Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हवामान विभागाचे ‘अपडेटेड अॅप’ लवकरच

$
0
0
हवामान अंदाजासह कमाल-किमान तापमान, पाऊस, वाऱ्याचा वेग याची माहिती देणा-या हवामान विभागाच्या ‘मोबाइल अॅप’मध्येही आमूलाग्र सुधारणांची अपेक्षा ‘यूजर्स’नी व्यक्त केली आहे.

प्रक्रिया केलेल्या दुधावरील व्हॅट रद्द होणार

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रक्रिया केलेल्या दुधावर व्हॅट (मूल्यवर्धित कर) आकारण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला. तो रद्द करण्याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असून, परिणामी या दुधाच्या भावातील वाढ टळणार आहे.

ससूनमधील लाचखोर फार्मासिस्ट गजाआड

$
0
0
ससून रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्टला १८०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी अटक केली. होलसेल विक्री करणा-या औषध विक्रेत्याकडून सात टक्के कमिशनची मागणी करणा-या फार्मासिस्टला ससून रुग्णालयातच ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्यापीठातील झाडांसाठी सलाइनची मात्रा !

$
0
0
राज्यात बिकट होत चाललेली पाण्याची समस्या, पुणेकरांना पाण्याचा भासणारा तुटवडा आणि या परिस्थितीमध्ये झाडे जगवण्याचे आणि ते वाढविण्याचे असणारे आव्हान लक्षात घेत पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने आता सलाइनच्या बाटल्यांचा आधार घ्यायचे ठरविले आहे.

विद्यार्थ्यांची हेळसांड तातडीने थांबवा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून निकाल प्रक्रियेमध्ये होत असलेला विलंब आणि पेपर तपासणीमध्ये प्राध्यापकांकडून झालेल्या हेळसांडीमुळे अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल आता राजकारण्यांच्या कोर्टातून लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुस्लिमांसाठी राखीव जागा द्या !

$
0
0
मुस्लिम समाजाला लोकसंख्येनुसार राखीव जागा द्याव्यात तसेच दहशतवादाचा नावाखाली निरपराध मुस्लिम युवकांना पुराव्याशिवाय अटक करण्यात येऊ नये, अशी मागणी ‘जमियत उलेमा ई हिंद’ या संघटनेने केली आहे.

‘ते’प्रमाणपत्र नसल्याने नोकरी हुकली

$
0
0
राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक हातात असतानाही, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) तसे प्रमाणपत्र अद्याप न मिळाल्यामुळे एका उमेदवाराला पुणे जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये मिळत असलेल्या प्राध्यापकपदाच्या नोकरीस मुकावे लागले.

डोक्यात रॉड घालून पत्नीचा खून

$
0
0
मार्केटयार्ड परिसरातील प्रेमनगर वसाहतीत राहणा-या पतीने मंगळवारी सकाळी आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा खून केला. खुनाच्या घटनेनंतर पतीनेच पोलिस ठाणे गाठत आपल्या कृत्याची कबुलीही दिली.

मुदत संपलेल्या खाद्य पदार्थांची विक्री

$
0
0
सहकारनगर येथील एका दुकानात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्याचा प्रकार एका ग्राहकाच्या हुशारीमुळे उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन सुमारे दीड हजार रुपयांचा माल जप्त केला.

राज्यात ४२ ‘ट्रॉमा केअर सेंटर’

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर दिवसागणिक होणाऱ्या अपघातांची गांभिर्याने दखल घेण्यात आली असून, राज्यात ४२ ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे.

वाहतूक पोलिसांनाही लालफितीचा फटका

$
0
0
औंध येथे वाहतूक पोलिसांसाठीच्या मुख्यालयाची फाइल गेली तीन महिने पोलिस महासंचालक कार्यालयातच पडून आहे. पुणे पोलिसांनी गेल्या दीड वर्षांपासून पाठविलेला हा प्रस्ताव मुंबईत लालफितीत अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

विना‘आधार’, नाही अनुदान

$
0
0
‘आधार’ची सक्ती केवळ ‘कॅश ट्रान्स्फर’पुरतीच मर्यादित असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सरकारनेच ‘आधार’ नाही, तर अनुदान नाही, असा फतवा काढला आहे.

‘महावितरण’चे दोघे लाचखोर अधिकारी गजाआड

$
0
0
इलेक्ट्रीक कॉन्ट्रक्टरकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या निगडी प्राधिकरणातील ‘महावितरण’चे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, ज्युनिअर इंजिनीअरसह एका ठेकेदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

‘हनी बनी’च्या ग्राहकांचा ‘कॉल ड्रॉप’

$
0
0
देशात सर्वत्र, ‘रिंग ऑल इंडिया’ अशी जाहिरात करणाऱ्या प्रसिद्ध मोबाइल कंपनीची शहरातील सेवा मात्र विस्कळीत झाली आहे. गेल्या दोन दिवसांत या कंपनीच्या अनेक ग्राहकांनी ‘कॉल ड्रॉप’चा अनुभव घेतला असून, त्यामुळे महत्त्वाचे संभाषण मध्येच तुटत असल्याची तक्रार केली जात आहे.

प्राध्यापकांचे आंदोलन सध्यातरी सुरूच राहणार

$
0
0
राज्यभरातील ज्युनिअर आणि सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी झालेल्या बैठकांमध्ये शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे या प्राध्यापकांकडून आपल्या आंदोलनांविषयीचा पवित्रा कायम ठेवण्यात आला आहे.

नागरिक-कर्मचाऱ्यांत जोरदार खडाजंगी

$
0
0
शहरभरात सुरू असलेल्या आधार केंद्रांवरील सर्वसामान्य नागरिकांची नोंदणी थांबवून विद्यार्थ्यांची नोंदणी प्राधान्याने करण्याचे काम सुरू होत आहे.

विविध बनाव करीत सोनसाखळया चोरी

$
0
0
पुणे शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना उत आला असून, गेल्या चोवीस तासात निगडी, हिंजवडी, वडगाव शेरी आणि येरवडा येथे चार गुन्हे नव्याने नोंदले गेले. या गुन्ह्यांमध्ये अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला.

पुढील वर्षीपासून ‘IT’ऐवजी ‘ICT’

$
0
0
इयत्ता दहावीसाठी पुढील वर्षीपासून (सन २०१३-१४) माहिती तंत्रज्ञान हा विषय माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) या स्वरूपात असणार आहे.

‘एक्स्प्रेस-वे’चे ‘सेफ्टी ऑडिट’ वा-यावरच

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वरील अपघात रोखण्यासाठी उपाय आखण्याची पावले पुढे सरकू लागली असतानाच गेल्या नऊ वर्षात या मार्गाचे ‘सेफ्टी’ ऑडिटच झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

लातूर बसस्टॅण्डवरून एटीएसने अटक केली

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगने दहशतवाद विरोधी पथकाने त्याला लातूर बसस्टॅण्ड येथून १९ ऑगस्ट २०१० रोजी अटक केली होती, असा जबाब बुधवारी कोर्टात दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images