Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कामगार संघटनांची संपादरम्यान निदर्शने

$
0
0
देशभरातील कामगार संघटनांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या संपादरम्यान शहरात ठिकठिकाणी सभा व निदर्शने करण्यात येणार आहेत. पुण्यातील सर्व कामगार संघटना या संपात सहभागी होणार आहेत.

१३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

$
0
0
पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून तेरा लाखाहून अधिक नागरिकांना ७०५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात सर्वाधिक म्हणजे २७७ टँकर सोलापूर जिल्ह्यात वापरण्यात येत असून आतापर्यंत १६० कोटी रुपये खर्च टँकरवर करण्यात आला आहे.

विकासकामांचा ‘अॅक्शन रिप्ले’

$
0
0
कोट्यवधी रुपयांचा निधी त्याच त्याच कामांवर खर्च करण्याच्या प्रकारांना चाप लावण्याची मागणी खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सोमवारी केली आहे.

विद्यार्थी संख्या कळवण्यास ज्युनिअर कॉलेजांना मुदतवाढ

$
0
0
येत्या १६ मे रोजी होणा-या ‘एमटी-सीईटी’साठी किती विद्यार्थी बसू इच्छितात, याची संख्या कळविण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांना २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

अधिष्ठाता पडताळणार निकाल

$
0
0
परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यातील त्रुटींमुळे निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी निकाल जाहीर होण्यापूर्वी पुणे विद्यापीठाकडून आता काळजी घेण्यात येणार आहे.

इंजिनीअरिंग निकालासाठी आता पालकही अधीर

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे मे २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंगच्या परीक्षांच्या निकालांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी सोडविताना विद्यापीठ प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. अशातच यंदाच्या शैक्षणिक वर्षातील इंजिनीअरिंगच्या पहिल्या सत्राच्या निकालांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे.

निष्कलंक चारित्र्य पाहून मतदान करा

$
0
0
‘पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी दोघेही चर्चेत आहेत. परंतु एकाने भ्रष्टाचारात ग्रॅज्युएशन केले असले, तर दुसरा पोस्ट ग्रॅज्युएशन करेल, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी लगावला.

यंदा थंडीच्या लाटेचा मुक्काम ‘मिनिमम’

$
0
0
एकामागोमाग वाढलेला वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे सहा-सात दिवस टिकणाऱ्या थंडीच्या लाटेने यंदा ‘मिनिमम’ काळातच मुक्काम आवरता घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात सर्वत थंडीची तीव्रता वाढली असली, तरी हा कडाका दोन दिवस स्थिर राहून त्यानंतर अंशतः कमी होण्याची शक्यता आहे.

गॅस वितरकांकडून लूट

$
0
0
ग्राहकांना सवलतीच्या दरात आणखी दोन गॅस सिलिंडर देऊन केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीकडून विनाअनुदानितसह अनुदानित सिलिंडरलाही ९५० रुपये दर आकारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राज्य सहकारी संघात १०६९ कोटींचा घोटाळा

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या जमीन विकसन करार, सेवक भविष्य निर्वाह निधी आणि अनामत रकमांमध्ये १०६९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दीड लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

$
0
0
बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले. या प्रकरणी जयश्री जयसिंग वीर (वय - ४४, रा. दिघी कॅम्प) यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पुढील वर्षीपासून वेळापत्रक अधिक काटेकोर

$
0
0
बारावीच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वाच्या पेपरांच्या दरम्यान अभ्यासासाठी पुरेसा कालावधी ठेवण्याची दक्षता पुढील वर्षीपासून काटेकोरपणे बाळगली जाईल. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा उपक्रमही सुरू राहणार आहे.

‘चेस इन स्कूल’ ५ हजार शाळांत हवे

$
0
0
‘येथे गुणवत्तेची कमतरता नाही. बुद्धिबळाचा प्रसार खेडोपाडी अधिकाधिक प्रसार व्हायला हवा. आगामी एक-दोन वर्षांत महाराष्ट्रात पाच हजार शाळांत ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात यावा,’ असे मत ‘फिडे’चे उपाध्यक्ष आणि फिडे चेस इन स्कूल कमिशनचे चेअरमन अली निहात याझिकी यांनी व्यक्त केले.

आठ वर्षांच्या मुलीवर पिंपरीत बलात्कार

$
0
0
चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून पळून जाणाऱ्या परप्रांतीय युवकाला पोलिसांनी सोमवारी (१८ फेब्रुवारी) अटक केली. रामप्रकाश घुरवू यादव (वय २० रा. खंडोबामाळ भोसरी, मुळ उत्तर प्रदेश) असे अटक करण्यास आलेल्या आरोपीचे नाव आहे.

राज्य सरकारी कर्मचारी संपात फूट

$
0
0
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपात फूट पडली आहे. कामगार नेते ग. दि. कुलथे यांच्या राजपत्रित अधिकारी महासंघाने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षांचा सहभाग नाही

$
0
0
देशव्यापी संपात काही रिक्षा संघटना सहभागी होणार असल्या तरी शहरातील सर्वच वाहतूक सुरू राहणार आहे. ‘पीएमपी’, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवा दोन्ही दिवस सुरळीत राहणार आहे.

‘वराह साम्राज्या’त पक्ष्यांचा राजा दीन

$
0
0
भटक्या कुत्र्यांची समस्या जरा कुठे कमी होत असल्याचे दिसत असताना तळजाई टेकडीवर आता डुकरांनी उपद्रव सुरू केला आहे. टेकडीवर ससे, मोर अथवा इतर वन्यप्राणी नव्हे तर, डुकरांचेच साम्राज्य सध्या सध्या पाहायला मिळते आहे.

शंभरी ‘उस्मानभाई गिल्डर’ची

$
0
0
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये वर्षानुवर्षे सर्व जाती, धर्माचे लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. यामध्ये उस्मानभाई गिल्डर या पेढीनेही महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या या कार्याला नुकतीच १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

गरज आहे ती पुन्हा ‘लोकअदालती’ची

$
0
0
जेलमध्ये खितपत पडलेल्या कैद्यांची सुटका व्हावी यासाठी येरवडा जेलमध्ये ऑगस्ट २०१२ मध्ये पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रथमच भरविण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये तब्बल २७६ केसेस निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता.

आदिवासींची घरे प्रकाशाने उजळली

$
0
0
गेली कित्येक वर्षे काळोख्या अंधारात जगणारी दुर्गम भागातील आदिवासीबहुल ३०० गावे आणि ८०० वाड्या सौर दिव्यांनी उजळल्या आहेत. अपारंपरिक साधनांवर जगणाऱ्या या आदिवासींना याच साधनांवर निर्माण झालेल्या विजेने साथ दिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images