Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाइपलाइन फुटली; दुरुस्तासाठी ९ तास

$
0
0
टिंगरेनगर येथील सावंत पेट्रोल पंपाजवळ पाइपलाइन फुटल्याने एकतानगर आणि परिसरात पाणी घुसल्याने सकाळी सहा वाजता नागरिकांची धांदल उडाली. महापालिकेला पाइपलाइन दुरुस्तीसाठी तब्बल नऊ तास लागले.

गायब झालेले बसस्टॉप वर्कशॉपमध्ये सापडले

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) शिवाजीनगर आणि रेंजहिल्स येथून चोरीला गेलेले तीन बसस्टॉप नांदेडफाटा येथील दळवीवस्तीत असलेल्या एका वर्कशॉपमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे शुक्रवारी सापडले.

‘एनसीसी’च्या शूटिंगमध्ये मुलाला लागली गोळी

$
0
0
राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान गोळी लागून लॉयला हायस्कूलचा एक विद्यार्थी जखमी झाला. सेनापती बापट रोडवरील ‘एनसीसी’च्या मैदानात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

वीस वर्षीय महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग

$
0
0
केल्याप्रकरणी घरमालकाला दोन वर्षे साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. देवरे यांनी ही शिक्षा सुनावली. बल्लाप्रसाद भैय्यालाल राठोड (वय ४४) असे या घरमालकाचे नाव आहे.

पाटील इस्टेट झोपटीजवळ ब्राऊन शुगर जप्त

$
0
0
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पाटील इस्टेट झोपडी परिसरात ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २९० ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या छाप्यात एक रेकॉर्डवरचा आरोपी पळून गेला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

पत्नीच्या खून, पतीला जन्मठेप

$
0
0
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.

MPSC करणा-यांना नवे चॅलेंज

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अभ्यासक्रमांच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अभ्यासक्रमाची रचना केल्यामुळे आता यूपीएससीचे उमेदवारही एमपीएससी देण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे एमपीएससीतील स्पर्धा वाढली आहे.

पुणे तेथे स्वच्छतागृहे उणी

$
0
0
‘विद्येचे माहेरघर’ असलेल्या आणि आयटी पार्कमुळे जागतिक पातळीवर नावाजलेल्या पुण्याचे स्वच्छतागृहांबाबतचे चित्र आजही निराशाजनक असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण शहर स्वच्छता आराखडा बनवताना पुण्यात उघड्यावर शौचालयांच्या १०३ जागा आढळून आल्या आहेत.

देशातील ५ भाषा लुप्त

$
0
0
‘भारतातील चार ते पाच भाषा पूर्णतः नष्ट झाल्या असून, तब्बल १९६ भाषा या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या भाषा नष्ट झाल्यास त्यात उपलब्ध ज्ञान, पूर्वजांचे संचित, संस्कृती या सर्व गोष्टी नष्ट होण्याची भीती आहे.

सॅनिटरी नॅपकिनपासून खतनिर्मिती

$
0
0
शहरातील सॅनिटरी नॅपकिनपासून होणा-या कचऱ्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने स्वच्छतागृहांमध्येच सॅनिटरी नॅपकिन ‘इन्सिनरेटर्स’ पद्धतीने जाळून आणि ‘बायोकन्व्हर्जन’ने कच-यातून खतनिर्मिती करण्याची योजना आखली आहे.

‘व्हॉट्सअॅप’ चौकशीच्या घेऱ्यात

$
0
0
मोबाइल अॅप्समध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’वर खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, लवकरच संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

रोज सकाळी हात शिवशिवतो: राज

$
0
0
‘अमुक एखादे व्यंगचित्र का काढले, असे काढायला नको होते, यासारखे प्रश्न अलीकडे उपस्थित केले जात आहेत. पूर्वी असे नव्हते. बाळासाहेबांनी तर अशा अनेक अचाट कल्पना चितारल्या आहेत,’ असे सांगत, ‘सकाळी उठल्यानंतर रोज नव्या कल्पना सुचतात. रोज हात शिवशिवतो; पण व्यंगचित्र काढू कुठे, हेच कळत नाही, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुंबईच्या डबेवाल्यांची पुणेकरांना भुरळ...

$
0
0
वर्षाला पंचेचाळीस लाखांचा टर्नओव्हर... दिवसाला दोन लाख ग्राहकांचे हित आणि समाधान जपण्यासाठी कार्यरत असणारे पाच हजार लोक, म्हटले तर कामगार, म्हटले तर शेअर होल्डर्स...

सुट्टीच्या काळातच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी

$
0
0
शालेय कामकाज सुरू असताना शिक्षकांना निवडणुकीच्या कामाच्या जबाबदाऱ्या यापुढे दिल्या जाणार नाहीत. शाळांच्या सुटीच्या काळातच शिक्षकांना हे निवडणुकीचे काम दिले जाणार आहे.

महापालिकेलाच जाते चुकीचे वीजबिल

$
0
0
महापालिका आणि महावितरण यांच्यातील वादाला महावितरणने दिलेले चुकीचे विजेचे बील कारणीभूत ठरले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

महापालिकेचे दोन बसस्टॉप चोरीस

$
0
0
कॅन्टोंमेंट बोर्डासाठी बसस्टॉप पुरविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरूद्ध शिवाजीनगर येथील महापालिकेच्या दोन बसस्टॉपची चोरी केल्याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकल चोरल्याप्रकरणी शिक्षा

$
0
0
मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी एकाला तीन महिने कैद आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी एस. एम. कनकदंडे यांनी हा निकाल दिला.

नवऱ्याला आणि सासऱ्याला कोठडी

$
0
0
लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून आणि व्यवस्थित मराठी बोलता येत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नवऱ्याला आणि व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.

कमिटेड डेव्हलपमेंट बीडीपीतून वगळणार

$
0
0
समाविष्ट गावांमधील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानांच्या आरक्षणांच्या जागेवर बांधकामास परवानगी न देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शनिवारी शिक्कामोर्तब केले.

लहानग्या खेळाडूंवर मुलायमसिंहांची ‘माया’

$
0
0
विविध राजकीय मंडळी दाखवीत असलेल्या दातृत्वाबद्दल नेहमीच लिहिले जाते; पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी नुकत्याच दाखविलेल्या दातृत्वाने देशभरातून शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेले खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांचे पालक चकीत होऊन गेले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images