Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पंचतारांकित विद्यापीठाला ‘मॉडेल आन्सरशीट’चे वावडे

0
0
पेपर तपासणीसाठी संदर्भ म्हणून वापरण्यात येणा-या आदर्श नमुना उत्तरपत्रिका, म्हणजेच ‘मॉडेल आन्सरशीट’ पुणे विद्यापीठाकडून तयारच केल्या जात नाहीत! काही मोजक्याच विषयांसाठी ही ‘सुविधा’ उपलब्ध करून दिली जात आहे.

परीक्षेच्या कारभारावर तहकुबी, कपात सूचना

0
0
पुनर्मूल्यांकनातील घोळामुळे अडचणीत आलेला परीक्षा विभाग... सुरक्षा रक्षकाच्या खुनानंतर मर्यादा स्पष्ट झालेली सुरक्षाव्यवस्था... ‘कमिटी पे कमिटी’ धोरणांनंतरही खोळंबलेली निर्णयप्रक्रिया... संस्थाचालकांचे प्रश्न आणि प्राध्यापकांचा बहिष्कार...

धर्मादाय आयुक्तालयातील कर्मचा-यास लाचप्रकरणी अटक

0
0
तक्रार अर्जाचा अहवाल अर्जदाराच्या बाजूने देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील निरीक्षकासह एका वकिलाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

राज्यातील सर्व महापालिकांत ‘एलबीटी’चे दर समान

0
0
राज्यातील महापालिकांमध्ये लागू करण्यात येणा-या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) दराबाबत सर्व महापालिकांमध्ये एकवाक्यता राहील, असे दर निश्चित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.

‘डीपी’वरील उपसूचना प्रशासनाला अगम्य

0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याला (डीपी) मंजुरी देताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपसूचनांचा पाऊस पाडला. मात्र, त्यापैकी ९३ उपसूचनांचा बोध महापालिका प्रशासनाला झालेला नाही.

‘टीबी’च्या एक लाख पेशंटला ‘यूआयडी’ क्रमांक

0
0
विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या ‘टीबी’ पेशंटची दुबार नोंदणी टाळावी यासाठी राज्यातील एक लाख दहा हजार पेशंटला आतापर्यंत विशिष्ट सांकेतिक क्रमांक अर्थात ‘यूआयडी’ क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे पेशंटच्या नोंदी झालेल्या हॉस्पिटल वगळता इतर ठिकाणी दुबार नोंदणी न होता उपचार घेता येतील.

रेल्वेच्या धडकेने तिघांचा मृत्यू

0
0
रेल्वेची धडक लागल्यामुळे झालेल्या अपघातात फुगेवाडी, पिंपरी आणि आकुर्डी येथे तीन जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांची ओळख पटली असून, एकाचे नाव अद्याप समजलेले नाही.

आमदार बाबर चार वर्षे फरार!

0
0
पोलिसांच्या रेकार्डवर गेली चार वर्षे फरार अशी नोंद असलेल्या आमदार महादेव बाबर यांच्यातर्फे कोर्टात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. विरोधी पक्षाच्या प्रचारप्रमुखाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी बाबर यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१० हजार कुटुंबांचे उघड्यावरच ‘विसर्जन’

0
0
राज्यातील सुमारे पावणेदोन लाख घरांतील व्यक्ती उघड्यावर प्रातर्विधीला (इन-सॅनिटरी लॅटरिन्स) जात असल्याचे आढळून आहे. विशेष म्हणजे; मुंबई-पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरांतही अशी स्थिती असून, पुणे महापालिका हद्दीतील साडेदहा हजार कुटुंबे उघड्यावर प्रत‌िर्विधीला जात आहेत.

सुधीर गाडगीळ यांना पुण्यभूषण पुरस्कार

0
0
मुलाखती आणि सूत्रसंचालनाच्या जोरावर पुण्याचे नाव जगभर पोहोचविणारे ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

‘फॅक्टरी’ने युवादिल फिल्म फेस्टिव्हलची नांदी

0
0
भारतीय सिनेसृष्टीच्या शताब्दीनिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या ‘युवादिल फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाने शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाले. त्यानंतर दाखवण्यात आलेल्या ‘कालिया मर्दन’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमांनाही रसिकांनी गर्दी केली होती.

‘आधार’अभावी जाणार ३० कोटींचा निधी माघारी

0
0
आधारकार्ड नसले तरी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचा-यांचे काळी फित आंदोलन

0
0
सातारा जिल्हाधिका-यांच्या विरोधात ‘तलवारीने मुंडके कापा’ असे आंदोलन पुकारून धमकी देण्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारी काळी फित लावून आंदोलन केले.

अनधिकृत फ्लेक्स लावल्याने गुन्हा दाखल

0
0
शहरात अनधिकृत फ्लेक्स लावणा-यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाची शुक्रवारी अंमलबजावणी करण्यात आली. भाजपचे शहर सरचिटणीस धीरज घाटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शाळेची भिंत कोसळल्याने २ विद्यार्थी जखमी

0
0
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक महानगरपालिकेच्या शाळेची भिंत अचानक कोसळून भिंतीचा भाग अंगावर पडल्यामुळे झालेल्या अपघातात शाळेतील दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

तळेगाव दाभाडेतील ‘बीएसएनएल’ गोडाउनला आग

0
0
तळेगाव दाभाडे येथील बीएसएनएल दूरध्वनी केंद्राच्या गोडाउनला शुक्रवारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला अटक

0
0
नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवडाभर हा नराधम त्या मुलीशी अश्लिल चाळे करत होता.

खडकी कॅन्टोन्मेंटच्या ऑफीस सुप्रिटेंन्डटला मारहाण

0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ऑफिस सुप्रिटेंन्डट विनायक पानसे (वय ५०, रा. खजिना विहीर, सदाशिव पेठ, पुणे) यांना काही नागरिकांनी घरी जाऊन मारहाण केल्याची घटना गुरुवारी (२१ मार्च) सकाळी घडली. या प्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-मनमाड एक्स्प्रेस चिंचवडला थांबणार

पुणे विद्यापीठामध्ये आता एमएस्सी वातावरणशास्त्र

0
0
एका बाजूला कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक यंत्रणा आणि दुसरीकडे त्या यंत्रणांचा वापर करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, अशा परिस्थितीला देशातील हवामानशास्त्र गेली अनेक वर्षे सामोरे जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images