Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पालिकेने सीसीटीव्ही फुटेज दिले नाही’

$
0
0
बसचालक संतोष माने प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पालिकेच्या सीटी इंजिनीअरला स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देण्याची मागणी पत्राद्वारे पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र अखेरपर्यंत पालिकेकडून फुटेज मिळाले नाही. तसेच दोन वृत्तवाहिन्यांकडे फुटेज मागण्यात आले होते. त्यांच्याकडून सीडी प्राप्त झाल्या होत्या, अशी साक्ष तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह मोहिते यांनी मंगळवारी कोर्टात दिली.

नागरिकांच्या एकजुटीनेच सार्वभौमत्व अबाधित

$
0
0
‘गेल्या सहा दशकांहून अधिक काळात देशात अनेक प्रयोग झाले, प्रसंगी अराजकाची परिस्थिती उद‍भवली; परंतु प्रजासत्ताक आणि सार्वभौम भारताची एकता नागरिकांच्या एकजुटीमुळेच अखंडित राहिली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी मंगळवारी केले.

रस्तेखोदाईच्या शुल्कात जबर वाढ

$
0
0
खासगी मोबाइल-केबल कंपन्यांना तोच न्याय आणि सरकारी महावितरण-बीएसएनएललाही तोच न्याय; अशा ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने शहरातील रस्तेखोदाईच्या शुल्कात जबर वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीने घेतला. त्यामुळे शेकडो कोटींच्या वीज सुधारणांना मुकणे किंवा महापालिकेच्या कृपेने वीज दरवाढीचा आणखी एक दणका सोसणे एवढेच पर्याय पुणेकरांसमोर शिल्लक आहेत.

निम्म्या पुणेकरांची केबल बंद?

$
0
0
शहरातील सर्व केबलग्राहकांनी ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बसविण्याचे बंधन ट्रायने घातल्याने केबलचालकांचे धाबे दणाणले असून पुढील ७० दिवसांत तब्बल ५० टक्के ग्राहकांना ‘सेट टॉप बॉक्स’ देण्याचे आव्हान केबलचालकांसमोर आहे.

फी परताव्यामध्ये विद्यार्थ्यांची लूट

$
0
0
शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या फी परताव्याविषयी पुणे विद्यापीठाने २०१० साली नवे नियम जाहीर केले आहेत. मात्र, २००८ सालच्या जुन्या नियमांच्याच आधारे विद्यार्थ्यांची लूट करण्याचा ‘पराक्रम’ पुण्यातील एका कॉलेजने केला आहे. त्याविषयी विचारणा करणा-या पालकालाही कॉलेजचे प्राचार्य आणि प्रशासनाकडून जुन्याच नियमांचा दाखला दिला जात असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

वर्षात दहा हजार गाड्यांवर कारवाई

$
0
0
क्षमतेपेक्षा अधिक मालाची ने-आण करणा-या तब्बल दहा हजार वाहनांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली असून, दंडापोटी सुमारे ४० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत बेकायदा मालवाहतूक करणा-या ३६ हजार वाहनांवर अशा कारवाईचा ‘जॅमर’ लागला आहे.

मराठी चित्रपटांना हवा 'प्राइम टाइम'

$
0
0
‘अजिंक्य’, ‘बीपी’, ‘पुणे-५२’ या, तसेच आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि इतर बिग बजेट मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राइम टाइम’ची वेळ उपलब्ध करून देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे करण्यात आले आहे.

विनयभंगप्रकरणी उपप्राचार्यास अटक

$
0
0
येरवड्यातील डॉन बास्को शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी तेथील उपप्राचार्यास अटक करण्यात आली आहे. त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने मंगळवारी दिला.

व्हायरस अॅटॅकने ‘विंडो’जला धक्के

$
0
0
जगभरातील कम्प्युटरचा आत्मा असलेल्या विंडोजचे सुरक्षाकवच भेदण्याचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षी व्हायरस अॅटॅकच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे; तसेच मोबाइलच्या माध्यमातून हातोहाती खेळत असलेल्या अँड्रॉइडही या सायबर आक्रमणाच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.

पुण्यात ‘एनएसजी’चा तळ द्या : कलमाडी

$
0
0
पुण्यात ‘एनएसजी’ कमांडोंच्या २०० जवानांचा तळ तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) कार्यालय पुण्यात स्थापन करावे, अशी मागणी खासदार सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांच्याकडे केली आहे.

मिळकत करातील वाढ ६ टक्क्यांवर

$
0
0
मिळकत करात प्रशासनाने सुचविलेली सरासरी आठ टक्क्यांची वाढ सहा टक्क्यांवर आणण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी घेतला. या वेळी राजकीय पक्षांमध्ये मतभेद झाले आणि राष्ट्रवादी व मनसे यांनी एकत्र येऊन मतदानाद्वारे हा ठराव मान्य केला.

खंडणी मागणा-या दोघांना कल्याणीनगरमध्ये अटक

$
0
0
कल्याणीनगर परिसरात भाईगिरी करत रस्त्यावरील विक्रेत्यांकडे खंडणी मागणा-या दोघांना गुन्हे शाखेने गजाआड केले. या ‘भाईं’नी माजी महापौरांच्या चिरंजीवांनाच धमकावण्याचा प्रकार केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

$
0
0
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवणाऱ्या पुणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेनेच केले बेकायदा विकासकाम

$
0
0
सामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखवणा-या पुणे महापालिकेनेच बेकायदा विकासकाम केल्याचे उघड झाले आहे. महापालिकेने खासगी सोसायटीच्या मालकीच्या रस्त्यावर संबंधित सोसायटीला नोटीस न देता सोसायटीच्या नावाने सुमारे पाच लाख रुपयांचे टेंडर काढून ड्रेनेज लाइन टाकली आहे.

स्वारगेट बस डेपोतील ६५ ड्रायव्हरचे कौन्सिलिंग

$
0
0
स्वारगेट बस डेपोतील ६५ ड्रायव्हरचे कौन्सिलिंग करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात आला. संतोष माने प्रकरणानंतर एसटी प्रशासनाने सर्व ड्रायव्हरची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार स्वारगेट बस डेपोमध्ये कार्यरत असणा-या २०० ड्रायव्हर्सची तपासणी करण्यात आली.

बाणेरमध्ये अपघातात दुचाकीस्वार ठार

$
0
0
बाणेर येथील एका खासगी कंपनीत मुलाखतीला दुचाकीवर चाललेल्या तरुणाचा राजवाडा चौकात पाण्याच्या टँकरने चिरडल्याने बुधवारी सकाळी जागीच मृत्यू झाला. चतुश्रृंगी पोलिसांनी टँकर चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. हृषीकेश लक्ष्मण गुजर (२२, रा. पारिजात कॉलनी, कर्वेनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

निलंबित विधी सल्लागारांनी अखेर कार्यभार स्वीकारला

$
0
0
कोथरूड टीडीआर घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेले विधी सल्लागार रवींद्र थोरात यांनी बुधवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. थोरात यांच्याकडे पदभार देण्याचा निर्णय योग्य असल्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी स्पष्ट केल्यानंतर स्थायी समितीने फारसा विरोध न दर्शवता नियुक्तीला संमती दिली.

२५ टक्के आरक्षणापैकी १६९० जागांच्या अर्जांची विक्री

$
0
0
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्यांतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शाळांमधील प्रवेशात २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींतर्गत शहरातील विविध शाळांमधून एकूण ९ हजार ७३० प्रवेश देणे अपेक्षित आहे. त्यापैकी १६९० जागांसाठीच्या अर्जांची विक्री मंगळवारपर्यंत झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.

‘टायगर मॉथची’ गगनभरारी

$
0
0
पुण्याचा लोहगाव विमानतळ...हवाई दलाच्या मुख्यालयाजवळच्या स्टार्टर आणि ब्रेक नसलेल्या दोन आसनी विमानात बसलेले वैमानिक...एक सैनिक हाताने विमानाच्या पुढचा पंखा फिरवतो, आणि इंजिन सुरू होते.

‘डिजिटल व्हेरिफिकेशन’ ही ‘TCS’ची जबाबदारी

$
0
0
‘पोलिसांकडून करण्यात येत असलेले पोलिस व्हेरिफिकेशन हे डिजिटल स्वरूपात होण्यासाठी ‘टीसीएस’ने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि पोलिसांचे प्रशिक्षण ही ‘टीसीएस’ची जबाबदारी आहे,’ अशी माहिती पासपोर्ट विभागाचे पोलिस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images