भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या हिमालयाच्या कुशीतील सरोवराचे नाव ‘मान’ की ‘मानस’ यावरूनचा वाद आता लंडनमधील ‘रॉयल जिओग्राफिकल सोसायटी’कडे पोहोचणार आहे.
मान की मानस...
↧
↧
३ हजार शाळांवर टांगती तलवार
खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर राज्य सरकारच्या शिफारस समितीने नव्या अटी लादल्यामुळे तब्बल तीन हजार ११५ शाळांच्या अस्तित्वावर सध्या टांगती तलावर आहे.
↧
१८ व १९ फेब्रुवारीला पाणी बंद
महापालिकेच्या केदारेश्वर झोनमधील मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती करायची असल्याने स्वारगेट पाणीपुरवठा केंद्रातून पाणी सोडण्यात येणाऱ्या शहराच्या काही परिसराचा पाणीपुरवठा येत्या सोमवारी (१८ फेब्रुवारी) आणि मंगळवारी (१९ फेब्रुवारी) बंद राहणार आहे.
↧
सरकार म्हणते, 'आधार' ऐच्छिकच!
गॅस सिलिंडरच्या सबसिडीपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अत्यावश्यक आहे, असा फतवा केंद्र सरकारची विविध खाती, मंत्रालये जारी करत असतानाच, दुसरीकडे 'आधार' सक्तीचे नव्हे, तर ऐच्छिक असल्याचा जाहीर खुलासाच 'आधार'च्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आला आहे.
↧
२ महिने होऊनही इंजिनीअरिंगचा निकाल नाही
परीक्षा होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला, तरीही पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग विद्याशाखेच्या प्रथम सत्राच्या परीक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. पदवी प्रमाणपत्रातील चुका, फॉर्म भरण्यातील समस्या आणि पुनर्मूल्यांकनातील घोटाळ्यांनंतर आता निकालाला विलंब अशा दुष्टचक्रात विद्यार्थी अडकले आहेत.
↧
↧
‘नेट’च्या विद्यार्थ्यांना ‘अॅन्सर की’ची प्रतीक्षा
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) ३० डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्टची (नेट) ‘अॅन्सर की’ दीड महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले विद्यार्थी रिझल्टच्या चिंतेत आहेत.
↧
‘गायकवाड खुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा’
चंद्रकांत गायकवाड यांच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) केली आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याच्या राग धरून गायकवाड यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.
↧
१.५ लाखाचा ऐवज असलेली बॅग पळवली
लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन रोकड आणि सोन्याचे दागिने असा दीड लाख रुपये किमतीचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने लांबविल्याचे उघडकीस आले आहे. रेसिडेन्सी क्लबमध्ये शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
↧
रिक्षा पंचायत संपात सहभागी; पण अर्धा दिवसच
पुण्यातील रिक्षा संघटना संपापासून लांब राहणार असून, रिक्षा पंचायत २० फेब्रुवारीला दुपारी एक ते सायंकाळी पाचपर्यंत रिक्षा बंद ठेवणार आहे. पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनने मात्र संपात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
↧
↧
'ब्रेनडेड' पेशंटच्या 'लिव्हर'दानाने जीवदान...!
दारूच्या व्यसनाने आयुष्य धोक्यात आलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला दुस-या 'ब्रेनडेड' पेशंटने 'लिव्हर'दान करून त्यांना जीवदान दिले. लिव्हर (यकृत) ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर काही दिवसांनी सुखरूप परतलेल्या त्या पेशंटच्या चेह-यावर पुन्हा आयुष्य मिळाल्याचा आनंद तरळू लागला.
↧
कामगार संघटनांचा देशव्यापी संपाला पठिंबा
कामगार संघटनांच्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाला पुण्यातील विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून, प्रत्यक्ष संपात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा आदी संघटना संपात सहभागी होणार आहेत.
↧
विवाहितेची आत्महत्या : पती आणि दीराला अटक
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या आरोपावरून तिचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंदेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पती आणि दीराला अटक झाली आहे. हडपसरमधील लक्ष्मी कॉलनीत १८ जानेवारीला ही घटना घडली होती.
↧
सासवड पालिकेने वादग्रस्त आरक्षणे वगळली
नागरिक व बाधित शेतक-यांच्या हरकती व सूचना आणि शहर कृती समितीने केलेल्या जोरदार आंदोलनामुळे सत्ताधारी गटाने नगरविकास विभागाकडून वादग्रस्त ठरलेल्या ८१ पैकी तब्बल २४ आरक्षणे वगळली आहेत.
↧
↧
‘डीपी’भोवती फिरते ‘स्थायी’च्या जागा
महापालिकेच्या स्थायी समितीच्या जागांची निवड शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याभोवती (डीपी) फिरू लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांची नावे आता स्थायी समितीच्या स्पर्धेत पुढे आली आहेत.
↧
कायदा मोडणा-या डॉक्टरांवर कारवाई
गर्भलिंगनिदानविरोधी कायद्यानुसार दोषी आढळलेल्या सुमारे वीस डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने निलंबनाची कारवाई केल्याचे समजते. यात लातूर, कोल्हापूर, जळगाव, पुणे येथील डॉक्टरांचा समावेश आहे.
↧
'रिपब्लिकन'तर्फे बोपोडीत आंदोलन
राज्यातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबई-पुणे हायवेवर बोपोडी येथे रविवारी (१७ फेब्रुवारी) रास्ता रोको करण्यात आला. पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ विभागाच्या वतीने आयोजित आंदोलनात सोनई येथील हत्याकांड प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, सर्व आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करावी आणि पिडीत कुटुंबाला दला लाख रुपये देऊन शासनात नोकरीला घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
↧
'सेट'च्या भाषांतराने उमेदवार 'अपसेट'
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात लेक्चरर होण्यासाठीची प्रमुख पात्रता असलेल्या ''सेट'' परीक्षेच्या रविवारी झालेल्या पेपरमध्ये भाषांतर आणि वाक्यरचनेच्या अनेक चुका दिसून आल्या.
↧
↧
निराधार सरकार कसा देईल 'आधार'?
‘एकीकडे आधार कार्ड ऐच्छिक आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे सरकारच्या सर्व योजनांसाठी ते सक्तीचे करावयाचे, हा प्रकार म्हणजे जनतेची दिशाभूल करणारा आहे. खरे तर सरकारच निराधार झाले आहे. ते कसले सामान्यांना ‘आधार’ देणार?, यासारख्या संतप्त प्रतिक्रिया वाचकांनी ‘मटा’च्या फेसबुकवर पेजवर व्यक्त केल्या.
↧
२ कोटींचे दागिने परत मिळतील का?
अवघ्या तासाभराच्या कालावधीत रास्ता पेठेतील सराफी पेढी फोडून सुमारे दोन कोटी रुपयांच्या दागिन्यांची झालेली चोरी अजूनही गुलदस्त्यातच आहे. चोरट्यांचा ठावठिकाणा सापडल्याचा दावा पोलिसांकडून जरी करण्यात येत असला तरी त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांच्या पदरी अपयशच आले आहे.
↧
पुण्यात पुन्हा हुडहुडी
अवघ्या २४ तासांत पुण्याचे किमान तापमान थेट नऊ अंशांनी घसरले आणि रात्री-पहाटे वाढलेल्या तीव्र गारठ्यामुळे पुणेकरांनी पुन्हा ‘दुलई’ पांघरली. किमान पारा रविवारी १०.४ अंशांवर स्थिरावला. राज्यात इतरत्रही गारपिटीनंतर गारठ्याने पुनरागमन केले असून, नाशिक येथे राज्यातील नीचांकी ८.६ अंश सेल्सियस तापमानाची झाली.
↧
More Pages to Explore .....