Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उद्योग-मनुष्यबळ एकत्र आणणार पोर्टल

$
0
0
राज्यातील उद्योग आणि व्यावसाय कुशल मनुष्यबळ यांना एकत्र आणण्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली असून, लवकरच हे पोर्टल सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे रोजगार आणि स्वयंरोजगार आयुक्त विजय गौतम यांनी दिली.

‘वाजवा रे वाजवा’

$
0
0
शहरातील एक स्टार हॉटेल... हॉटेल पॉश असल्यामुळे वर्दळही त्याच स्टँडर्डच्या मंडळींची... अशा वातावरणात अचानक कर्कश आवाजात वाजंत्रीचा आवाज कानी येऊ लागतो... आसपासच्या मंडळींच्या नजरा तिकडे वळतात, तर तेथे ‘मिळकतकर वसुली पथक’ असा फलक लावलेला दिसून येतो... काही वेळ झाला, तरी वाजंत्री थांबत नाही... अखेर कटकट नको, म्हणून व्यवस्थापनाची मंडळी बाहेर पथकातील कर्मचाऱ्यांकडे येतात आणि थकबाकी भरून टाकतात...!

स्कॉलरशीप परीक्षा २३ मार्चला

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी स्कॉलरशीपची परीक्षा येत्या २३ मार्चला होणार आहे. पुण्यातून ४ थीचे २३ हजार ६९५, तर ७ वीचे १२ हजार ९२९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

फुगलेल्या मतदारयादीला पुन्हा कात्री

$
0
0
बोगस व दुबार मतदारांमुळे बेडकासारख्या फुगलेल्या पुण्याच्या मतदारयादीत घट होत चालली आहे. मतदारयादीतून आणखी साडेतीन लाख दुबार व मृत मतदार कमी करण्याची कार्यवाही येत्या एक एप्रिलला पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

शहरातील सर्वच होर्डिंग अनधिकृत?

$
0
0
अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा आदेश हायकोर्टाने सर्व महापालिकांना दिला आहे; परंतु, पुण्यातील होर्डिंगची कायदेशीर परिस्थिती पाहता शहरातील जवळपास सर्वच होर्डिंग अनधिकृत ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने एक एप्रिलपासून लायसेन्स रिन्यूअलचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, यामध्ये २२२ रुपये प्रति चौरस मीटर दराने आणि २००३ च्या नियमावलीतील अटींची पूर्तता करणाऱ्या होर्डिंगनाच परवानगी देण्यात येणार आहे.

पुण्यात कार्गो टर्मिनल होणार

$
0
0
पुण्यातील लोहगाव विमानतळालगत कार्गो टर्मिनल उभारण्यास नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मान्यता दिली आहे. टर्मिनलसाठी लोहगाव तसेच नजिकची दहा एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.

आधार पळविणा-यांवर कारवाई

$
0
0
आधार नोंदणीची मशिन घरी नेणाऱ्या राजकीय मंडळी आणि संबंधित ऑपरेटच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना ‘आधार’ मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.

कोर्टाने मिळवून दिला जोडीदार

$
0
0
घरच्या लोकांचा विरोध असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते पोलिसांकडे मदत मागायला गेले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी कोर्टापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. कोर्टाने त्या मुलीची इच्छा जाणून घेऊन तिला मुलासोबत लग्न करण्याची परवानगी दिली. कोर्टाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर ते दोघे लगेच विवाहबद्ध झाले. पिंपरीत नुकतीच घडलेली ही घटना.

प्रिया गदादे यांचे नगरसेवकपद रद्द

$
0
0
वयाचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश लघुवाद न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम. एस.एम. उमर यांनी दिला आहे.

रुपी बँकेच्या खातेदारांना दिलासा

$
0
0
रुपी को-ऑप बँकेवरील आर्थिक बंधने कायम राहणार असली, तरी हार्डशिप अकाउंटअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या बँकेच्या खातेधारक आणि ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

एलबीटीबाबत नोंदणी सोमवारपासून

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंमलबजावणीच्या अनुषंगाने व्यापारी व उद्योजकांनी येत्या सोमवारपासून (१८ मार्च) नोंदणी करावयाची आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, येत्या दोन दिवसांत मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रीपेड रिक्षा अखेर वठणीवर

$
0
0
प्रवासाच्या अंतरावरून दिशाभूल करून प्रवाशांची लूट करणारी प्रीपेड रिक्षा अखेर वठणीवर आली. रस्त्यावर उतरलेल्या ‘आरटीओ’ने मार्गांचे नेमके अंतर घेऊन योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला. परिणामी, आता खऱ्या अर्थाने प्रवाशांची लूट थांबणार आहे.

दुष्काळी गावांतील विद्यार्थ्यांना फी माफ

$
0
0
राज्यातील दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा ७,०६४ गावांतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

‘मुस्लिमांकडे बोट दाखविणे ही जगाची गरज’

$
0
0
‘काहीही घडले तरी मुस्लिम समाजाकडे बोट दाखविणे ही जगाची गरज बनली आहे. अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेला कोणी तरी शत्रू असणे गरजेचे आहे. अर्थात, जगाने अशा प्रकारे मुस्लिमांकडे बोट दाखविण्यासाठी काही मुस्लिमांनीच जागा दिली आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. जहीर अली यांनी व्यक्त केले.

अॅडमिशनसाठीचे दाखले आता शाळेत

$
0
0
कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले विद्यार्थ्यांना कमी वेळात उपलब्ध व्हावेत, यासाठी शहरातील शाळा आणि कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे. पुणे शहर तहसील कार्यालयाच्या वतीने एक एप्रिल ते दहा मे या दरम्यान ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, डोमिसाइल, उत्पन्न तसेच जातीचे दाखले या मोहिमेत दिले जाणार आहे.

सव्वा लाख पुणेकरांना काचबिंदू

$
0
0
काचबिंदूचा (ग्लॉकोमा) आजार नियंत्रित करता येत असला तरी सुमारे सव्वालाख पुणेकरांना या आजाराने ग्रासले असून त्यापैकी साठ टक्के महिलांचा समावेश आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे.

सीमेवरची २५ गावे अखेर पुण्यात

$
0
0
पुण्याच्या सीमेवरची २५ गावे अखेर आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

डोक्यात वार करून एकाचा खून

$
0
0
कात्रज-कोंढवा रोडवर गोकुळनगर येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला.

‘एलबीटी’विरोधात बाजार बंद

$
0
0
लोकल बॉडी टॅक्सच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील वेगवेगळ्या बाजारातील व्यवहार थंडावले. परिणामी, बहुतेक बाजारपेठा बंद राहिल्याने सामान्यांची गैरसोय झाली. सायंकाळनंतर मात्र, काही भागातील दुकाने सुरू होती.

आरोपींच्या भेटीची वेळ पूर्ववत करा!

$
0
0
येरवडा जेलमधील कैद्यांच्या मुलाखतीची दुपारची वेळ जेल प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून विनाकारण बंद केली आहे. त्यामुळे वकिलांना आरोपींकडे केससंदर्भात चौकशी करणे अडचणीचे होऊ लागले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images