Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात थंडी पुन्हा परतणार

$
0
0
गेल्या आठवड्यापासून शहरातून गायब झालेल्या थंडीने पुन्हा परतण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी ११ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद वेधशाळेत झाली असून, त्यात पुढील दोन दिवसांत अंशतः घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. उत्तर भारतात पाऊस होत असल्याने शहरातील थंडीची तीव्रता घटली होती.

‘त्या’ जीवघेण्या टँकरवर कारवाई

$
0
0
वाहतूक पोलिसांनी पाण्याची गळती होणा-या सात वॉटर टँकरवर दंडात्मक कारवाई केली. टिळक रोडवरील अभिनव कॉलेजच्या चौकामध्ये सोमवारी सकाळी या टँकरना पकडण्यात आले. वॉटर टँकरवरून गळती होणा-या पाण्यामुळे टिळक रोडवरील अभिनव कॉलेजच्या चौकामध्ये दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले होते.

‘सीए’ फायनलमध्ये जयाकुमार प्रथम

$
0
0
चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. सीए फायनल परीक्षेत मुंबईच्या जयाकुमार प्रेमा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सीपीटी परीक्षेत पुण्याच्या स्मित लोढा आणि प्रभज्योत सिंग तलुजा यांनी अनुक्रमे सातवा आणि नववा क्रमांक पटकावला आहे.

६ महिन्यांत अकराशे सापांना जीवदान

$
0
0
वाइल्ड अॅनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीतील सर्पमित्रांनी शहर आणि जिल्हा परिसरात वस्तीत सापडलेल्या तब्बल अकराशे सापांना गेल्या सहा महिन्यात निसर्गात मुक्त केले आहे. वन विभागाच्या सहकार्याने संस्था मानवी वस्तीत सापडणा-या सापांना वाचविण्याचे काम करते आहे.

सिंहगड परिसरात बिबट्यासाठी जाळे

$
0
0
सिंहगड घेरा परिसरात बिबट्या फिरत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केल्यामुळे वन विभागातर्फे आता या भागात पिंजरा बसविण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याने एक वासरू आणि तीन कुत्र्यांची शिकार केली आहे.

कोथरूडमध्ये टोळीयुद्धातून गोळीबार?

$
0
0
कोथरूड येथे अलंकार पोलिस चौकीच्या जवळपास रविवारी सायंकाळी टोळीयुद्ध भडकले. मोहोळ टोळीच्या एका ‘बाबा’ने मारणे टोळीच्या एका ‘लाल्या’वर गोळीबार केल्याचा प्रकार घडला. मात्र, ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ असे म्हणत या दोन्ही टोळ्या आपल्या बिळात दडून बसल्या आहेत. संदीप मोहोळ याचा खून झाल्यानंतर मोहोळ आणि मारणे टोळीतील शीतयुद्ध गेली पाच-सात वर्षे सुरू आहे.

प्रादेशिक योजनेमध्येही FSI ची खैरात

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास योजनेत टाउनशिपसाठी एफएसआयची खिरापत देतानाच प्रादेशिक योजनेतील (आरपी) टाउनशिपवरही मेहेरनजर दाखविण्यात आली आहे.

२४२ कोटींच्या वसुलीचे गौडबंगाल

$
0
0
पुण्यातील चाकण ऑइल मिलसह प्रॉपर्टीच्या २६ प्रकरणांमध्ये २४२ कोटी रुपयांची महसूल वसुली गेल्या काही वर्षांपासून थकली असूनही या वसुलीबाबत सर्वच यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे.

शाळेच्या उपमुख्याध्यापकास अटक

$
0
0
पुण्यातील डॉन बॉस्को शाळेचे उपमुख्याध्यापक इजू फ्रान्सिस यांना १४ वर्षाच्या विद्यार्थीनीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

रवींद्र थोरात यांची पुनर्नियुक्ती लांबणीवर

$
0
0
कोथरूड टीडीआर घोटाळ्यात निलंबित करण्यात आलेले पुणे महापालिकेचे विधी सल्लागार रवींद्र थोरात यांच्या पुनर्नियुक्तीचा आदेश महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी काढला असला, तरी त्यांच्याकडे सूत्रे न देता विधी सल्लागार कार्यालयाचा कारभार ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला.

सरकारची ७७ लाखांची फसवणूक

$
0
0
खराडी येथील १२०३ चौरस मिटर प्लॉटच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारची सुमारे ७७ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडविल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहदुय्यम निबंधक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आधार कार्डांसाठी पैसे घेणे बेकायदा

$
0
0
आधार कार्डाची नोंदणी केलेल्या जाणा-या केंद्रांव्यतरिक्त सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांकडून ‘आधार’च्या नोंदणीसाठी पैसे घेणे बेकायदा आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ‘आधार’ची नोंदणी करण्यासाठी पैसे घेणा-या एजन्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले.

सरकारी ‘नियोजना’मुळे ‘आधार’चा पुन्हा ‘भडका’

$
0
0
घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान थेट कॅश ट्रान्स्फरद्वारे बँक खात्यात जमा करण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून ‘आधार कार्ड’ सक्तीचे करण्याचे नियोजन केंद्र सरकार करीत असल्याने ‘आधार’च्या गोंधळाचा पुन्हा भडका उडणार आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे आधार कार्ड मिळत नाही, अशी स्थिती असताना येत्या वीस दिवसांत कार्ड कसे मिळवायचे, या चिंतेने सामान्यांना ग्रासले आहे.

ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांना सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी १९९६ पासून लागू करण्यात यावी, ज्युनिअर कॉलेजांचे प्रशासन स्वतंत्र असावे आदी मागण्यांसाठी राज्यातील सुमारे ६० हजार ज्युनिअर कॉलेजांच्या शिक्षकांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरच बहिष्कार घालण्याचा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.

नतद्रष्टांनी केला खोडसाळपणा

$
0
0
‘माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी नाट्य परिषदेबरोबरच नाटकाशी संबंधित सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न केला. सध्याची अत्यंत चुकीची असलेली ही निवडणुकीची पद्धत बदलण्यासाठी घटना दुरुस्ती केली. काही नतद्रष्ट लोकांनी त्यातही खोडसाळपणा केल्याने ती थांबली आहे. अन्यथा ही निवडणूक योग्य पद्धतीने झाली असती,’ अशी टीका अभिनेते मोहन जोशी यांनी केली.

कारवाईनंतरही रिक्षाचालकांची मनमानी

$
0
0
केवळ तंबीच नाही, तर प्रत्यक्षात कारवाई करूनही रिक्षाचालक भाडे नाकारणे आणि जादा प्रवासभाडे घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे साडेतेराशे रिक्षाचालकांविरोधात प्रवाशांनी तक्रारी केल्या असून, त्यापैकी ७५० जणांवर लायसन्स निलंबनाची कारवाई झाली आहे.

उपकुलसचिवांची बदली

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर विभागातील उपकुलसचिव विठ्ठल साठे यांची मंगळवारी बदली करण्यात आली. साठे यांनी स्वतःहून ही बदली मागून घेतली असली, तरी या विषयी कोणतीही कल्पना नसल्याने विद्यापीठ वर्तुळामध्ये नानाविध चर्चांना पेव फुटला होता.

दूध भेसळप्रकरणी दीड लाखांचा दंड

$
0
0
दूधाची घनता वाढविण्यासाठी साखरेचे द्रवण मिश्रित दुधाची विक्री करणा-या सोलापूर जिल्ह्यातीलयेथील सिद्धेश्वर दूध उत्पादक संस्थेच्या संचालक मंडळाला दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली.

डेंगीने आणखी एका तरुणाचा मृत्यू

$
0
0
डेंगीच्या आजाराने खराडी येथील एका ३३ वर्षीय तरुणाचा अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या वर्षातील डेंगीने दगावलेल्या मृत्युमुखींची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी गेल्या वर्षात पुणे शहर जिल्ह्यांत ३५ जण बळी गेले होते.

लोणावळ्यात तरुणाचा अपघातात मृत्यू

$
0
0
सहारा-लोणावळा रस्त्यावर शिवलिंग पॉइंटजवळील वळणावर फॉर्च्युनर गाडी उलटून झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून, चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images