप प्राचार्यांकडून करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

‘आधार’साठी मिळाले कायमस्वरूपी केंद्र

$
0
0
भविष्यकाळात प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक ठरलेली आधार कार्डे काढण्यासाठी आता शहरात कायमस्वरूपी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. महापालिकेच्या १३० ठिकाणी आधार कार्डांसाठी नोंदणी केंद्रे सुरू झाली असून येत्या काही दिवसांतच प्रत्येक प्रभागात दोन केंद्रे सुरू होत आहेत.

माझी नक्कल नको, जनहिताची कामे करा

$
0
0
आजकाल प्रत्येकजण आनंदाच्या शोधात धावतो आहे. मात्र, खरा आनंद सेवेतून मिळतो. अण्णा हजारेची नक्कल करण्यापेक्षा जनहितासाठी स्वतः काहीतरी काम करुन सेवा करा त्यातूनच खरा आनंद मिळेल, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images