Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नरोबाला कोर्टाची तंबी

$
0
0
आपल्या तोलामोलाचे लग्न लावून दिले नाही म्हणून लग्नाच्या पहिल्या दिवशी आत्महत्येची धमकी देणाऱ्या आणि माहेराहून ५० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणावेत म्हणून पत्नीवर वारंवार पिस्तुल उगारून तिला मारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरुद्ध शिवाजीनगर कोर्टात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंर्तगत केस दाखल करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पालिका-पोलिस ‘साथ-साथ’

$
0
0
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मुंबईच्या धर्तीवर सिग्नल सुसूत्रीकरणाचे (सिंक्रोनायझेशन) काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रमुख चौकांमध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल बसविण्यात येणार आहेत.

रेडझोनच्या हद्दीचा घोळ

$
0
0
वर्क्स ऑफ डिफेन्स अॅक्टनुसार लष्कराला लागणाऱ्या जागांसाठी नोटिफिकेशन काढले जाते. त्यात जमिनीचे क्षेत्र, गट नंबर तसेच चतुःसीमा याचा उल्लेख असतो.

‘आधार’च्या नोंदणीला वर्षभर मुदतवाढ द्या

$
0
0
आधार कार्डच्या नोंदणीची कूर्मगती आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या यांचा ताळमेळ बसविणे अशक्य कोटीतील बाब होत असल्याने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी मागणी समाजकल्याण खात्याने केली आहे.

चारा डेपोंचे व्हिडिओ शूटिंग वादात

$
0
0
पुरंदर तालुक्यातील चारा डेपोमधून वाटप झालेल्या चाऱ्याच्या व्हिडिओ शूटिंगचे बिल तब्बल सव्वासहा लाख रुपये आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बिलाची सखोल तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

नगरसेविकांच्या सिमला दौऱ्याला ब्रेक

$
0
0
महापालिकेतील ‘कारभारणीं’च्या सिमला दौऱ्याला तूर्तास ‘ब्रेक’ लागला आहे. सिमल्यात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम ‘काही अपरिहार्य कारणामुळे’ पुढे ढकलण्यात आल्याचे संयोजक संस्थेनेच महापालिकेला कळविले आहे.

पासपोर्ट व्हेरिफिकेशन ऑनलाइन

$
0
0
नागरिकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन फॉर्म पासपोर्ट विभागाला ऑनलाइन पाठविण्यासाठी पुणे पोलिसांनी पावले उचलली असून या महिनाअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त राजेंद्र माने यांनी व्यक्त केला.

जखमी महिलेसाठी मंत्र्यांचा मदतीचा हात

$
0
0
अपघातांमधील जखमींना वाऱ्यावर सोडून जाण्याची वाहतूकसंस्कृती रस्तोरस्ती पाहण्यास मिळत असताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मात्र, बाणेर रोडवरील अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात दिला.

एन्ड्युरो स्पर्धेत १३ संघांचा सहभाग

$
0
0
एरवी बातम्यांमागे धावणारे माध्यमांचे प्रतिनिधी आता साहसी खेळांमध्येही आपले कसब आजमावणार आहेत. निमित्त आहे ‘एन्ड्युरो ३’ स्पर्धेचे. यंदा प्रथमच मोठ्या संख्येने माध्यमांचे संघ या स्पर्धेत उतरले आहेत.

तरुणाला पाच वर्षे सक्तमजुरी

$
0
0
एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका तरुणाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्ड यांनी हा निकाल दिला.

पुणे- युके शैक्षणिक सहकार्य

$
0
0
पुण्यातील शिक्षण संस्थांना यूकेमधील विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी ब्रिटिश कौन्सिलतर्फे विशेष पुढाकार घेतला जाणार आहे.

नारळीकर, जब्बार पटेलांचा गौरव

$
0
0
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्यासह सहाजणांना यंदाचा पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठामध्ये येत्या रविवारी (१० फेब्रुवारी) होणाऱ्या स्थापनादिन समारंभामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

उदंड झाल्या सोनसाखळी चो-या

$
0
0
पुणे शहरात २०११ च्या तुलनेत गेल्यावर्षी गुन्ह्यांमध्ये तुलनात्मक घट झाली असून, घरफोडी, वाहन चोरीचे गुन्हेही कमी घडले आहेत. अपवाद मात्र, सोनसाखळ्यांवर डल्ला मारण्याच्या गुन्ह्यांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे महिलावर्ग कमालीचा धास्तावला आहे.

CM पिंपरी चिंचवडच्या दौ-यावर

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी (आठ जानेवारी) पिंपरी- चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी महापालिका आणि प्राधिकरणातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे.

सेल्समनने फोडले पहिल्या लग्नाचे बिंग

$
0
0
‘जीवनसाथी’ शोधण्यासाठी तिने एका वेबसाइटचा आधार घेतला. ‘आयटी’त रग्गड पगार घेणाऱ्या एका तरुणाशी तिचे लग्नही झाले. पण आपल्या नवऱ्याचे आधीच एक लग्न झाल्याचे कळताच तिला धक्काच बसला. साड्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या सेल्समनमुळे नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचे बिंग फुटले असून या तरुणीने तिच्या नव-याला कोर्टात खेचले आहे.

MSRDC:दोन अधिकारी जखमी

$
0
0
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी व सर्व्हे करण्यासाठी आलेल्या रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंत्याच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन्ही अधिकारी किरकोळ जखमी झाले.

टाकीत पडून ७ वर्षांचा मुलाचा मृत्यू

$
0
0
सोसायटीतील अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीत पडून एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कोंढवा येथील शिवनेरीनगर येथे शुक्रवारी ही घटना घडली. धीरज पांडागळे (वय ७) असे मृत्यू झालेल्या लहान मुलाचे नाव आहे.

पिछाडीची मुख्यमंत्र्यांकडून कबुली

$
0
0
शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, ऊर्जा आणि संशोधन या क्षेत्रांत महाराष्ट्र अजूनही पिछाडीवर असल्याची कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

सुरक्षा नियम डावलणा-या २४८ वाहनांवर कारवाई

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना सुरक्षित वाह‌तुकीच्या नियमांचे पालन न करणा-या २४८ वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रादे‌शिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे.

दस्तूर शाळेविरोधात गुन्हा

$
0
0
शाळेच्या कारभारातील त्रुटींबाबत शिक्षण अधिकायांनी आठ वर्षांपासून वेळोवेळी समज देऊनही या त्रुटी दूर न केल्याबद्दल कँपमधील दस्तूर शाळेविरूद्ध जिल्हा परिषदेतर्फे शुक्रवारी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images