Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मार्केट यार्ड भागातून सोनसाखळीची चोरी

$
0
0
मार्केट यार्ड येथे पायी चाललेल्या महिलेच्या ग‍ळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरील दोघा आरोपींनी पळून गेले. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायाधीशांच्या मध्यस्थीने जोडप्याचा संसार सावरला

$
0
0
दारूड्या पतीकडून होणा-या असह्य छळाला कंटाळून पतीसह सासरच्या लोकांविरूद्ध केस दाखल केलेल्या विवाहितेला कोर्टात न्यायाधीशांनी केलेल्या समुपदेशनामुळे ख-या अर्थाने न्याय मिळाला.

सुरक्षित प्रवासासाठी कलाकारांचा पुढाकार

$
0
0
एक्स्प्रेस-वे वर नियम मोडणा-यांना कठोर दंड व्हायला हवा... वाढते अपघात रोखण्यासाठी त्वरेने दुभाजक बसविला गेले पाहिजेत.... अन् केवळ खासगी कंपन्यांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी सरकारने परदेशातील हाय-वेच्या धर्तीवर सीसीटीव्हीसारखी यंत्रणाही उभारायला हवी.

विद्यालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0
हडपसर-माळवाडी येथील एका विद्यालयात अल्पयवीन मुलाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी सकाळी घडला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नोकरीच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

$
0
0
कोरेगाव पार्क परिसरात राहणा-या २३ वर्षीय तरुणीला आरोग्य खात्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग करणा-या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.

वाळूचे लिलाव आता ऑनलाइन

$
0
0
वाळू भूखंडाचा लिलाव करताना होणारे गैरप्रकार आणि वादावादी थांबविण्यासाठी वाळूचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच वाळूचे लिलाव ऑनलाइनने होणार आहे.

प्रा.मधूसुदन कौंडिण्य यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. मधूसुदन विष्णू कौंडिण्य (वय ८०) यांचे सोमवारी पुण्यात निधन झाले. संगमनेर कॉलेजचे प्राचार्यपद ३२ वर्षे समर्थपणे भूषवणारे कौंडिण्य नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागांत केलेल्या समाजोपयोगी विधायक कामांसाठी परिचित होते.

पुणेकरांना महागाईचा फटका

$
0
0
विरोधक भाजप-सेनेला काँग्रेसची साथ आणि प्रमुख विरोधक मनसेचा राष्ट्रवादीला सहकार्याचा हात; असा पॅटर्न गेल्या काही काळात महापालिकेत उदयास आला आहे. याच राष्ट्रवादी-मनसे पॅटर्नच्या मतदानावर पुणेकरांना महागाईचा फटका देणारा जकातवाढीचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीमध्ये मंजूर झाला.

कारखरेदी:३२ जणांना २ कोटींचा गंडा

$
0
0
कार खरेदी करून देण्याच्या नावाखाली ३२ जणांना दोन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. या प्रकरणी मोहन मुरलीधर राजुरकर उर्फ कुलकर्णी (वय ३२, रा. पर्वतीदर्शन मित्रमंडळ कॉलनी, मूळ राहणार उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे.

प्रॉपर्टीवर करवाढीची कु-हाड?

$
0
0
प्रॉपर्टी टॅक्समध्ये सहा टक्के वाढ करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर आता पुणेकरांवर आणखी करवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिक्षण हक्क कायद्याची 'ऐशी तैशी'

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या मोफत शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच तिच्या अर्जावरून गोंधळ निर्माण झाला आहे. हे अर्ज उपलब्ध नसल्याचे शाळांकडून सांगण्यात येत असल्याने दस्तुरखुद्द पालकांवरच आता जिल्हा प‌रिषदेत चकरा मारण्याची वेळ आली आहे.

‘कपाळमोक्ष’ अखेर टळणार

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर सक्षम दुभाजकाअभावी होणारे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी लोणावळा ते तळेगाव नाक्यापर्यंतच्या वीस किलोमीटरच्या अंतरात ८० ते ९० सेंटीमीटर उंचीचे (सुमारे तीन फूट) सिमेंटचे दुभाजक बसविले जाणार आहेत.

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

$
0
0
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे पुन्हा एकदा बदनाम झाली असून शहारातील एका उच्चभ्रू सोसायटीत टाकलेल्या छाप्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी पाच दलालांसह १२ मुलींना ताब्यात घेतले असून यातील दोन मुली विदेशी आहेत.

सर्वच पातळ्यांवर सुधारणा हव्यात

$
0
0
‘पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे विभागाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे विभागाविषयी समाजामध्ये निर्माण झालेली अविश्वासाची भावना बदलण्यासाठी विभागाशी निगडीत सर्वच पातळ्यांवरील कामकाजामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

बनावट प्रश्नपत्रिका : सांगवीत २ जणांना अटक

$
0
0
बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांच्या आठ बनावट प्रश्नपत्रिका तयार करून त्या सोळा हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या दोन विद्यार्थ्यांना दरोडा प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली.

चिठ्ठी आयी है....

$
0
0
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्यांची मुदत उद्या (बुधवारी) समाप्त होत आहे. या समितीमधून वगळण्याच्या प्रक्रियेत आपल्या नावाची चिठ्ठी येऊ नये, यासाठी सर्वच माननीयांनी नशिबावर हवाला ठेवला आहे.

प्रॅक्टिकल परीक्षांवर बहिष्कार

$
0
0
बारावीची परीक्षा एकीकडे वेळापत्रकावरून गाजत असताना ज्युनिअर कॉलेज शिक्षक महासंघाने ४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षांवरही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

हिमायत बेगचा जबाब नोंदविणे सुरू

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी हिमायत बेगचा जबाब नोंदविण्यास मंगळवारी सुरुवात करण्यात आली. बेगला ५२ प्रश्न विचारण्यात आले. त्याचा पुढील जबाब एक फेब्रुवारीला कोर्टात होणा-या सुनावणीत नोंदविण्यात येणार आहे.

आज बाप्पाचे दर्शन ‘सुलभ’

$
0
0
आजच्या (बुधवार) संकष्टी चतुर्थीपूर्वी दगडूशेठ मंदिर परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त झाल्याने भाविकांनाही दर्शन घेताना मोकळा श्वास घेता येणार आहे.

कोथरूडला उद्या अपुरा पाणीपुरवठा

$
0
0
‘महावितरण’कडून दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने वारजे जलकेंद्र आणि नवीन होळकर जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणा-या शहराच्या काही परिसराला येत्या गुरुवारी (३१ जानेवारी) अपुरा आणि कमी दाबाने पाणी मिळणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images