Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरव्ह्यू

0
0
‘महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळा’तर्फे चालविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी कँपस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

खाणीत तरुण-तरुणीचा मृतदेह

0
0
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अगरवाल खाणीत तरुण-तरुणीचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय विमानतळ पोलिसांनी व्यक्त केला.

शिक्षण हक्क कायदा कागदावरच

0
0
शिक्षण हक्क कायद्याचा गवगवा केला जात असला तरी सुमारे १८ हजार जागांपैकी केवळ सव्वातीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याची बाब पुढे आली आहे. या कायद्याअंतर्गत आणखी १५ हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणे अपेक्षित आहे.

पीएमपी घेणार दहा एसी बसेस

0
0
आयटी कंपन्या, पुणे दर्शन आणि पर्यटन वारसा या साठी दहा वातानुकूलित बसेस घेण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. या बसेससाठी सहा कोटी १२ लाख रुपये खर्च येणार आहे.

‘पीएमपी’ आता रुपयाने महाग

0
0
डिझेलच्या दरवाढीमुळे पीएमपीएमएल बस तिकिटांमध्ये प्रत्येक टप्प्याला एका रुपयाच्या दरवाढीवर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. साप्ताहिक पास, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पास दरातही वाढ झाली आहे. ही दरवाढ आजपासून (बुधवार) लागू करण्यात येत आहे.

एमबीएच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0
0
‘एमबीए’च्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने बावधन येथे सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे.

गांजा आला पुण्यात विक्रीसाठी

0
0
ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त भागातील गांजा पुण्यात विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींकडून २१ किलो गांज्यासह सव्वा लाख रुपयांता ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पवारांचे क्राइम रेकॉर्ड क्लियर

0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे उत्तर पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पाठवले आहे. दिल्ली पोलिसांच्या या पत्राने उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.

LBT च्या विरोधात व्यापा-यांचा उद्या ‘बंद’

0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) लागू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी राहिला असतानाच या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून, येत्या शुक्रवारी (१५) शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रेशनकार्ड अन् सावळा गोंधळ

0
0
रेशनकार्ड काढण्यासाठी दिलेले अनेक अर्ज आणि कागदपत्रे कामगार पुतळ्याजवळील कचराकुंडीत सापडली. रेशनकार्ड काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात मोठ्या विश्वासाने नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांची काळजी केंद्र चालक कशी घेतात हे यामुळे पुढे आले आहे.

एसटीच्याही स्लीपर कोच

0
0
आपल्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळ स्लीपर कोच बसची सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करत आहे. या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

धान्ये-जीवनावश्यक वस्तूंवर LBT नाही

0
0
सध्या जकातमाफी असलेल्या वस्तूंवर एलबीटीतूनही माफी देण्याचे तत्व राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे पुण्यात धान्ये, जीवनावश्यक वस्तू आणि जकातमाफी असलेल्या वस्तू एलबीटीतून वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LBT च्या विरोधात व्यापा-यांचा उद्या ‘बंद’

0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) लागू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी राहिला असतानाच या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून, येत्या शुक्रवारी (१५) शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रेशनकार्डांचे अर्ज कचराकुंडीत

0
0
रेशनकार्ड काढण्यासाठी दिलेले अनेक अर्ज आणि कागदपत्रे कामगार पुतळ्याजवळील कचराकुंडीत सापडली. रेशनकार्ड काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात मोठ्या विश्वासाने नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांची काळजी केंद्र चालक कशी घेतात हे यामुळे पुढे आले आहे.

कर्मचा-याचा कॅमेरा जप्त करणा-या महापालिका अधिका-यावर गुन्हा

0
0
पौड कचरा डेपो येथे होत असलेल्या चोरीचे चित्रीकरण करीत असलेल्या कर्मचाऱ्याचा हँडीकॅम बेकायदेशीररीत्या जप्त केल्याप्रकरणी औंध क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्तांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी हा आदेश दिला.

उशीर झाला... पण तरी स्वागतच!

0
0
पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिल्यामुळे प्रवाशांचा फायदा होणार असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली; त्यामुळे दोन्ही शहराची प्रगती होण्यास मदत होणार असल्याचे मत पुणे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.

विलायचीच्या ५० पोत्यांचा अपहार

0
0
अहमदाबाद येथून विलायचीची ऑर्डर बुक करून ती परस्पर चोरून नेणाऱ्या ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. राजूभाई मोहनभाई सिंधी (वय ३२, रा. सरसपूर, अहमदाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे.

कॅन्टोन्मेंट सीईओंना धमकावणा-यास अटक

0
0
सरकारी घर परत करण्याबाबत आईला नोटीस पाठविल्याच्या कारणावरून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या ‘सीईओ’ला शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून वानवडी पो‌लिसांनी एकाला अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता बोर्डाच्या ऑफिसमध्ये ही घटना घडली.

पासपोर्ट प्रक्रिया सुलभ करू

0
0
पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच नागरिकांच्या अपॉइंटमेंटची संख्या आणि वेळ वाढविण्याचे आश्वासन ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चे (टीसीएस) उपाध्यक्ष तन्मय चक्रवर्ती यांनी बुधवारी दिले.

अनधिकृत होर्डिंगांवर हातोडा

0
0
अनधिकृत होर्डिंग्जवर २४ तासांत कारवाई करा, असे मुंबई हायकोर्टाने खडसावून सांगितल्यानंतर बुधवारी सायंकाळी या कारवाईसाठी पुणे महापालिकेत धांदल उडाली आहे. गुरुवारी (१४ मार्च) सकाळपासूनच शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू करण्याचे फर्मान सुटले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images