Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लंडनच्या परीक्षेचे पुण्यात केंद

$
0
0
लंडनच्या प्रसिद्ध रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची 'एमआरसीएस' ही पदव्युत्तर परीक्षा देण्यासाठी आता इंग्लंडला जाण्याची आवश्यकता नाही.

पालिका ८४ लाखांना 'खड्ड्या'त

$
0
0
बाजीराव रस्त्यावर अनधिकृतरित्या खोदकाम करणा-या व्होडाफोन कंपनीने ८४ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार व्होडाफोन कंपनीच्या नेटवर्क ऑपरेशनच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे बस चालकांची 'रिटर्न ड्युटी' होणार बंद

$
0
0
नाशिक-पुणे या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या चालकांना करावी लागणारी 'रिटर्न ड्युटी' एक मे पासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने घेतला आहे.

पालिकेच्या प्रकल्पांना अधिकाऱ्यांच्या भेटी

$
0
0
राज्यातून आणि परराज्यांतून सध्या प्रशिक्षणासाठी पुण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पालिकेच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या.

सीओईपीकडूनदीत राडारोडा

$
0
0
पर्यावरण आणि प्रदूषणाची काळजी असल्याचे दाखवत चौकातील फ्लायओव्हरच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या 'कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग'ने (सीओईपी) बेकायदा बांधकाम करून त्याचा राडारोडा नदीपात्रात टाकला असल्याचे उघड झाले आहे.

दुष्काळग्रस्त गावांसाठी ७७८ कोटींचा प्रस्ताव

$
0
0
विभागातील दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांच्या मदतीसाठी ७७८ कोटींचा प्रस्ताव तयार करून, तो दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंदीय पथकाला देण्यात आला आहे.

सुवर्णगणेशाचे चोर सापडले

$
0
0
दिवेआगर येथील सव्वाकिलोच्या सोन्याच्या गणेशमूर्ती चोरीप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघा भावांना ताब्यात घेत या गुन्ह्याचा गुंता सोडविला आहे. नगर जिल्ह्यातील घोसपुरी गावातील दोघा पारध्यांना संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांना तपासासाठी रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यवतजवळ अपघातात पुण्याचे तिघे ठार

$
0
0
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत गावच्या जवळ शेरू धाब्याजवळ वाळूचा ट्रक व टेम्पो ट्रॅव्हलरमिनी बस यांच्यात झालेल्या अपघातात वरमाईसह तीन जण ठार व पंधरा जखमी झाले आहेत.

'रिक्षामीटर बाबत सहकार्य हवे'

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केली आहे.

'मी तुमच्यासाठी शाहरुखशी बोलेन'

$
0
0
'तुम्ही केलेले सादरीकरण कमाल होते. असा कार्यक्रम आजपर्यंत कधी पाहिला नाही. मी आता मुंबईला गेल्यावर माझ्या चार ओळखीच्या व्यक्तींशी बोलणार आहे. त्या व्यक्ती म्हणजे आमीर खान, राजकुमार हिरानी, शाहरूख खान आणि आशुतोष गोवारीकर...

खासगी शाळांना आरक्षणाचे आदेश

$
0
0
सामाजिक आणि आर्थिक मागास घटकांसाठी खासगी शाळांत २५ टक्के जागा राखून ठेवण्याची अंमलबजावणी यंदापासून होणार असून, शिक्षण उपसंचालकांकडून पुणे विभागातील दहा हजार खासगी शाळांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्मचा-यांच्या सुटीने संयोजक वेठीला

$
0
0
सुट्टीचे कारण पुढे करून देखभाल कर्मचारी ऐन सामन्याच्या वेळी उपस्थित नसल्यामुळे पिंपरीच्या मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर संयोजकांनाच पाणी फवारण्याची वेळ आली. पूर्ण पैसे भरूनही पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे संयोजकांनाच अनेकदा स्वत:च मैदानाची देखभाल करावी लागते.

तापमानात घट : पुणेकरांना किंचित दिलासा

$
0
0
शहर आणि परिसरात मंगळवारी कमाल आणि किमान तापमानात अंशत: घट झाल्याने पुणेकरांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात तुललेने तापमान खाली उतरले असले, तरी उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पा-याने चाळीशी ओलांडली आहे. येत्या दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

सिंहगड रोड भागात पाणीपुरवठा विस्कळित

$
0
0
तुकाईनगर पंपिंग स्टेशनमधील मोटार जळाल्यामुळे सिंहगड रोडवर विविध परिसरातील पाणीपुरवठा मंगळवारी विस्कळित झाला. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर दुपारनंतर या भागात पाणीपुरवठा करण्यात आला.

मंगळावर पाऊल ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य हवे

$
0
0
मंगळावर पाऊल ठेवण्यासाठी अतिशय प्रगत तंत्रज्ञानाची गरज असून, त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध अवकाश मोहीम तज्ज्ञ मार्शा आयविन्स यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

प्लॅटफॉर्म क्र. ६ च्या रुंदीकरणाला सुरुवात

$
0
0
पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या रुंदीकरणाच्या उर्वरित कामाला जून महिन्यात सुरुवात होणार असून, दोन-तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्टेशनवरील रेल्वे गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नव्या कायद्यांसाठी कायदे मंडळाला वेळ नाही

$
0
0
'रेकॉर्ड तपासणे, सभागृहात गोंधळ घालणे, कामकाज बंद पाडणे या गोष्टींमध्येच आपले कायदे मंडळ व्यग्र आहे. त्यांना नवे कायदे करायला वेळच नाही,' अशी टीका निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी बुधवारी केली.

१४ ग्रामपंयातींकडे ५८ कोटी रुपयांची थकबाकी

$
0
0
पुणेकरांकडून कोट्यवधी रुपये कर भरला जात असताना त्यांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पुणे महापालिकेकडून पाणी घेणारे पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट तसेच १४ ग्रामपंचायती पाणीपट्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडे तब्बल ५७ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कचरासेवकांनाही हवी आरोग्य सुविधा

$
0
0
घराघरातील कचरा गोळा करून सामाजिक स्वच्छतेची भूमिका पार पाडणाऱ्या कचरासेवकांना प्रशासनाने सामाजिक आणि आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे, अशी मागणी विविध देशातून आलेल्या कचरावेचक आणि त्यांच्या संघटनांनी केली.

दादा, बाबांच्या वादातच 'पीएमआरडीए' अडकले

$
0
0
दादा आणि बाबांच्या वादातच पीएमआरडीएची स्थापना अडकली आहे, त्यामुळे शहर व परिसराच्या विकासाची पीछेहाट सुरू आहे, असा आरोप आमदार गिरीश बापट यांनी सोमवारी केला. दरम्यान, मेट्रोचे काम येत्या वर्षाअखेरपर्यंत सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images