Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोस्टाच्या स्टॅम्पलाही थीम सुचवा

0
0
पोस्टाचे स्टॅम्प जमवण्याचा अनेकांना छंद असतो. पण आता नागरिकांनाच स्टॅम्पसाठी संकल्पना (थीम) सुचवता येणार आहे. त्यासाठी पोस्ट विभागाने खास योजना जाहीर केली आहे.

फक्त आठ लाख जणांना ‘आधार’

0
0
राज्यातील एक कोटी ८० लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त आठ लाख विद्यार्थ्यांना ‘आधार’ देणे शक्य झाले आहे. तसेच, पाच लाखांहून अधिक शिक्षकांपैकी एक लाख ३२ हजार जणांचीच आधार नोंदणी पूर्ण होऊ शकली आहे.

९० लाखांची चोरी : एकास अटक

0
0
हिंजवडी एमआयडीसी येथील ‘फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीच्या ऑफिसमधून ८९ लाख ४८ हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पॉलिमर्स करणार सांडपाणी स्वच्छ

0
0
नैसर्गिकरीत्या उपलब्ध तंतुमय पदार्थांपासून तयार केलेल्या पॉलिमर्सच्या आधारे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीची साधी आणि सोपी पद्धत पुण्यातील संशोधकांनी शोधून काढली आहे.

'सुरक्षित' पुण्यात रेप केस वाढल्या

0
0
पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढत असून, गेल्या वर्षी सर्वाधिक असे ८५ गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे महिला अत्याचाराचे गुन्हे घटले असल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात येत असला, तरी बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक बनली आहे.

आदिवासींना समरस करण्याची आवश्यकता

0
0
‘राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने आदिवासी जनजातींना भारतीय जनजीवनाशी समरस करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत पंधराव्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव टोपले यांनी केले.

राज ठाकरे यांच्या दौ-यास पुण्यातून प्रारंभ

0
0
ग्रामदैवत कसबा गणपतीला साकडे घालून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यास शनिवारी प्रारंभ केला. यानिमित्त मनसेच्या वतीने रोडशो काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

ट्रक अपघातात २ मजूर ठार; ६ जखमी

0
0
मुळशी येथे पुणे- लवासा रस्त्यावर तीव्र वळणावर वाळूने भरलेला एक ट्रक उलटल्याने दोन मजूर ठार तर सहाजण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हडपसरमध्ये कामगाराचा खून

0
0
कंपनीतील काम आटोपून घरी परतत असताना अनोळखी व्यक्तीबरोबर झालेल्या भांडणातून एका कामगाराचा गळा चिरुन खून करण्यात आला. हडपसर येथील इंडस्ट्रियल इस्टेट येथे शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

धनावडे खून : आणखी ७ अटकेत

0
0
भिलारेवाडीचे उपसरपंच संतोष धनावडे यांच्या खूनप्रकरणी राजगड पोलिसांनी आणखी सातजणांना अटक केली आहे. त्यांना शनिवारी पुण्यात सुट्टीच्या कोर्टात पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

‘पीपीपी’ रस्त्यांवरून राष्ट्रवादी एकाकी

0
0
शहराच्या ठराविक भागातील रस्ते; तेही वाढीव दराने पीपीपी मॉडेलने करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडली आहे. पीपीपीच्या रस्त्यांसाठी वाढीव दराची टेंडर्स मान्य करण्यास काँग्रेस आणि शिवसेना-मनसेने विरोध केला आहे.

स्ट्रॉबेरी खा, मनसोक्त !

0
0
महाबळेश्वरची अस्सल लालचुटूक स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी मिल्क शेक, स्ट्रॉबेरी मिल्क शेक विथ आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी चॉकलेट, जॅम आणि जेरी खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर, स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलला ‍‍भेट द्या! येत्या सोमवारपर्यंत टिळक रोडवरील आचार्य अत्रे सभागृहात हे फेस्टिव्हल सुरू राहणार आहे.

आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळेच विलंब

0
0
महात्मा फुले मंडई परिसरातीली मालतीबाई काची प्रसूतीगृह सुरू करण्यास आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळेच विलंब होत असल्याची टीका नगरसेवक मिलिंद काची यांनी केली.

पटसंख्येऐवजी देशासाठी हवा विद्यार्थ्यांचा वापर

0
0
‘देशाच्या वाढत्या लोकसंख्येमधील सर्व घटकांना उच्चशिक्षण पुरविणे हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. देशातील विद्यापीठ आणि कॉलेजांच्या वाढीचा वेग कायम राहिल्यास, १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत देशात ९८० विद्यापीठे आणि ४७ हजारांवर कॉलेजांची स्थापना होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
0
दारूच्यानशेत एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिंपरीतील खराळवाडी येथे शुक्रवारी (आठ फेब्रुवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रघुनाथ तायप्पा दाते (वय ६०, रा. खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

पुण्यातील डोंगरमाथा हिरवागारच हवा...

0
0
प्रदूषण टाळून पुणेकरांचे जीवन सुसह्य करायचे असेल, तर येथील डोंगरमाथा हिरवागारच राहिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.

दररोज दोन-चारशे भाक-या थापायच्या कोणी?

0
0
शालेय पोषण आहारात ज्वारीची भाकरी देण्याची योजना आखली गेली खरी, पण त्यासाठी दररोज दोन-चारशे भाकऱ्या थापायच्या कोणी हा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे.

कामे वेळेत हवीत; तर आधी भरती करा

0
0
राज्यात वाहने वाढली आहेत. मात्र, ‘आरटीओ’तील यंत्रणा ‘जैसे थे’च राहिली. परिणामी, आधीच संख्येने अपुऱ्या असणा-या कर्मचा-यांवर मोठा ताण येत आहे, असे गा-हाणे मांडून ‘लोकांची कामे वेळेत करायची असतील तर, आधी कर्मचारी भरती करा, अशी मागणी ‘आरटीओ’तील कर्मचा-यांनी केली.

पाण्याच्या टबमध्ये पडून बालकाचा मृत्यू

0
0
खेळताना पाण्याच्या टबमध्ये पडल्याने एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीमध्ये शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

पक्षात पूर्णवेळ पदाधिकारी हवेत

0
0
‘मला संघटनेत अध्यक्षांपासून सगळे पूर्णवेळ पदाधिकारी हवे आहेत,’ अशा स्पष्ट शब्दांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची झाडाझडती घेतली. संघटनेतील सर्व रिक्त पदे येत्या पंधरा दिवसांत भरण्याचा आदेशही त्यांनी यावेळी दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images