Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कल्पक प्रायोजकत्वामुळे एन्ड्युरोला मिळाला आकार

$
0
0
कल्पक आणि दूरदृष्टी असलेल्या प्रायोजकांमुळेच एन्ड्युरो स्पर्धा सर्वार्थाने उभी राहू शकली. साहसी क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी अशा खंबीर आधाराची गरज आहे, असे मत एन्ड्युरोचे संयोजक प्रसाद पुरंदरे यांनी व्यक्त केले.

‘आधार’साठी २ हजार नवी नोंदणी यंत्रे खरेदी करणार

$
0
0
सबसिडी मिळण्यासाठी आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती आणि त्या तुलनेत आधार नोंदणीसाठी उपलब्ध असलेल्या मशिनची अपुरी संख्या लक्षात घेऊन दोन हजार नवीन मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाषेबाबत उपलब्ध पुराव्यांची अभ्यासपूर्ण छाननी आवश्यक

$
0
0
‘द्राविडी भाषांचा प्राचीन इंडो-आर्यन (संस्कृत) भाषांवर पडलेल्या प्रभावासंबंधीच्या संशोधनात त्रुटी आहेत. त्यासाठी वापरण्यात आलेल्या पुराव्यांचे स्वरूप असमाधानकारक आहे.

शिक्षणहक्काने आणली शाळांवरच गदा!

$
0
0
घटनादत्त स्वातंत्र्याच्या न्यायाने अल्पसंख्याक समाजाच्या शाळांना शिक्षणहक्क लागूच होत नाही. तरीही, शिक्षणाधिकारी केवळ ख्रिश्चन समाजाच्या शाळांनाच वेठीस धरत आहेत. हे प्रकार कायम राहिल्यास शिक्षणसंस्थांच बंद करण्याचा इशारा ख्रिश्चनधर्मीय संस्थांनी दिला आहे.

बीडीपीच्या निर्णयामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान

$
0
0
राज्य सरकारने २३ गावांमध्ये बायोडायव्हरसिटी पार्क (बीडीपी) आरक्षण ठेऊन आठ टक्के ग्रीन टीडीआर देण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याचे स्थानिक नगरसेवक विकास दांगट यांनी सांगितले.

अहिरे गावचे मार्चमध्ये पुनर्वसन

$
0
0
सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) लावलेले निर्बंध आणि प्रसंगी गावचे रस्तेही बंद होण्यासारख्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या अहिरे ग्रामस्थांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

रात्रीही औषध दुकानांची तपासणी

$
0
0
दुकानांमध्ये फार्मासिस्ट हजर राहतात की नाही, याची दिवसासह आता रात्रीही तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. त्यामुळे फार्मासिस्टच्या अनुपस्थित औषध विक्रीस लगाम लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

खासगी वाहनांमधूनही होते बेजबाबदार विद्यार्थी वाहतूक

$
0
0
स्कूलबसपाठोपाठ खासगी वाहनांमधूनही बेजबाबदारपणे विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे बुधवारी आढळून आले. अशा २० खासगी व्हॅनवर कारवाई करण्यात आली असून, गेल्या तीन दिवसांत १४५ स्कूलबस आणि अन्य वाहनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

‘रेड झोन’ची हद्द कायम

$
0
0
देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) हद्द सीमाभिंतीपासून दोन हजार यार्डांपर्यंतच कायम करण्यात आली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चिखली, तळवड्यापासून प्राधिकरणातील हजारो मालमत्ता अडचणीत येणार आहेत.

तलाठ्यांचा राज्यव्यापी बंद मागे

$
0
0
जमीन नोंदीविषयक तक्रारींमध्ये तलाठ्यांनाच आरोपी करणाऱ्या सीआरपीसी १५६ (३) कलमात बदल, तलाठी सज्जांची पुनर्रचना, नवीन तलाठ्यांना सहा महिने प्रशिक्षण, तलाठी भरती बंदी उठविण्यासारख्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याने तलाठी महासंघाने बुधवारी राज्यव्यापी बंद मागे घेतला.

आरोपीनेच फोनवर दिली खुनाची माहिती

$
0
0
नयना पुजारी खून प्रकरणातील आरोपी विश्वास कदम याने खराडी येथून एक महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून केल्याची माहिती फोनवरून दिली होती.

अटकपूर्व जामिनांच्या अर्जात वाढ

$
0
0
राजकीय घराणे आणि सत्तेची अरेरावी करणाऱ्या घरातील ती श्रीमंत मुलगी...लग्नानंतर सासरच्या लोकांना क्षुल्लक कारणावरून त्रास...तर कधी हातात चाकू घेऊन आत्महत्येची धमकी...पोलिसात गेले तर त्यांची अर्वाच्च भाषा. त्यात तिने बरेवाईट करून घेतले तर जेलची हवा खावी लागेल ही भीती.

४५ रस्ते मोकळा श्वास घेणार?

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील ४५ प्रमुख रस्ते आणि फुटपाथवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांच्या विरोधात उद्यापासून (गुरुवार) कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

६० लाखांचा गुटखा नष्ट करणार

$
0
0
अहमदाबादेहून हुबळीला पुण्यामार्गे जाणाऱ्या एका कंपनीच्या साठ लाख साठ हजार रुपये किमतीचा जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याची परवानगी देताना, हायकोर्टाने संबंधित कंपनीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे गुटखा नष्ट करण्याचा अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) मार्ग मोकळा झाला आहे.

राज यांच्या दौऱ्याचा पुण्यात मुहूर्त

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात येत्या रविवारी (१० फेब्रुवारी) साताऱ्यातून होणार असली, तरी या दौऱ्याचा मुहूर्त आदल्या दिवशी पुण्यात केला जाणार आहे.

विना‘आधार’, नाही अनुदान

$
0
0
‘आधार’ची सक्ती केवळ ‘कॅश ट्रान्स्फर’पुरतीच मर्यादित असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सरकारनेच ‘आधार’ नाही, तर अनुदान नाही, असा फतवा काढला आहे.

मांग गारुडी समाजातील लाभार्थींना एक लाखाचे कर्ज

$
0
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मांग गारूडी समाजातील पाचशे वंचितांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे पाच कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

पाच मिनिटांत दोन सोन साखळी चोऱ्या

$
0
0
खराडी येथे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘चिमणराव-गुंड्याभाऊं’च्या स्मृतींनी पिकवला हशा!

$
0
0
चिं. वि. - साहित्यातले आणि आठवणीतले’ या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशानाचे ! संध्या बोडस-काणे आणि अलका जोशी-मांडके यांनी संकलित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन! ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, बाळ कर्वे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या उपस्थितीत हा समारंभ रंगला. या कार्यक्रमाला ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’चे अवघे कुटुंबच उपस्थित होते.

वाढत्या गुन्ह्यांत नेटवर्किंग साइट्सचा हात

$
0
0
शहरातील वाढत्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाटा सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा आहे. पुणे शहरात गेल्यावर्षी घडलेल्या १०८ सायबर गुन्ह्यांपैकी ६० गुन्हे एकट्या सोशल नेटवर्किंग साइटच्या संदर्भातील आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images