Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वीज कनेक्शनसाठी नाव-पत्यात बदल करताय?

$
0
0
अनेक नागरिकांना नवीन किंवा रीसेलचा फ्लॅट विकत घेतल्यानंतर पहिला घरमालक किंवा बांधकाम कंत्राटदाराचे नाव कमी करून आपल्या नावाचे वीज कनेक्शन करून घ्यावे लागते. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या सोयीसाठी प्रचलित नियमांची माहिती ठेवावी.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर जिओपॅथिक स्ट्रेसचे ५० स्पॉट्स

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर होणाऱ्या अपघातांना मानवी चुका कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत असतानाच दुसऱ्या बाजूला या रस्तावर जिओपॅथिक स्ट्रेस असणारे ५० स्पॉट असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

कसरत वॉकिंग मध्याची

$
0
0
वेड्यावाकड्या स्थितीत पडलेली बॅरिकेड्स, कारचालकांनी केलेले डबल पार्किंग, अशा अनके समस्यांच्या गर्तेत लक्ष्मी रोडवर केलेला वॉकिंगमध्य सापडला आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी ही सुविधा करण्याचा दिखावा करण्यात येत असला तरी दुसऱ्या बाजूला या रस्तावरून चालताना कसरत करावी लागत आहे.

फीसाठी वेबसाइट

$
0
0
व्यावसायिक अभ्यासक्रमांची फी कशी ठरवली जाते, याची सविस्तर माहिती सांगणारे ‘वर्कशीट’ वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यास शिक्षण शुल्क समितीने सुरुवात केली आहे.

शरियत पंचायतीचा निषेध

$
0
0
धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था उपलब्ध असताना शरियत न्यायालयाच्या दिशेने जाणारी शरियत पंचायत समाजाला हजारो वर्षे मागे घेऊन जाणारी आहे. त्यामुळेच त्याचा मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच, याविरोधात आवाज उठविण्याचे विविध संघटनांना आवाहन करण्यात आले आहे.

बोगस पोलिसाने फसवले

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून पोलिस खात्यात नोकरीला लावण्याच्या अमिषाने तेराशे रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका ठगाला अटक केली आहे.

सांगवी ते सोंडे उड्डाणपूल मार्गी

$
0
0
वेल्हे तालुक्यातील सांगवी ते हिरोजी सोंडे या गुंजवणी नदीवरील उड्डाणपुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्त्याची समस्या सोडविल्याने पुलाचे काम करणे शक्य झाले आहे.

पुण्यात कधी होणार प्रगती मैदान

$
0
0
कला-क्रीडा-संस्कृती, उद्योग अशा अनेकविध क्षेत्रांमधील अद्ययावत घडामोडी-उपक्रमांची अनुभूती देणाऱ्या प्रदर्शनांसाठी सर्व सुविधांची सुसज्ज असे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभे राहण्याची पुणेकरांची प्रतीक्षा वर्षानुवर्षे कायमच आहे.

पिफमध्ये नियोजनाचा अभाव

$
0
0
‘पिफ’मधील चित्रपट पाहाणे हा अनुभव आनंददायी होता. इतरवेळी इतक्या मोठ्या संख्येने दर्जेदार चित्रपट पाहाण्याची संधी वर्षभरात मिळत नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या महोत्सवात यंदा गोंधळाचे वातावरण दिसले. काही चित्रपटांचे खेळ आयत्या वेळी रद्द झाले, काही वेळा तांत्रिक अडचणी आल्या.

पाकच्या कलाकारांचे स्वागत नको!

$
0
0
‘आतापर्यंत अनेक पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन गेले, त्यांची कारकीर्दही घडली. पण आता सीमारेषेवर घडलेली घडलेली घटना ही अत्यंत चुकीची असून, या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत करू नये,’ असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.

‘एसटी’साठी डिझेल महागले

$
0
0
पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलच्या दरामध्ये ५० पैशांचीच वाढ केली असली, तरी प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या एसटीच्या प्रतिलिटर डिझेल खरेदीच्या दरामध्ये १२ रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे समोर आले आहे. बाहेर ५३ रुपये लिटर असणारे डिझेल एसटीला मात्र ६४ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करावे लागत आहे.

संघटित होण्याची गरज

$
0
0
‘वर्षानुववर्षे प्रयत्न करूनही घरेलू कामगारांच्या पदरात काहीच पडलेले नाही. न्याय्य मागण्यांसाठी घरेलू कामगारांनी सं‌घटित होण्याची गरज आहे,’ असे मत राष्ट्रीय श्रम संघटनेचे (आयएलओ) संचालक एरिअल कास्तो यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘घरेलु कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असेही ते म्हणाले.

घरेलू कामगारांसाठी आर्थिक तरतुदीची मागणी

$
0
0
राज्यातील घरेलू कामगारांची नोंदणी केली जात असली तरी, मुळात त्यांच्यासाठी योजनाच नाहीत. तशी तरतूदही बजेटमध्ये केली जात नाही. नोंदणी कशाला करता, हा प्रश्न मांडत आता तरी बजेटमध्ये पुरेशी तरतूद करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या घरेलू कामगार संघाच्या आजी माजी पदाधिका-यांनी केली.

अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली लागणार

$
0
0
मुंबई हायकोर्ट आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे तीन मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये पुण्यातील जास्तीत जास्त केसेस निकाली निघाव्यात यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयात सध्या प्रलंबित असलेल्या केसेसची माहिती गोळा करण्याचे काम प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आले आहे.

डोळ्याच्या पडद्याची आता डायबेटिस तज्ज्ञांकडे तपासणी

$
0
0
‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ अर्थात मधुमेहींच्या डोळ्यांतील पडद्याचे होणारे बदल तपासण्यासाठी पेशंटला आता नेत्रतज्ज्ञांकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आता डायबेटिस तज्ज्ञांकडेच डोळ्यांची तपासणी करून नेत्रतज्ज्ञ त्याचे ‘रिपोर्ट’ देणार आहेत. त्यामुळे पेशंटचा वेळही वाचणार आहे.

फॅमिली कोर्टाला प्रतीक्षा नवीन इमारतीची

$
0
0
शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन फॅमिली कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम सरकारी कामकाजाच्या पद्धतीमुळे पुन्हा थंडावले आहे. या इमारतीच्या जागेसंदर्भात टॅक्स भरणा पालिकेकडे करण्यात आल्यानंतर आता पुन्हा सुधारित बांधकाम आराखड्याच्या मंजूरीची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे फॅमिली कोर्टाचे नवीन इमारतीत स्थलांतर होण्याची पक्षकार आणि वकिलांची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे.

वर्षाला १२ सिलिंडरसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

$
0
0
केंद्र सरकारने दर वर्षी बारा अनुदानित सिलिंडर्स द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात केली. ही संख्या बारापर्यंत वाढवावी, यासाठी आपला पक्ष केंद्राकडे आग्रह धरेल, असे त्यांनी सांगितले.

केबलचालक सर्वेक्षण मोहिमेला वेग

$
0
0
प्रत्येक ग्राहकाने ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे राज्य सरकारने बंधनकारक केल्याने जिल्हा प्रशासनाने केबलचालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील केबलग्राहकांची निश्चित संख्या समोर यावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

स्टेशनवर घाण करणा-या ६ जणांना दंड

$
0
0
पुणे स्टेशनवर घाण करणा-या सहा जणांकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नजिकच्या काळात स्टेशन परिसरात अस्वच्छता करणा-यांवर कडक कारावाई करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

एकाच अभ्यासक्रमासाठी २ विद्यापीठांची डिग्री

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नजीकच्या काळात ‘जॉइंट डिग्री’बाबत अंतिम निर्णय घेतल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून पुणे विद्यापीठ आणि पेनस्टेट विद्यापीठादरम्यान पहिला ‘जॉइंट डिग्री’ अभ्यासक्रम सुरू होऊ शकतो. असे झाले, तर विद्यार्थ्यांना एखाद्या अभ्यासक्रमासाठी या दोन्ही विद्यापीठांची डिग्री मिळू शकेल!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images