Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जिवंतपणी देशसेवा;मृत्युनंतर रुग्णसेवा

0
0
जिवंतपणी त्यांनी जीवावर उदार होत देशाचे रक्षण केले...निवृत्तीनंतर समाधानाने जगताना त्यांना आजारपणाने गाठले. आजाराशीही त्यांनी दोन हात केले, पण शेवटी मृत्युच्या दाढेतून ते वाचू शकले नाहीत. तरीही, हे जग सोडण्यापूर्वी आपल्या दोन्ही किडन्या दान करत त्यांनी देशप्रेमाची अनोखी प्रचिती दिली.

पहिल्या सत्राच्या 'सीट'वरच दुसऱ्या सत्राची परीक्षा

0
0
पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता दोन्ही सत्रांच्या परीक्षांना एकच आसनक्रमांक असेल! तसेच 'ऑनलाइन' परीक्षांचा निकाल परीक्षा झाल्यावर लगेचच लावण्याबाबतही निर्णय झाला आहे.

शाळांनी ठेवले शिक्षणहक्काला वर्गाबाहेर

0
0
वैदिक पाठशाळा, मदरसे यांच्यासारख्या धार्मिक शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्था वगळता देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणहक्क कायदा लागू करण्याची महत्त्वाची दुरूस्ती शिक्षण हक्क कायद्यामध्ये करण्यात आली आहे.

तरुणीच्या खोट्या तक्रारीने तरुणाच्या नशिबी जेलवारी

0
0
प्रेमप्रकरणाचे बिंग फुटू नये म्हणून एका तरुणीने पोलिसांकडे खोटी तक्रार दिली. परिणामी कोणतीही चूक नसताना एका व्यक्तीला जेलमध्ये जावे लागले.

रात्रीच्या प्रवासाला ‘झी मराठी’ची नो एंट्री

0
0
‘एक्स्प्रेस वे’वर होणाऱ्या अपघातांवर सरकारी पातळीवर तोडगा निघालेला नसला, तरी खबरदारी म्हणून ‘झी मराठी’ने एक उपाय योजला आहे, तो म्हणजे रात्री प्रवास न करण्याचा!

पुणे विद्यापीठातील झाडांसाठी आता सलाइनची मात्रा !

0
0
राज्यात बिकट होत चाललेली पाण्याची समस्या, पुणेकरांना पाण्याचा भासणारा तुटवडा आणि याही परिस्थितीमध्ये झाडे जगवण्याचे आणि ते वाढविण्याचे असणारे आव्हान लक्षात घेत पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने आता सलाइनच्या बाटल्यांचा आधार घ्यायचे ठरविले आहे.

‘ज्याच्याकडे पैसा त्यालाच पाणी’

0
0
‘पाणी देणे हे पूर्वी पुण्यकर्म समजले जात असे. पण, आज पाण्याची उधळपट्टी सुरू असून ज्याच्याकडे पैसा त्यालाच पाणी हे सूत्र झाले आहे,’ अशी खंत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.

‘२६/११च्या हल्ल्यातील पोलिसांच्या चुकांवर पांघरुण’

0
0
मुंबई पोलिसांनी २६/११ च्या हल्ल्यातील चुका लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विनिता अशोक कामटे यांनी केला. डॉ. नीतू मांडके मित्र परिवारातर्फे डॉ. मांडके यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीमती कविता करकरे, विनिता कामटे सहभागी झाल्या होत्या.

बनावट शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक

0
0
बनावट शिक्षण संस्थेद्वारे ‘एमबीए’ला प्रवेश देत सुमारे साडे अकरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुणेकरच होणार

0
0
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पुणेकरच होणार असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी राहण्यासाठी हाय प्रोफाइल असलेल्या पाषाण परिसराला पसंती दिली आहे. त्यांच्या नव्या राहत्या सरकारी बंगल्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे.

अपंग बचाव आंदोलन चार फेब्रुवारीपासून

0
0
प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे अपंग व्यक्तींच्या विविध मागण्यांसाठी चार फेब्रुवारीपासून ‘अपंग बचाव’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो अपंग व्यक्ती देहू ते मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यापर्यंत अपंगांच्या हक्कांची पालखी घेऊन पायी दिंडी काढणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना कोर्ट अवमानाची नोटीस येते तेव्हा...

0
0
‘एनडीए’तील छात्राचा मुठा नदीच्या पुरात मृत्यू होऊन सहा वर्षे उलटल्यानंतरही सरकारी मदत न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांना अलाहाबाद कोर्टाच्या अवमानाच्या नोटिशीला सामोरे जावे लागले आहे.

‘निराधरां’चा मनस्ताप वाढणार

0
0
नोंदणी करुन दीड दोन वर्षे उलटल्यानंतही आधार कार्ड न मिळालेल्या नागरिकांना आता पुन्हा एकदा ‘आधार’च्या नोंदणीसाठी रांगेत थांबण्याचा मनस्ताप सोसावा लागण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात पाणीपट्टीवाढीला विरोध नको

0
0
‘धरणातून पाणी आणण्यासाठी लागणाऱ्या खर्चाइतकाच किंवा त्यापेक्षा अधिक खर्च पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येतो. पैशांशिवाय पाणी स्वच्छ होऊ शकत नाही. मैलापाणी नदीत मिसळल्याने दौंड, भिगवण भागातील नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे.

'त्या' १९५ जणांवर कारवाई

0
0
पुणे- मुंबई एक्स्प्रेस- वेवर सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी (३१ जानेवारी) वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १९५ वाहनांवर स्पीडगन रोखण्यात आली. या कारवाईत राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरीलाही महामार्ग पोलिसांनी वगळले नाही.

अखेर जिल्हा प्रशासन झाले जागे!

0
0
गेल्या महिन्याभरात ‘एक्स्प्रेस वे’ वर दहापेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेल्यानंतर वाढत्या अपघातांवर उपाययोजना करण्याची जाग जिल्हा प्रशासनाला आली आहे.

मान्सूनची लपाछपी 'रडार'वर

0
0
पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे का, तो किती दिवसांचा असेल, पावसाची संततधार कोणत्या काळात अपेक्षित आहे... यांसारख्या प्रश्नांचा शोध घेऊन मान्सूनच्या ‘अॅक्टिव्ह’ आणि ‘ब्रेक’ कालावधीची माहिती देण्यासाठी हवामान विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप

0
0
महिलांवर होणारे अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पुण्यातील उद्योजकाने मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. गुन्हेगाराच्या हालचाली, फोटो आणि व्हिडीओ टिपून ते तत्काळ पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे पाठविण्याची व्यवस्था या अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे.

धरणांचा पाणीसाठा मृतवत

0
0
उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्याचा प्रवास तळाकडे सुरू झाला आहे. प्रमुख धरणांमध्ये सद्यस्थितीत ४३ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, मराठवाड्यातील धरणांच्या साठ्याची स्थिती चिंताजनक आहे.

उपसरपंचावर शिंदेवाडीत जीवघेणा हल्ला

0
0
भिलारवाडी येथील उपसरपंच संतोष धनावडे यांच्यावर गुरुवारी रात्री शस्त्रात्राने हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची माहिती पसरताच हॉस्पिटलच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शहर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images