Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘महावितरण’च्या कंत्राटी कामगारांना पगारच नाहीत

$
0
0
महावितरणच्या कंत्राटी कामगारांना गेल्या दोन-चार महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती असल्याचे आढळून आले आहे.

तपासणी खाद्यपदार्थविक्रीसाठी सक्तीची?

$
0
0
शहरातील अन्नपदार्थ, मिनरल वॉटर, मटण-चिकनपासून तयार केलेल्या पदार्थांची विक्री करणा-या उत्पादकांच्या आरोग्य परवान्याचे नूतनीकरण करताना त्यांना महापालिकेच्या कोंढवा येथील प्रयोगशाळेतून उत्पादनाची तपासणी करून त्याचा अहवाल घेणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिला आहे.

बीएसएनएलचे आता ई-बिल

$
0
0
टेलिफोनचे बिल पोस्टाने वेळेत आले नाही आणि त्यामु‍ळे ते भरायला उशीर झाला, अशी तक्रार करायला आता ग्राहकांना जागा उरणार नाही! भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) लँडलाइन फोन ग्राहकांना ई-मेलद्वारे बिल पाठवायला सुरुवात केली असून, त्याची प्रिंट काढून बिल भरणेही शक्य होणार आहे.

पूना मर्चंट्सच्या उपक्रमाची गिनिज बुकात नोंद

$
0
0
दी पूना मर्चंटस चेंबरच्या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावरील लाडू चिवडा विक्री उपक्रमाची गिनिग वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ‌अजित सेटिया यांनी दिली. ते म्हणाले, ‘ गेली २५ वर्ष सातत्याने चेंबरच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

निवासी डॉक्टरांचा ससूनमध्ये संप

$
0
0
मानधनात वाढ करावी, बाँडच्या अंमलजावणी करावी यासारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी ससूनमध्ये संप पुकारला. त्यामुळे नियोजित सर्जरी पुढे ढकलण्याची वेळ हॉस्पिटल प्रशासनावर आली.

स्वारगेट स्थानकातील गेटची यंत्रणा बंद

$
0
0
संतोष माने प्रकरणानंतर एसटी प्रशासनाने शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकातील आउटगेटवर बसवलेली गेटची यंत्रणा बंद पडली आहे. बसस्थानकावरून बाहेर पडणा-या बसगाडीचा क्रमांक आणि वेळ नोंदवण्याची पद्धत ठप्प झाल्यामुळे बसेस आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

खूषखबर! वाघांची संख्या वाढली

$
0
0
देशातील वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र ‘गुड न्यूज’ असून नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेत २०० वाघ आढळून आले आहेत. वाघांच्या शिकारींचे प्रमाणही वाढले असून गेल्या वर्षभरात चौदा वाघांचा तर, जानेवारी महिन्यात तीन वाघांचा मृत्यू झाला असल्याची कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

फेब्रुवारी ‘महिला सुरक्षा महिना’

$
0
0
आयटी आणि बीपीओ क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनीने (नॅसकॉम) विविध उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील प्रसिद्ध बीपीओ कंपन्यांच्या मदतीने याबाबत देशभर जनजागृती करण्यात येणार आहे.

साडेपाचशे मतदारांचा एकच पत्ता

$
0
0
अर्ज-विनंत्या झाल्या, पत्रे झाली, आवश्यक फॉर्मही भरून दिले... तरीही नारायण पेठेतील साडेपाचशे मतदार ‘५३२ नारायण पेठ’ या एकाच पत्त्यावर राहत असल्याचा मतदारयादीचा चमत्कार गेली दहा वर्षे कायम आहे. हा चुकीचा पत्ता बदलण्यात यावा, यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही यंत्रणेतून प्रत्येक यादीत त्याच चुकीची पुनरावृत्ती सुरू आहे.

पुण्यात मेट्रो होणारच!: सीएम

$
0
0
शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची गरज असून पुण्यात मेट्रो होणारच असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

पाण्याबाबत पुणेकर असंवेदनशील

$
0
0
पुणेकरांच्या पाणीवापरावर विविध मंत्र्यांनी टीकाटिप्पणी केल्यानंतर आता मुख्यमंत्रीही पुढे सरसावले आहेत. ‘राज्यात दुष्काळाची स्थिती असताना पुणेकर मात्र पाण्याचा वापर असंवेदनशीलतेने करीत आहेत,’ अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. मलकापूरसारख्या छोट्या शहरात पाण्यासाठी मीटरपद्धत आहे; पुण्यात ते का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.

माजी खासदाराच्या मुलाची आत्महत्या

$
0
0
माजी खासदार अशोक मोहोळ यांचा मुलगा सिद्धार्थ ‍(वय ३१) याने आपल्या नवी पेठेतील राहत्या घरी स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. सिद्धार्थ हा मनोरुग्ण असल्याने त्या भ्रांतीत त्याने स्वतःवर वार केला असावा, अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

‘बिग बॉस’चे घर आगीत जळून खाक

$
0
0
कायम चर्चेत आणि त्यापेक्षाही जास्त वादग्रस्त असलेल्या 'बिग बॉस' या 'कलर्स टीव्ही'वरील मालिकेचा स्टुडिओ असलेले घर आज पहाटे जळून खाक झाले. लोणावळ्यात असलेल्या घराला शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही भीषण आग लागली.

बिबळ्याच्या हल्ल्यात एक जखमी

$
0
0
देहूरोडजवळ शेलारवाडी येथील कुंडमळ्यात शिरलेल्या बिबळ्याने शुक्रवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबळ्याला सापळ्यात पकडण्यासाठी पिंजरा लावला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

पेन्शनच्या रकमेसाठी पती, मुलाकडून छळ

$
0
0
पेन्शनच्या रकमेसाठी त्रास देणारा पती आणि मुलगा व सुनेविरूद्ध एका ७२ वर्षीय शिक्षिकेला कोर्टात तक्रार दाखल करण्याची वेळ आली आहे.

स्कूल बसची नियमावली पाळा

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ ‌इंडियाने केली आहे.

शिवछत्रपती पुरस्कार नियमावली रद्द करा

$
0
0
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी नियमावली तयार करताना सरकारने महत्त्वाच्या राज्य संघटनांशी किंवा खेळाडूंशी चर्चा केलेली नाही.

फार्मासिस्ट नसल्यास विक्री बंद

$
0
0
औषध विक्री दुकानात फार्मासिस्ट नसल्याने अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करून त्यांना विक्री बंदचे आदेश दिले.

वाढतेय व्यसनाधीन महिलांचे प्रमाण

$
0
0
ऑफिसमध्ये कामाचा ताण, एकटेपणा, उदासीनता अशा अनेक गोष्टींमुळे महिला व्यसनाच्या आहारी जात असून दिवसेंदिवस व्यसनांकडे वळणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images