Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जीवनावश्यक वस्तूंवर जकात आकारू नये

$
0
0
जीवनावश्यक वस्तूंवर जकात आकारल्यास महागाईत भरच पडेल. अशा काळात पुणेकरांना दिलासा देण्याची गरज असताना महापालिकेचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे ‘दी पूना मर्चंटस चेंबर’ने म्हटले आहे.

मंत्र्यांच्या कारखान्यांना गरिबांचे वावडे

$
0
0
राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित कर्मवीर सहकारी साखर कारखाना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या माळेगाव साखर कारखान्याला गोरगरिबांसाठी रेशनची साखर देण्याचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शताब्दीत ‘नगररचना’ होणार लोकाभिमुख

$
0
0
शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी ब्रिटिश काळात स्थापन झालेले नगररचना संचालनालय यंदा शताब्दी वर्ष साजरा करीत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी (३० जानेवारी) संचालनालयाच्या वेबसाइटचे उद्घाटन करून या शताब्दीला सुरुवात होणार आहे.

हायटेक युगातही बाप्पांचे नियमित स्मरण

$
0
0
चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पांचे स्मरण करून यशोकामना करण्याची परंपरा हायटेक युगामध्येही सुरू असून दर मंगळवारबरोबरच चतुर्थीला मंगलमूर्तीचे दर्शन घेणा-या भाविकांनी सारसबाग फुलून जाते. एक जानेवारीला अंगारकी चतुर्थीचा योग आला होता.

लहान मुलीचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

$
0
0
भाचीच्या कानातील सोन्याच्या रिंगा चोरल्याच्या संशयाने लहान मुलीचे अपहरण तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार खराडी येथे घडला. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली.

शिक्षणहक्काच्या प्रवेशाला मुदतवाढ

$
0
0
हक्काच्या प्रवेशासाठी कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शिक्षणहक्क कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या २५ टक्के जागा भरल्या जाईपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.

इंजिनीअरिंगच्या २८ विद्यार्थ्यांवर अन्याय

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षांच्या पुनर्मुल्यांकनामध्ये झालेल्या घोटाळ्यांमध्ये इंजिनीअरिंगच्या २८ विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे वास्तव विद्यापीठाकडून मान्य करण्यात आले.

पाच गुटखा विक्रेत्यांविरोधात तक्रार

$
0
0
गुटख्याची विक्री करणा-या पाच जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून विक्रेत्यांना आता पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागणार आहेत. वारजे, भोसरी, ताथवडे आणि पिंपरी येथील पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.

‘पीपीपी’ टेंडरच्या चौकशीचे आदेश

$
0
0
शहरात खासगी सहभागातून (पीपीपी पद्धतीने) रस्ते विकसित करण्याच्या टेंडरविषयीच्या तक्रारींप्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी करून अहवाल मागविला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच या टेंडरबाबत पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.

४ विक्रेत्यांना औषध ‘विक्री बंद’चे आदेश

$
0
0
फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषध विक्री करणा-या आणखी चार औषध विक्रेत्यांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. आतापर्यंत साठपेक्षा अधिक दुकानांची तपासणी करून त्यापैकी २४ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नोकरीच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

$
0
0
कोरेगाव पार्क परिसरात राहणा-या २३ वर्षीय तरुणीला आरोग्य खात्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग करणा-या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.

चाकण फोकसमध्ये!

$
0
0
मूलभूत सोयींचा वेगाने विकास, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियोजित प्रकल्प, पुण्याचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आणि टाउनशिपचे शहर यामुळे चाकण हा भाग ‘रिअल इस्टेट हब’ म्हणून नावलौकिक मिळवत आहे.

वेगमर्यादेबाहेरील २१५ वाहनांवर कारवाई

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातांची संख्या वाढल्यानंतर महामार्ग पोलिसांनी मंगळवारी ‘स्पीड गन’वरील धूळ झटकून वेगमर्यादेचे उल्लंघन करणा-या २१५ वाहनचालकांवर कारवाई केली. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अपघातस्थळांची पुन्हा पाहणी केली.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्‍थेचा १ दिवस संप?

$
0
0
केंद्र सरकारने डिझेल दरवाढीच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास येत्या २० किंवा २१ फेब्रुवारी रोजी देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडून एक दिवसाचा संप पुकारला जाण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अडचणीत सापडली आहे.

पूना कॉलेजच्या क्लर्कला अटक

$
0
0
एकवीस नापास विद्यार्थ्यांना पास करणा-या विद्यापीठातील कर्मचा-यांच्या अटकेनंतर पूना कॉलेजच्या एका क्लर्कला चतुश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

गरीबांसाठी टाइप प्लॅन घरे प्रत्यक्षात !

$
0
0
शहराच्या हद्दीपासून दहा किलोमीटर अंतरावर राहणा-या गरीबांना आता त्यांच्या स्वप्नातील घर कोणत्याही सरकारी क्लिष्ट प्रक्रियेविना बांधता येणार आहेत. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी त्यासाठी ‘टाइप प्लॅन’ घरांची नवी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

हर्नियाच्या आजारावर ऑपरेशन हाच पर्याय

$
0
0
हर्निया या आजारावर ऑपरेशन हाच एकमेव पर्याय असून कोणत्याही औषधाने अथवा व्यायाम, योगासनांद्वारे हा आजार बरा होत नसल्याचे हर्निया उपचाराचे तज्ज्ञ डॉ. मोहन देसरडा यांनी स्पष्ट केले.

गांधीजींनीही केले दलितांच्या उद्धारासाठी काम

$
0
0
‘महात्मा गांधी हे उत्कृष्ट वकील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजासाठी लढत असताना, सवर्ण समाजात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांविषयी अपराधाची भावना निर्माण करण्याचे काम गांधींनी केले,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र इतर राज्यांना पुन्हा वीज पुरविण्याच्या वाटेवर

$
0
0
गेल्या काही वर्षांत आजूबाजूच्या राज्यांकडून वीज खरेदीची वेळ आलेला महाराष्ट्र पुन्हा इतर राज्यांना पुरविण्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातील खासगी वीज कंपन्या आता आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशाला वीजपुरवठा करण्याच्या तयारीत आहेत.

वाहन चालकांकडून शिस्तीचे उल्लंघन

$
0
0
शासनाच्या वतीने एक्स्प्रेस वेवर विविध उपाय योजना राबविल्या आहेत; परंतु वाहन चालकाकडून सातत्याने वेग मर्यादा आणि लेनच्या शिस्तीचे उल्लंघन होत असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images