Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शरद पवारांचे क्राइम रेकॉर्ड निरंक

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे शहरात कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे. दिल्ली पोलिसांना सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती सुप्रीम कोर्टात द्यायची असल्याने त्यांनी दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली होती, असे पुणे पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘रुपी’चे प्रशासक आज ‘आरबीआय’मध्ये

$
0
0
बँकेवर घालण्यात आलेली आर्थिक बंधने शिथिल करावीत, या मागणीसाठी रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक मंडळ गुरुवारी (ता. १४) मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. बँकेतून रक्कम काढून घेण्यावर घालण्यात आलेल्या बंधनांवर विशिष्ट परिस्थितीत रक्कम काढू देण्याबाबत सकारात्मक विचार होण्याची शक्यता आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीतील एका जखमीचा मृत्यू

$
0
0
शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी पडलेल्या दरोड्यातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरोडेखोरांनी तिघांना माराहण केली असून इतर दोघांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.

वैचारिक वादविवादाला आपण का घाबरतोय?

$
0
0
‘सध्या राजकारणाचा वावर समजाच्या सर्वच क्षेत्रांत वाढला आहे. त्यामुळे सामान्य माणूस संकोचला आहे. वैचारिक लिखाणही लोप पावत आहे. त्यामुळे समाजातील विचारवंत संपलेत काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

लॉ कॉलेज रोडवर कोंडी कायमच

$
0
0
कर्वे रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नळ स्टॉप ते खंडूजी बाबा चौकातील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्यात आले आहे; तरीही लॉ कॉलेज रोड ते नळ स्टॉपदरम्यान असणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या सिंक्रोनायझेशनकडे दुर्लक्ष झाल्याने ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

दुष्काळाच्या निधीत गैरव्यवहार

$
0
0
केंद्र सरकारकडून दुष्काळासाठी देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ‘याला जबाबदार असलेले सहकार खाते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची शासनाने श्वेतपत्रिका काढावी,’ अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

‘प्रीपेड रिक्षा’चे पितळ उघडे

$
0
0
‘प्रीपेड रिक्षा’ योजनेतून प्रवाशांना दिलासा मिळण्यापेक्षा त्यांची लूटच होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवाजीनगर ते ‘यशदा’पर्यंतचे अंतर चार किलोमीटर असताना ते दहा किलोमीटर दाखवून रिक्षाचालकांचे उखळ पांढरे करण्याची सोय वाहतूक पोलिस आणि ‘आरटीओ’ने या योजनेत केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

किडनीसाठी २ हजार पेशंट प्रतिक्षेत

$
0
0
मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण कायद्यातील त्रुटी, कडक नियमन आणि दान करण्यासाठी नातेवाइक पुढे सरसावत नसल्याने राज्यातील दोन हजारांहून अधिक पेशंट सध्या किडनीसाठी ‘वेटिंग’वर आहेत.

जगात पास,विद्यापीठात 'नापास'

$
0
0
त्याचा ‘जीआरई’च्या मॅथ्समधील स्कोअर ८०० पैकी ८००... ‘गेट’ची परीक्षाही उत्तीर्ण... इंजिनीअरिंगच्या चारही वर्षांचे एकत्रित गुण तसे फर्स्ट क्लासचेच... मात्र, दीड वर्षांपूर्वीच इंजिनीअरिंग पूर्ण होण्याची अपेक्षा असलेला तो पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या ‘कारभारा’मुळे अद्यापही इंिजनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाचेच पेपर देत आहे.

विद्यापीठाच्या चुकीने २५जण नापास

$
0
0
प्रत्यक्षात पेपरला बसलेल्या सुमारे २५ बहिःस्थ विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवून त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आल्याची घटना नुकतीच पुणे विद्यापीठात घडली. विद्यार्थ्यांनी अनेक दिवस केलेल्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी विद्यापीठाने आपली चूक सुधारत या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले.

दुष्काळाच्या निधीत गैरव्यवहार

$
0
0
केंद्र सरकारकडून दुष्काळासाठी देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ‘याला जबाबदार असलेले सहकार खाते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सरकारने श्वेतपत्रिका काढावी,’ अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

'स्वाभिमानी'तर्फे ‘संघर्ष यात्रा’

$
0
0
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज, वीजबील माफ करावे, यासह दुष्काळाच्या विविध उपाययोजनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २७ मार्चला संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. जळगाव, बुलढाणा, सांगली येथून या यात्रा काढल्या जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, गजानन अहमदाबादकर, पृथ्वीराज जाचक यावेळी उपस्थित होते.

सव्वालाख पुणेकरांना काचबिंदू

$
0
0
काचबिंदूचा (ग्लॉकोमा) आजार नियंत्रित करता येत असला तरी सुमारे सव्वालाख पुणेकरांना या आजाराने ग्रासले असून त्यापैकी साठ टक्के महिलांचा समावेश आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येण्याची भीती व्यक्त होत आहे.

मतदान ओळखपत्रासाठी मदतकेंद्र

$
0
0
मतदारांना देण्यात आलेल्या छायाचित्र ओळखपत्रात दुरुस्ती करण्याबरोबरच मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात मतदार मदत केंद्र सुरू केले जाणार आहे. एप्रिल ते जून या काळात ही मदत केंद्रे सुरू राहणार आहेत.

आरोपींना भेटण्याची वेळ पूर्ववत करा

$
0
0
येरवडा जेलमधील कैद्यांच्या मुलाखतीची दुपारची वेळ जेल प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून विनाकारण बंद केली आहे. त्यामुळे वकिलांना आरोपींकडे केससंदर्भात चौकशी करणे अडचणीचे होऊ लागले आहे.

पासपोर्टसाठी अजूनही अडथळा

$
0
0
पासपोर्ट प्रक्रियेतील अडथळ्यांमध्ये ‘पोलिस व्हेरिफेशन’ हा एक नवा अडथळा नागरिकांसमोर आला आहे. पासपोर्ट प्रक्रिया ऑनलाइन झाली असली तरी पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे पुणे विभागातील पोलिसाकंडे तब्बल तीस हजार पासपोर्टचे अर्ज पेंडिंग आहेत.

तीन पिस्तुल, एक रिव्हॉल्वर जप्त

$
0
0
गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने माव‍‍ळ येथील गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तीन पिस्तुल आणि एक रिव्हॉल्वर जप्त केले आहे. गुन्हे शाखेने गेल्या दोन महिन्यांत १९ पिस्तुल आणि रिव्हॉल्वर जप्त केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.

‘एलबीटी’ नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

$
0
0
शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था करानुसार (एलबीटी) व्यापाऱ्यांनी नोंदणी करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ऑनलाइन ४७, तर प्रत्यक्ष येऊन ११ अर्ज दाखल झाले आहेत.

शाळा कंपनीकरणाविरुद्ध उद्या मोर्चा

$
0
0
महापालिकेच्या शाळा खासगी कंपन्यांना चालविण्यास देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई शिक्षण कंपनीकरण विरोधी अभियानातर्फे उद्या (शनिवारी) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्षभरात एकही निकाल नाही

$
0
0
ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अर्जदाराच्या अर्जावर ९० दिवसाच्या आत निकाल द्यावा लागतो. मात्र, गेल्या वर्षभरात पुणे जिल्हा ग्राहक मंचात एकही निकाल या कालावधीत देण्यात आलेला नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images