Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

PMP चालकाला मारणाऱ्या महिलेची सुटका

$
0
0
पीएमपी चालकाने ‘दुचाकी नीट चालवा’ असे म्हटल्याचा राग आल्यामुळे दुचाकी पीएमपीला आडवी घालून चालकाच्या श्रीमुखात भडकविल्याप्रकरणी एका महिलेची कोर्टाने सक्त ताकीद देऊन सुटका केली. सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.

पुण्यासाठी जादा पाणी अडविणे शक्य

$
0
0
खडकवासला प्रणालीमध्ये मोठे धरण बांधणे शक्य नसल्याने छोटी धरणे, बंधारे किंवा तलाव बांधून पुण्यासाठी पाणी अडविणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी नव्या कृष्णा लवादाकडे वाढीव पाण्याची मागणी करावी लागणार आहे.

होर्डिंगवर कारवाई ही पोलिसांचीही जबाबदारी

$
0
0
अनधिकृत होर्डिंगवर कारवाई ही एकट्या महापालिकेची जबाबदारी नसून अशी होर्डिंग हटविणे ही स्थानिक पोलिसांचीही जबाबदारी आहे, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई हायकोर्टाने नुकताच दिला आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे.

बीसीएसच्या पुनर्मूल्यांकनाचा घोळ

$
0
0
इंजिनीअरिंगच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालांचा घोळ संपता-संपता आता पुणे विद्यापीठामध्ये बीसीएसच्या पुनर्मूल्यांकनाचा घोळ सुरू झाला आहे. पुढची परीक्षा अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असतानाही विद्यापीठाने बीसीएसच्या विद्यार्थ्यांचा ऑक्टोबरच्या परीक्षांचा पुनर्मूल्यांकनासाठीचा निकाल जाहीरच केला नाही. त्यामुळे आता नेमका अभ्यास कोणत्या विषयांचा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांचा निकाल लवकरात लवकर लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

आज रंगणार ‘हरिश्चंद्र’ आणि त्याची ‘फॅक्टरी’!

$
0
0
सिनेसृष्टीच्या शताब्दीनिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘युवादिल फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. आजपासून (दि. २२ मार्च) सुरू होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.

मालवाहतूकदार १ एप्रिलपासून संपावर

$
0
0
थर्ड पार्टी इन्शुरन्स दरातील वाढीच्या मुद्यावरून मालवाहतूकदारांनी संपाचा पवित्रा घेतला आहे. ही वाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी वाहतूकदार संघटनांनी येत्या एक एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

‘एलबीटी’विरोधात व्यापारी आक्रमक

$
0
0
‘लोकल बॉडी टॅक्स’ला (एलबीटी) विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या २८ तारखेपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. तसेच, या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी ‘दी पूना मर्चंटस चेंबर’ने केली आहे. त्यामुळे या निर्णयावरून सुरू असलेला वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सोनसाख‍ळी चोराला तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0
पतीबरोबर दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सोनसाखळीला चोराला कोर्टाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

संपकरी प्राध्यापकांना पर्यायी व्यवस्थेचा शह

$
0
0
संपकरी प्राध्यापकांना न जुमानता परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यास पुणे विद्यापीठाने कंबर कसली आहे. पर्यायी यंत्रणाच्या आधारे परीक्षांचा कारभार पेलण्याचा निर्धार कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.

मानेची मानसिक स्थिती नीटच

$
0
0
बसचालक संतोष मानेची घटनेच्या दिवशी मानसिक स्थिती नीट होती. त्याला आपण काय करतो आहोत हे कळत होते. त्याने निर्घृणपणे आठ लोकांचा बळी घेत, ३५ जणांना जखमी केले. त्यामुळे त्याची केस शिक्षेस पात्र ठरणारी आहे, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी गुरुवारी कोर्टात केला.

दादांची बरोबरी कोणीच करू शकत नाही

$
0
0
‘चार्ली चॅपलीन यांचे चित्रपट चाहत्यांना आजही आनंद देत आहेत, त्याचप्रमाणे दादांचे चित्रपट शंभर वर्षांनंतरही प्रेक्षकांना तोच आनंद देत राहतील, त्यामुळेच दादांच्या अभिनयाची बरोबरी कोणीही करू शकत नाही,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी व्यक्त केल्या.

टोलच्या रकमेत वाढ

$
0
0
राष्ट्रीय महामार्गावर आकाराण्यात येणाऱ्या टोलच्या रक्कमेत येत्या एक एप्रिलला वाढ होण्याची शक्यता आहे. नव्याने आकारण्यात येणाऱ्या टोलच्या दरामध्ये १० टक्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महापालिकेत केबल घोटाळा?

$
0
0
वाकड परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील महावितरण कंपनीचे उच्च व लघुदाब खांब आणि तारा हलविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारानेच केबल गायब केल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, या प्रकरण्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

राजगुरुंवर टपाल तिकिट

$
0
0
देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन उद्या, २२ मार्च रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८२ व्या बलिदान दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाणीपट्टी बिलांमध्ये सावळागोंधळ

$
0
0
पाणीपट्टीच्या बिलांमध्ये सध्या सावळागोंधळ चालू असून, नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. दुरुस्तीसाठी अनेक नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत.

पुणेकर फक्त सल्लेच देतात!

$
0
0
‘वाहतुकीसह अन्य समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी पोलिसांकडून नेहमीच उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे अपेक्षित आहे. या कामी मुंबईकर पोलिसांच्या उपाययोजनांचे स्वागत व पालन करतात. पुणेकर मात्र फक्त सल्लेच देत बसतात. पुणे ही ‘सिटी ऑफ रिअॅक्शन’ आहे...’

संजूबाबाचा मुक्काम येरवड्यात?

$
0
0
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेला अभिनेता संजय दत्तचा पुढील मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहात असण्याची शक्यता आहे. तुरुंग प्रशासनाने तसे संकेत दिले आहेत.

संतोष मानेचे कृत्य गुन्हा होत नाही

$
0
0
‘बसचालक संतोष माने याने केलेले कृत्य हे वेडाच्या भरात केले असून भारतीय दंड संहिता कायदा कलम ८४ नुसार त्याने केलेले कृत्य गुन्हा होत नाही,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. धनंजय माने यांनी शुक्रवारी कोर्टात केला.

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

$
0
0
डायस प्लॉट येथील एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत महर्षीनगर पोलिस चौकी येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

दरड कोसळल्याने तीन मुले जखमी

$
0
0
येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे डोंगराची दरड एका घरावर कोसळल्यामुळे तीन मुले जखमी झाली. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळल्याची माहिती कळविण्यात आली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images