Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुक्त विद्यापीठातही कॅम्पस ‘प्लेस’

$
0
0
कॅम्पस प्लेसमेंट ही आता केवळ प्रसिद्ध विद्यापीठातील किंवा नामवंत कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. आपले काम, जबाबदारी सांभाळून मुक्त विद्यापीठातून ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कॅम्पसमध्येच ‘प्लेस’ होण्याची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने पुढाकार घेतला आहे.

जुन्नर: नायब तहसीलदारावर गुन्हा

$
0
0
जुन्नर तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एच. आर. बोऱ्हाडे यांच्यावर एका महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होर्डिंगवरील कारवाई मोहीम सुरूच

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने सुरू केलेली होर्डिंग विरोधातील कारवाई तिसऱ्या दिवशीही कायम होती. शनिवारी दिवसभरात ३७ होर्डिंग पाडण्यात आले. शहरातील सर्व होर्डिंग काढण्याचा आदेश हायकोर्टाकडून मिळताच महापालिका प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे.

आडते संघटनेची निवडणूक रद्दबातल

$
0
0
मार्केट यार्डात चौदा वर्षे बेकायदा काम करणा-या आडते असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करण्याची नामुष्की पदाधिका-यांवर शनिवारी आली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांना आता काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

चारा छावण्यांच्या अनुदानात भरीव वाढ

$
0
0
सोलापूरच्या दौ-यावर असलेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी महत्त्वाच्या घोषणा करून दुष्काळी जनतेला दिलासा दिला. दुष्काळाच्या तडाख्यातून फळबागा जागविण्यासाठी धडपड करीत असलेल्या शेतक-यांना फळबागांना पाणी देण्यासाठी हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली.

सहकाराचा दुष्काळनिधीला हातभार

$
0
0
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सहकारी साखर कारखानदारीने मदतीचा हात पुढे केला असून, टनामागे दहा रुपये देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यातून जवळपास ६७ कोटी रुपयांचा निधी दुष्काळ निधीसाठी मिळणार आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि सहकार कायद्यातील नव्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाने, मध्यवर्ती व नागरी बँका, पतसंस्थांची सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी बैठक घेतली.

‘कँन्टोन्मेंट’च्या निवडणुका आता ६ महिने लांबणीवर

$
0
0
कँन्टोन्मेंट हद्दीतील २०११ च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध न झाल्याने पुणे, खडकी व देहूरोडसह देशभरातील ५८ कँन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत. या निवडणुका लांबणार असल्याने विद्यमान बोर्डाला किमान सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे.

‘एलबीटी’ नोंदणी रविवारीही होणार

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) नोंदणीसाठी व्यापा-यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून रविवारी (१७ मार्च) नोंदणीचे कामकाज सुरू राहणार आहे. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवार (१८ मार्च) आणि मंगळवार (१९ मार्च) रोजी कसबा पेठेतील जन्म-मृत्यू कार्यालयामध्ये दुपारी एक वाजता प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाणार आहे.

'आधार' फक्त सरकारी कार्यालयांतच

$
0
0
आधार नोंदणीची मशिन आपल्या खासगी कार्यालयात नेणा-यांकडून ती काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे आधारकार्ड काढण्याचे काम फक्त सरकारी कार्यालयांतूनच केले जाणार आहे.

३४ बसवर कारवाईचा बडगा

$
0
0
बेजबाबदारपणे विद्यार्थी वाहतूक करणा-या ३४ खासगी बसवर ‘आरटीओ’ने कारवाईचा बडगा उगारला. या बसची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, बसमालक आणि चालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महिला नामधारी 'कारभारी'

$
0
0
महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले, तरी त्यांचा कारभार पतिराज हाकतात. मग, अशा आरक्षणाचा उपयोगच काय, असा सवाल करत महिलांचे नामधारी ‘कारभारी’ असणे, ही खेदाची बाब आहे,’ असे मत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शनिवारी मांडले.

दुस-या दिवशीही पाऊस

$
0
0
पावसाने शनिवारी शहर, परिसरात सलग दुस-या दिवशी हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत गारांचा पाऊस झाला. पुढच्या दोन दिवसांतही शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

जुन्या पुस्तकांची विक्री

$
0
0
कथासंग्रहांबरोबरच माहिती-तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विज्ञान अशा विविध विषयांवरील जुन्या पुस्तकांच्या विक्रीचे प्रदर्शन ब्रिटिश लायब्ररीमध्ये भरविण्यात आले आहे. आज (१७ मार्च) सकाळी ११ ते ६ यावेळेत प्रदर्शन सभासदांसाठी खुले राहणार आहे.

​पाटबंधारे खात्यात १५०० नोक-या

$
0
0
पुणेः पाटबंधारे खात्यातील वर्ग तीन व चारच्या कर्मचा-यांची सुमारे दोन हजार ६७३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे खात्याच्या कामावर परिणाम होत असल्याची तक्रार सरकार दरबारी करण्यात आली आहे.

कर्मचारी - पोलिस कोर्टात भिडले

$
0
0
पुणेः न्यायाधीशांसाठी ठेवलेल्या पार्किंगच्या जागेत गाडी लावण्यावरून पोलिस व न्यायालयीन कर्मचा-यांमध्ये शनिवारी वाद झाला. या वादात पोलिसांनी एका कर्मचा-याला मारहाण केली.

स्कूलबसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

$
0
0
स्कूलबसमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राजेंद्र प्रल्हाद जगताप (वय ४८, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे.

उसासाठी ठिबक सिंचनच योग्य

$
0
0
शेतीसाठी दिल्या जाणा-या पाण्यापैकी साठ टक्के पाणी हे केवळ उसासाठी लागते. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पुढील काळात उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. यासाठी साखर कारखान्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना केंद्रीय कृषिमंत्री आणि वसं‌तदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना दिल्या.

बारावीच्या परीक्षेत सापडला डमी विद्यार्थी

$
0
0
बारावीच्या परीक्षेला स. प. महाविद्यालयात डमी विद्यार्थी बसल्याचे रविवारी आढळून आले. संबंधित विद्यार्थ्याने प्राध्यापकांना दमदाटी केल्याने त्याच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

आबा येती घरा...

$
0
0
वेळ रविवार सकाळची... सुटीचा दिवस असल्यामुळे घरातही सगळे निवांत असतात.. दहा वाजण्याच्या सुमारास अचानक घरासमोर सरकारी वाहनांचा ताफा येऊन थांबतो... आणि मोटारीतून उतरलेले आबा थेट घरात येऊन आपुलकीने विचारपूस सुरू करतात, तेव्हा परिसरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो.

‘मेट्रो पुण्या’ला हद्दवाढीचे ‘सुरक्षाकवच’

$
0
0
महापालिकेच्या हद्दीतील २५ गावे पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत आल्याने त्यांना ‘सुरक्षाकवच’ प्राप्त झाले असून, स्थानिक गुंडगिरीमधून नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images