Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिसांनी व्हावे ज्येष्ठांचे मित्र

$
0
0
आजारी, एकाकी ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे. या नागरिकांशी गप्पा मारणे, त्यांची जुजबी कामे करणे, त्याचबरोबर त्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबांचा भाग बनले पाहिजे, अशी अपेक्षा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली.

उन्हाळ्याच्या स्वागताला कलिंगडे, मोसंबी

$
0
0
उन्हाचा चटका जाणवू लागताच आता रसदार फळांना बाजारात उठाव मिळू लागला आहे. विशेषत: द्राक्षे आणि कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली असून, परिणामी, फळबाजार कलिंगडाने बहरला आहे.

सोलापूर, नागपूरसाठी रेल्वेच्या जादा गाड्या

$
0
0
उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वेतर्फे पुणे ते सोलापूर आणि पुणे ते नागपूर या मार्गावर जादा रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून एकदा धावणार आहेत.

नामांतराचे सोयीस्कर राजकारण

$
0
0
पुणेः आपल्याला सोयीचे असते, त्याठिकाणी सत्ताधारी मंडळी कोणालाही न विचारता आपल्या नेत्यांची नावे देतात. मात्र, क्रांतीची पताका घेऊन वाटचाल केलेल्या युगपुरुषांची नावे देण्यासाठी मागणी करावी लागते, याला सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

रिंग रोड, मेट्रोला गती देणार

$
0
0
‘शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंग रोड आणि मेट्रोच्या कामाला गती देण्यात येईल. राज्याच्या येत्या बजेटमध्ये शहरासाठी योग्य तरतूद करण्याचा प्रयत्न करू,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले.

सहकारमंत्र्यांनी लिहिले राज्यातील खासदारांना पत्र

$
0
0
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे २००७-०८ या वर्षांची सुमारे अडीच हजार कोटींची ‘इन्कम टॅक्स’ देणी थकीत आहेत. मात्र, ती कारखान्यांना मान्य नाहीत. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी राज्यातील खासदारांना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्र पाठविले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी दुष्काळीभागात टँकरवाटप

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याचे टँकर पाठविण्याच्या उपक्रमास रविवारी प्रारंभ करण्यात आला. शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे पाण्याचा टँकर सुपूर्द करण्यात आला.

सुरक्षित काश्मीर पर्यटनासाठी ‘सरहद’ हेल्पलाइनचा ‘हात’

$
0
0
काश्मीरमध्ये दहशतवादी पुरस्कृत घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी ‘सरहद’ संस्थेची ‘हेल्पलाइन’ फायदेशीर ठरत आहे. ‘सरहद’मध्ये शिकणारी आणि काश्मीरमध्ये सुट्टीसाठी गेलेली अनेक मुले या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना मदतीचा हात देत आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर?

$
0
0
प्राध्यापकांनी परीक्षांच्या कामांवर टाकलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य विद्यापीठांप्रमाणेच पुणे विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीला प्राध्यापकांचा बहिष्कार नव्हे, तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे ढिसाळ नियोजनाच कारणीभूत असल्याचा दावा प्राध्यापक संघटनांनी केला आहे.

१०वीच्या पुस्तकांची छपाई रखडली

$
0
0
दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांसाठी पुस्तकांच्या छपाईची प्रक्रिया रखडत चालल्याने यंदा सुट्टीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांविनाच बसावे लागण्याची चिन्हे आहेत. राज्य शिक्षण मंडळाकडून गणित आणि विज्ञान वगळता इतर विषयांसाठी पुस्तकांच्या अंतिम मसुद्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने ‘बालभारती’कडे ही पुस्तके छपाईसाठीच जाऊ शकली नाहीत.

ग्रँडमास्टरला हवा मदतीचा ‘चेक’

$
0
0
कोट्यवधी लोकसंख्येच्या भारतात बुद्धिबळमध्ये केवळ एकच विश्वविजेता विश्वनाथन आनंद होऊ शकतो, अशी टीका आपल्याकडे सातत्याने होत असते; पण त्याला कारणही तसेच आहे.

एनडीएच्या आवारात शिकारी

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) आवारात शिकारीच्या तयारीत असलेल्या टोळीला एनडीए पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. या टोळीकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांना वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

...तर पोलिसांवरच कारवाई

$
0
0
पुण्यातील सोनसाखळी चोरांना जेरबंद न केल्यास पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांवरच थेट कारवाई करण्यात येणार आहे. या चोरांचा अटकाव करण्यासाठी प्रसंगी शस्त्रांचाही वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी आदेश दिले.

मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठासाठी पाठपुरावा

$
0
0
पुणे बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा महाराष्ट्र टाइम्सतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. त्या निमित्ताने आयोजित राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये वकिली आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभाच्या प्रतिनिधींमध्ये खुला संवाद झाला. त्याचा हा गोषवारा...

उद्योग व मनुष्यबळ यांना जोडण्यासाठी वेबपोर्टल

$
0
0
राज्यातील उद्योग आणि व्यवसाय कुशल मनुष्यबळ यांना एकत्र आणण्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली असून, लवकरच हे पोर्टल सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार आणि स्वयंरोजगार आयुक्त विजय गौतम यांनी दिली.

काळ्या कोटापासून वकिलांना ३ महिन्यांसाठी सवलत

$
0
0
कोर्टात न्यायाधीशांपुढे केस चालविताना वकिलांना अंगात काळा कोट, गळ्यात पांढरा बँड हा ड्रेसकोड पाळावा लागतो. हा पेहराव असेल तरच कोर्टापुढे हजर होता येते. उन्हाळ्यात मात्र काळ्या कोटात गरम होत असल्यामुळे वकिलांना त्रास होतो.

...अन् स्फुरले ‘गीतमृत्युंजय’

$
0
0
अंदमानाची सहल करून आलो; परंतु मनात सतत सावरकरांबद्दल काव्याचा विचार होता. त्यांच्यावरील साहित्य वाचत राहिलो. पुरता सावरकरमय झाल्यावर स्फुरली त्यांच्यावरील कविता- गीतमृत्युंजय

‘आरपीआय’ काढणार विधानसभेवर मोर्चा

$
0
0
‘दलित समाजातील नागरिकांवर वाढते हल्ले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत तसेच बेरोजगार तरुणांना मासिक भत्ता मिळावा, अशा मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) वतीने विधानसभेवर मोर्चा काढला जाणार आहे.

जागा खरेदीच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
जागा खरेदी करून देतो असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन एका महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

‘बोअरवेल’ नोंदणीकडे दुर्लक्ष

$
0
0
पाण्याच्या दुर्भिक्षामुळे भूगर्भातील पाण्यावरचे अवलंबित्व सातत्याने वाढत असून, त्याला पायबंद घालण्यासाठी ‘बोअरवेल’ची नोंदणी करण्याची शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) चार वर्षांपूर्वीच केली होती. परंतु, दुर्दैवाने अद्याप ही सूचना कागदावरच राहिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images