Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शाळांना मिळणार हक्काच्या सुविधा

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी व खेळाच्या मैदानासारख्या भौतिक सुविधा येत्या ३१ मार्चअखेर देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. राज्य सरकारने नुकताच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ हा कायदा मंजूर केला आहे.

एकपडदा चित्रगृहांचा ‘डिजिटल मेकओव्हर’

$
0
0
एकपडदा चित्रपटगृहांत प्रेक्षकांना अद्ययावत सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी करमाफीसह सेवाशुल्कात वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे, भविष्यात एकपडदा चित्रपटगृहांना वातानुकूलित सुविधेसह कम्प्युटराइज्ड तिकिट प्रणाली आणि प्रक्षेपणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होणार आहे.

वाहतूक कोंडीची ‘सर्कस’ थांबणार

$
0
0
नदीपात्रात सर्कस, मनोरंजननगरी यासारखे दीर्घकाळ चालणाऱ्या ‘इव्हेंट’मुळे वाहतुकीचा बोजबारा उडत असल्याने यापुढे भिडे पुलाजवळ त्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

एसटीने दिली १ कोटीची भरपाई

$
0
0
स्वारगेट स्थानकातून एसटी बस पळवून ती बेदरकारपणे चालवून नऊ जणांचा बळी आणि २७ जणांना जखमी करणा-या बसचालक संतोष माने प्रकरणामुळे एसटी महामंडळाने आतापर्यंत तब्बल एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई वर्षभरात दिली आहे. तसेच आणखी दोन कोटी रुपयांचे आठ दावे कोर्टात न्यायप्रविष्ट आहेत.

‘आधार’ नाही; घाबरू नका!

$
0
0
आधार कार्डाची नोंदणी करण्याचे काम संपूर्ण राज्यात सुरू असून प्रत्येक महिन्याला तीस लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी केली जात आहे. आधार कार्ड नोंदणीपासून आणि त्यामुळे मिळणा-या सुविधांपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली जात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

‘महावितरण, बीएसएनएलला वगळा’

$
0
0
रस्तेखोदाई शुल्कात झालेल्या वाढीमधून महावितरण, बीएसएनएल आणि महानगर गॅसला वगळण्यात यावे, अशी मागणी विविध संस्था-संघटनांनी बुधवारी महापालिकेकडे केली आहे.

‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांना मारहाण

$
0
0
डॉन बॉस्को शाळेत निषेधाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडला. ‘अभविप’च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाळेशी संबंधित तिघांना अटक करण्यात आली आहे, तर ‘अभविप’च्या कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून कारवाई करण्यात आली आहे.

पुण्याला दरमहा १.२५ टीएमसी पाणी

$
0
0
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण प्रकल्पातील पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले असून, पुणे शहराला दरमहा सव्वा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. या नियोजनात तूर्त कोणताही बदल केला जाणार नाही. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांनी ही माहिती दिली. दुष्काळी स्थितीमुळे धरणांतील पाण्याचे नियोजन केले जात आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चंदन चोरी, चौघांवर गुन्हा दाखल

$
0
0
तवेरा गाडीतून आलेल्या चौघा आरोपींनी आर्मी क्वार्टर्स, व्हि​क्टोरिया रोड, विश्वकर्मा मार्ग; तसेच वनविभागाच्या वनक्षेत्रपाल संशोधन केंद्रातूनच चंदनाची चोरी केली आहे. वानवडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

लाडूचिवडा विक्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड

$
0
0
दी पूना मर्चंटस चेंबरच्या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावरील लाडू चिवडा विक्री उपक्रमाची गिनिग वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ‌अजित सेटिया यांनी दिली.

पुलाच्या कामाची बिले देण्यास निधी अपुरा

$
0
0
मुळा नदीवर होळकर पुलाशेजारी बांधण्यात आलेल्या नवीन पूल आणि उड्डाणपुलाच्या कामाचा खर्च वाढला असल्याने या कामाची सात कोटी रुपयांची बिले देण्यासाठी निधीची कमतरता भासली आहे. ही बिले देण्यासाठी बोपोडी-सांगवी नदीवर पूल बांधण्याच्या प्रकल्पाला तिलांजली द्यावी लागणार आहे. होळकर पुलाशेजारील पूल आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.

बीए, बीकॉम, बीएस्सीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

$
0
0
ऑक्टोबर परीक्षांचे निकाल लावण्यामध्ये होत असलेला विलंब आणि मार्च महिन्यापासून सुरू होणा-या पुढील सत्राच्या परीक्षा, या बाबी लक्षात घेत पुणे विद्यापीठाने बीए, बीकॉम आणि बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. आता या विद्यार्थ्यांना ऑक्टोबरचे निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत पुढच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची मुभा देण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळाच्या निर्णयाला मान्याता द्या

$
0
0
शिक्षण मंडळाच्या सदस्यांना नगसेवकांच्या मानधनाप्रमाणेच दरमहा साडेसात हजार रुपये मानधन आणि शंभर रुपये सभा भत्ता देण्यास मंडळाने एक वर्षापासून सुरुवात केली आहे. या निर्णयाला मुख्यसभेने मान्यता देण्याच्या मागणीबरोबरच मंडळाने २००५ ते २०११ या कालावधीतील सदस्यांना मानधनाची उर्वरित रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मंडळाने स्थायी समितीकडे याबाबतचा प्रस्ताव दाखल केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती लवकरच

$
0
0
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भरण्यास उशीर झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून महिलांसाठी काम करणा-या स्वंयसेवी संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब केले जाईल. पुढील काही दिवसातच याचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

१० औषध विक्रेत्यांना ‘विक्री बंद’चे आदेश

$
0
0
सहका-याच्या जीवावर दुकान सोडून शहरभर फिरणा-या औषध विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘फार्मासिस्ट’ची अचानक पाहणी सुरू करून गुरुवारी ‘शॉक’ दिला. दिवसभरात दहा औषध दुकानांत फार्मासिस्ट आढळले नसल्याने त्यांना विक्री बंद करण्याची कारवाई करण्यात आली.

तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या मित्राला अटक

$
0
0
विमाननगर येथे ऑक्टोबरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा अतिमद्यसेवनाने झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तिच्या मित्राला गुरुवारी अटक केली. तरुणीला अतिमद्यसेवनामुळे त्रास झाला, तेव्हा तिच्या या मित्राने निष्काळजीपणा दाखवत तिला डॉक्टरकडेही नेले नाही; तसेच तिच्या नातेवाइकांना कळविले नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या जैववैविध्याला ‘ताम्हिणी’चे कोंदण

$
0
0
भीमाशंकर, रेहकुरी, मयुरेश्वर अभयारण्याच्या यादीत आता ताम्हिणीचाही समावेश झाला आहे. ‘ताम्हिणी-सुधागड’ वन्यजीव अभयारण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी हिरवा कंदिल दाखवला. याशिवाय यवतमाळ येथील इसापूर पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्याचा प्रस्तावही मंजूर झाल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले.

२ स्वतंत्र घटनांमध्ये मंगळसूत्रे हिसकावली

$
0
0
कोथरूड आणि सहकारनगर येथे गुरुवारी सकाळी पावणेदहा ते सव्वादहा या अवघ्या अर्ध्या तासात दोन स्वतंत्र घटनांत सोन्याची दोन मंग‍ळसूत्रे हिसकावण्यात आले. दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे.

विद्यमान सदस्यांचे देव पाण्यात, तर इच्छुकांची फील्डिंग

$
0
0
पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या हाती असलेल्या स्थायी समितीवरील आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागांवर नव्या सदस्यांची निवडणूक होणार असल्याने सर्वपक्षीय माननीयांनी तेथे वर्णी लावण्यासाठी आपापल्या गॉडफादरकडे जोरदार फील्डिंग लावली आहे. दरम्यान, चिठ्ठीवर हवाला ठेवून सदस्यांची गच्छंती होणार असल्याने त्या चिठ्ठीवर आपले नाव येऊ नये, यासाठी विद्यमान सदस्यांनी देव पाण्यात घातले आहेत.

पोलिसांच्या फुकटच्या ‘मेजवानी’ला बसणार चाप

$
0
0
हॉटेल, टपरी आणि हातगाड्यांवर ताव मारून पैसे न देता पोटावरून हात फिरवत जाणा-या फुकट्या पोलिसांना चाप बसणार आहे. ‘फुकटचे खायचे सोडा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,’ असा आदेशच पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी त्यांना उद्देशून काढला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images