Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तळीरामाने केला हवेत ‘गोळीबार’

0
0
भांडण झाल्यामुळे शेजाऱ्याला त्रास देण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षात गोळीबार झाल्याचा कॉल करणाऱ्या तळीरामावर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नदीपात्रातील चौपाटीसह अतिक्रमणे जमीनदोस्त

0
0
महापालिकेच्या बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून संयुक्तपणे सुरू असलेली कारवाई १६ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याने या महिनाअखेरपर्यंत कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सिमेंट मिक्सरच्या धडकेत १२ वर्षांचा मुलगा ठार

0
0
येरवडा येथे डॉन बॉस्को शाळेसमोरून सायकलवर डबलसीट चाललेला बारा वर्षांचा मुलगा सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडला गेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला.

भाजप-सेनेच्या सदस्यांची मुंबई हायकोर्टात धाव

0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याच्या विरोधात भाजप-सेनेच्या सदस्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या संदर्भात कोर्टाने स्थगिती दिली नसून पुढील सुनावणी पंधरा एप्रिल रोजी होणार आहे.

तातडीने पासपोर्ट हवाय... १५ हजार रुपये द्या!

0
0
‘पासपोर्टच्या अपॉइंटमेंटसाठी पंधराशे रुपये लागतील. तत्काळ पासपोर्टसाठी पंधरा हजार रुपये भरा, पंधरा दिवसात पासपोर्ट हातात देतो. कागदपत्रे आणा लगेच पुढेच काम सुरू करतो.’

‘पीएमपी’चा तोटा २३ कोटींवर

0
0
‘पीएमपी’ला २०११-१२ या वर्षात तब्बल २२ कोटी ८७ लाख रुपये तोटा झाला असून संचित तोटा ९३ कोटी ७८ हजार रुपये आहे. केंद्र सरकारने डिझेलच्या दरात वेळोवेळी वाढ केल्यानंतरही ‘पीएमपी’ने दरवाढ टाळली होती. मात्र गेल्या काही दिवसांत बससाठी दररोज ७२ हजार लिटर म्हणजे चार कोटी ७४ लाख रुपयांचे डिझेल लागत आहे.

शिक्षकांच्या बहिष्काराला संस्थाचालकांचा पाठिंबा

0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराला महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळानेही पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच शासनाने परीक्षेचे काम न करणाऱ्या शिक्षकांची माहिती पुरविण्याची केलेली मागणीही अमान्य करत महामंडळाकडून शासनाविरोधात असहकाराचा पवित्रा घेण्यात आला आहे.

प्रीपेड रिक्षा लुबाडणारीच

0
0
पुणेकरांची लुबाडणूक रोखण्यासाठी गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रीपेड रिक्षा’ योजनेत अनेक त्रुटी असल्याचे आठवडाभरातच स्पष्ट झाले आहे. प्रवासाचे अंतर आणि दरासंदर्भात एजन्सीकडून प्रवाशांची दिशाभूल होत असतानाही वाहतूक पोलिस आणि ‘आरटीओ’ मात्र, डोळेझाक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ई-संमेलन अध्यक्षपदी भालचंद्र नेमाडे

0
0
‘युनिक फीचर्स’तर्फे आयोजित मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यंदा प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे भूषविणार आहेत. युनिक फीचर्सच्या www.uniquefeatures.in या वेबसाइटवर भरविल्या जाणाऱ्या या संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.

त्यांचे ‘गिफ्ट’ही झाले उणेपुरे २० वर्षांचे

0
0
मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समजल्यानंतर चुकलेला काळजाचा ठोका... आपला मुलगा सुखरूप आहे की नाही, याचा शोध घेताना जिवाची झालेली घालमेल आणि... त्याची खुशाली कळविण्याचा फोन आल्यानंतर सोडलेला निःश्वास... एका पुणेकर मातेच्या याच सगळ्या आठवणी ‘मटा’शी शेअर करीत होत्या, भारती निवास बालरंजन केद्रांच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे.

‘एलबीटी लागू केल्यास घरांच्या किमतीत वाढ’

0
0
जकातीऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यास पुण्यात घरांच्या किंमतीमध्ये प्रति चौरसफूट पन्नास ते साठ रुपयांनी वाढ होईल, अशी भीती क्रेडाय पुणे मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली. येत्या एक एप्रिलपासून शहरातील जकात बंद होऊऩ एलबीटी लागू होणार आहे.

स्वतःच्या मुलीला पळविणारा अटकेत

0
0
फ्लॅट घेण्यासाठी पत्नीने पैसे द्यावेत म्हणून स्वतःच्या सहा वर्षीय मुलीला पळवून नेणाऱ्या पित्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

स्त्री आहोत हे विसरून काम करा

0
0
महिलांनी स्वतःला कणखरतेने सिद्ध् करायला हवे. प्रत्येकवेळी आपण सुपरवुमन आहोत ही कसोटी पार पाडण्याची गरज नाही. लोकांच्या मानसिकतेचा विचार करण्यापेक्षा स्वतःची ध्येये शोधा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपण एक स्त्री आहोत, हे विसरून काम करा.

सूचना करण्याची पालक-विद्यार्थ्यांनाही संधी

0
0
खासगी संस्थांतील मेडिकल आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची फी निश्चित करण्याचे निकष ठरवण्यासंदर्भात आपले म्हणणे मांडण्याची संधी यंदाही विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालकांना मिळणार आहे. पुढील आठवड्यात मुंबईत या संदर्भात जाहीर सुनावणी होणार आहे.

दोन क्षण आनंदाचे!

0
0
एरवी घरकामात व्यग्र असणाऱ्या, नोकरी व्यवसायाची धावपळ करणाऱ्या, नात्यागोत्यांच्या चिंतेत असणाऱ्या महिला चक्क खळाळून हसत होत्या... आवडलेल्या विनोदाला टाळ्यांची दाद देत होत्या... नेहमीच्या सगळ्या गोष्टी विसरून आनंदाचे दोन क्षण मनमुराद अनुभवत होत्या.

प्राध्यापकांवरील कारवाई; केवळ तोंडाची वाफ!

0
0
प्राध्यापकांनी गेल्या महिनाभरापासून पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षांवर टांगती तलवार असताना, राज्य सरकार मात्र कारवाईची फक्त भाषाच करीत आहे. तसेच, कारवाईबाबतचा निर्णय विद्यापीठांवर ढकलण्यात आला आहे.

‘रुपी’चे संचालक जाणार ‘रिझर्व्ह बँके’च्या भेटीला

0
0
ठेवीदार, खातेदार यांना बँकेतून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवून मिळावी आणि बँकेवर घालण्यात आलेली आर्थिक बंधने शिथिल करावीत या साठी ‘रुपी को-ऑपरेटिव्ह बँके’चे प्रशासकीय संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची १४ मार्चला मुंबईत भेट घेणार आहे.

सरकारकडून अजून कारवाईची फक्त भाषाच

0
0
प्राध्यापकांनी गेल्या महिनाभरापासून पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षा धोक्यात आल्या असताना राज्य सरकार मात्र अजून कारवाईची फक्त भाषाच करीत आहेत. तसेच, कारवाईचा निर्णय विद्यापीठांवर ढकलण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक मीटरसाठी ३० एप्रिलची ‘डेडलाइन’

0
0
शहरातील रिक्षांना ३० एप्रिलपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीत मीटर न बसविणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले जातील, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले.

माननीयांच्या ‘सौजन्या’ला लवकरच बसणार चाप

0
0
बाकड्यांपासून ते कचऱ्याच्या बकेटपर्यंत, सोसायट्यांच्या नावांपासून ते स्वच्छतागृहांपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रभागातील माननीयांची नावे झळकविण्यास या पुढे ‘ब्रेक’ लागणार आहे. वॉर्डस्तरीय निधीतून करण्यात येणाऱ्या कामांवर ‘सौजन्या’ची पाटी लिहिणे बंद करण्याचा धाडसी निर्णय महापालिकेतील पक्षनेत्यांनी मंगळवारी घेतला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images