Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेकायदा बांधकामांवर हातोडा

0
0
पुण्याच्या हद्दीत नव्याने समाविष्ट होणारी २८ गावे आणि यापूर्वी अंशतः वगळलेल्या गावांमध्ये होणा-या अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, संबंधित बेकायदा बांधकामांवर पुणे महापालिकेच्या मदतीने हातोडा मारला जाणार आहे.

भविष्यात सगळीकडेच ‘एलबीटी’

0
0
‘भविष्यात टप्प्याटप्प्याने सर्व राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे आता पुण्यात एलबीटी लागू केल्याने व्यापार बाहेर जाण्याची चिंता करण्याचे कारण नाही,’ असे राज्याचे विक्रीकर सहआयुक्त महावीर पेंढारी यांनी बुधवारी सांगितले.

उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

0
0
उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने पुणे-हबीबगंज आणि पुणे-पटना या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सोडण्याचे निश्चित केले आहे. आठवड्यातून एकदा ही गाडी धावणार आहे.

गार वा-यांमुळे चटका कमी

0
0
कमाल व किमान तापमानात घट झाल्याने दोन दिवसांपूर्वीपर्यंत उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी बुधवार सुसह्य ठरला. पुढच्या दोन दिवसांत तापमानात अंशतः वाढ होण्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत.

‘स्वाइन फ्लू’ने बालकाचा मृत्यू

0
0
लष्करातील पाच महिन्याच्या बालकाचा सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्या लाळेच्या नमुन्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून त्यात स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. शेरीन शेख असे या पाच महिन्याच्या बालकाचे नाव आहे.

गाडीच्या डिक्कीतील दीड लाख पळविले

0
0
कारच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ३४ हजार रुपये चोरट्याने पळविल्याचा प्रकार खराडी बायपास चौकात मंगळवारी पावणेपाच वाजता घडला. याप्रकरणी बापूसाहेब कोडिंबा लगड ( वय ४५, रा. मुखई, ता. शिरुर) यांनी विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

दुष्काळ निवारणावरील खर्चाची तपासणी

0
0
दुष्काळ निवारणासाठी टँकर, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, नळ पाणीपुरवठा योजना आणि विंधनविहिरींवर झालेल्या खर्चाचे आता ऑडिट केले जाणार आहे. पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात यावर झालेल्या खर्चाची तपासणी करण्यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांना आरक्षणातून वगळणार

0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या नियमातील २५ टक्के आरक्षणाच्या अटीमधून अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, कायद्याच्या इतर तरतुदींचे या शाळांनाही पालन करावेच लागणार आहे.

पासपोर्ट केंद्रात समुपदेशन केंद्र सुरू

0
0
पासपोर्टचे अर्ज घेऊन येणा-या नागरिकांची खरेच गैरसोय होत असल्याची जाणीव अखेर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) झाली असून, नागरिकांच्या सोयीसाठी पासपोर्ट सेवा केंद्रात काही सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

चाकुचा धाक दाखवून १ लाख लंपास

0
0
जमिनीच्या वादातून ‌जिवे मारण्याची धमकी देऊन ऑफिसमधील १ लाख रुपये पळविल्याचा प्रकार कॅम्पमधील क्लोअर सेंटरमध्ये घटला. मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजता झालेल्या या घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बनावट क्रेडिट कार्ड वापरून फसवणूक

0
0
बनावट क्रेडिट कार्डचा वापर करून मोबाइल हॅन्डसेट खरेदीचा प्रयत्न केलेल्या एकाला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार फरार आहे. ही घटना कर्वे रोडवरील सेंट्रल मॉलमध्ये मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.

पुणे विमानतळासाठी तरतूद नाही

0
0
पुण्याच्या औद्योगिक वाढीच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतदू करण्यात आली नसल्याने विमातळाचा प्रश्न इतक्यात सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानतळासाठी तरतूद नसल्याने उद्योग क्षेत्राने निराशा व्यक्त केली आहे.

बजेटवर साडेनऊ तासांची चर्चा

0
0
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१३-१४ च्या बजेटवर मंगळवारी साडेनऊ तासाची चर्चा झाली. या चर्चेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी ६२ उपसूचना मांडल्या.

खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे

0
0
‘पूर्वीच्या तुलनेत खेळाडूंना आता नव्याने पोलिस दलापासून ते महसूल खात्यापर्यंत उच्चपदाच्या नोक-या राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन खेळाडूंनी भारताचा तिरंगा ऑलिम्पिकमध्ये फडकवावा,’ असे आवाहन पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.

‘आधार’च्या ‘कमाई’वर कारवाई

0
0
आधारची नोंदणीसाठी पैसे आकारुन गैरव्यवहार करणाऱ्या ऑपरेटर्स, सुपरवायझरची पोलिसात तक्रार करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. आधार नोंदणी संपूर्णपणे मोफत असून पुढील काळात केवळ सार्वजनिक ठिकाणीच आधार नोंदणीची केंद्र सुरु करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली खाजगी ठिकाणी केंद्र सुरु केल्यास त्यावरही आता कारवाई केली जाणार आहे.

STच्या ताफ्यात येणार ५० CNG बस

0
0
जवळच्या अंतरासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना सीएनजी बसची सेवा उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत पुण्यात ५० सीएनजी बस उपलब्ध होणार आहेत. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या बस १०० किलोमीटर अंतराच्या परिसरात धावणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

बिल्डरकडून कोट्यवधीची जमीन हडप

0
0
चाकण परिसरातील कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची जमीन बिल्डरने हडप केल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. अडीच ते तीन कोटी रुपयांची ही जमीन असून, बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्या करुन ही जमीन हडप करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांची पत्नी पार्टनर असल्याने पोलिसांकडून कोणतेही कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी संस्‍थांची नेमणूक

0
0
महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिःसारण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे डिझाइन आणि व्यवस्थापन करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांच्या पॅनेलमध्ये मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनीअरिंग आणि स्टुप कन्सल्टंट या दोन संस्थांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे गाड्यांना सुटीनिमित्त जादा डबे

0
0
उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांना सुलभपणे प्रवास करता यावा, म्हणून मध्य रेल्वेने सहा रेल्वे गाड्यांना जादा डबे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसला सेकंड क्लासचा एक, पुणे-नागपूर गरीब रथला फर्स्ट एसी आणि थर्ड एसीचा प्रत्येकी एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.

नरेश झुरमुरे यांची बदली

0
0
‘पाणीवापराबाबत पुणेकर माजलेत,’ असे विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. यशदाच्या उपमहासंचालक पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने दिले असून पुणे महापालिकेतील पदाच्या जबाबदारीतून त्यांना रिलीव्ह करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images