Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनधिकृत बांधकामाबाबत अध्यादेश लवकरच

0
0
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा अध्यादेश येत्या आठ दिवसांत काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी (आठ फेब्रुवारी) येथे दिले. त्याचबरोबर तोडगा निघतोय म्हणून पुन्हा अनधिकृत बांधकामे करू नका, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या वेळी दिला.

असा टाळा फेसबुकशी ‘फेस-ऑफ’

0
0
फेसबुकवर फोटो किंवा वैयक्तिक संवेदनशील माहिती देऊ नये कारण ती शेअर किंवा टॅग केल्यास इतरांकडून तिचा गैरवापर केला जाण्याची शक्यता असते. फेसबुकवर सरकार किंवा देशविरोधात मजकूर टाकल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली केस चालवली जाऊ शकते, अशी माहिती मुंबई हायकोर्टातील वकील अॅड. युवराज नरवणकर यांनी शुक्रवारी दिली.

अपंग मुलीवर बलात्कार

0
0
अपंग मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला सात वर्षे सक्तमजूरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. बी. भिलारे यांनी हा निकाल दिला.

घरे ‘बीडीपी’च्या आरक्षणातून वगळावी

0
0
वारजे येथील बीडीपीच्या आरक्षित जागेवर गरिबांनी बांधलेली घरे या आरक्षणातून वगळण्यात यावीत. तसेच ही घरे नियमित करावीत, अशी मागणी नगरसेवक सचिन दोडके यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

सहकारनगरमध्ये तणाव ‘फ्लेक्सयुद्धा’चा

0
0
महापालिका निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते सुभाष जगताप आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल जाधव यांच्यात गुरुवारी रात्री फ्लेक्सयुद्ध रंगले.

पार्किंग नियमावलीला अखेर १५ वर्षांनी मूहुर्त

0
0
राज्य सरकारकडे सुमारे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि १५ वर्षांनी बदललेल्या पार्किंग नियमावलीला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली.

राजपत्रित अधिकारी देणार २ दिवसांचे वेतन

0
0
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या जनतेच्या मदतीसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपले दोन दिवसांचे वेतन शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे. येत्या एप्रिल व मे महिन्याच्या वेतनातून दोन दिवसांचा पगार सरकारी तिजोरीत जमा करावा असे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे.

आरटीओ कर्मचा-यांचे आजपासून अधिवेशन

0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रशासक, कार्यालयीन अधीक्षकासारखी पदे भरण्यात यावी यासारख्या विविध मागण्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

‘राष्ट्रवादी’ने विश्वासात न घेतल्याचा आरोप

0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशान्वये पालिका प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असली, तरी सत्तेतील भागीदार काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कारवाईला विरोध केला आहे.

हवेली तहसील कार्यालयाचे अखेर विभाजन

0
0
हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून पिंपरी-चिंचवडसाठी वेगळे तहसील कार्यालय स्थापन केले जाणार आहे.

बचाव पक्षाच्या वकिलांना न्यायाधीशांनी सुनावले

0
0
साक्षीदाराच्या पिंज-यात साक्ष देणा-या साक्षीदारावर खोटे बोलण्याचा आरोप करीत पेचात पकडणा-या बचाव पक्षाच्या वकिलांना न्यायाधीश आणि साक्षीदाराने कोर्टात खडे बोल सुनावले.

‘ताईं’च्या मानापमानाला राजकारणाची फोडणी

0
0
महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि महिलांची प्रगती या विषयांवर भर देणा-या महिला नेत्यांमध्येच शुक्रवारी ‘तूतू-मैंमैं’चा खेळ रंगला अन् ‘ताईं’च्या मानापमानाच्या अंकाला राजकीय फोडणी लाभली!

‘एक्स्प्रेस वे’वर कलावंतांची जनजागृती

0
0
अतिवेग... लेनकटिंग..., रिफ्लेक्टर नसणे... यासारख्या मानवी चुकांमुळे एक्स्प्रेस-वेवर घडणा-या अपघातांना रोखण्यासाठी शुक्रवारी तब्बल सहा तासांहून अधिक काळ सर्व वाहनचालकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

सारसबागेजवळ आचा-याचा खून

0
0
मूळच्या उस्मानबाद येथील परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सारसबाग परिसरात राहणाऱ्या एका आचाऱ्याचा गुरुवारी मध्यरात्री सारसबागेजवळ खून झाला.

बुधवार पेठेत ‘मेकॅनाइज्ड कार पार्किंग’

0
0
बुधवार पेठेतील मजूर अड्डा येथे ‘मेकॅनाइज्ड कार पार्किंग’ प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प ‘डीबीओटी’ आणि ‘व्हीजीएफ’ तत्त्वावर राबवण्यात येणार असून, त्यासाठी कंत्राटदाराला महापालिकेकडून सुमारे दोन कोटी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत.

पॉलिटेक्निक कॉलेजला कामगिरीनुसार अनुदान

0
0
पॉलिटेक्निक कॉलेजना यापुढे सरसकट अनुदान न देता, कॉलेजच्या कामगिरीनुसार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योग जगताच्या गरजांनुसार नवीन अभ्यासक्रमांची रचना केली जाणार आहे.

लोहगाव विमानतळाजवळ बांधकाम निर्बंधात वाढ

0
0
लोहगाव विमानतळाच्या परिसरातील नऊशे मीटरच्या बांधकामांवर निर्बंध लागू केले असतानाच त्यात आता आणखी दहा गटांतील जमिनीवर बांधकामांवर मर्यादा घालण्याचा हवाई दलाचा प्रस्ताव आहे. हे दहा गट लवकरच नोटिफाय केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आबांचे जानेवारीचे वेतन दुष्काळ निवारणासाठी

0
0
राज्याला बसत असलेले दुष्काळाचे चटके कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि सरकारी अधिकारी व कर्मचा-यांनी आपले वेतन द्यावे, असे आवाहन करणा-या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वतःचे एक महिन्याचे ५७ हजार रुपयांचे वेतन शुक्रवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले.

प्रमाणपत्र भाडेतत्त्वावर देणा-या ‘फार्मासिस्ट’वरही कारवाई

0
0
औषध दुकानात काम न करता ‌किंवा औषधांची विक्रीही न करता फार्मासिस्टचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रमाणपत्र भाडेतत्त्वावर देऊन दुकान मालकाकडून दरमहा हजारो रुपयांची आर्थिक ‘कमाई’ अनेक फार्मासिस्ट करीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

सोळा लाखांचा गुटखा जप्त

0
0
राज्यात गुटखाबंदी लागू असताना जुन्नरमध्ये विविध कंपन्यांच्या सोळा लाख रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्याची कारवाई ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) केली. या प्रकरणी जुन्नर येथील एका व्यापाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images