Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मेळ्यातली ‘स्पेस’!

$
0
0
पुण्यातल्या डेक्कन कॉलेज मैदानावर गेले दहा दिवस सुरू असलेल्या आणि लाखभर लोकांनी भेट दिलेल्या ‘इंडो-जर्मन अर्बन मेला’मध्ये तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती. शहरांत राहणाऱ्या तरुण पिढीच्या जाणिवा कशाप्रकारे विकसित होतायेत, याचा एक पैलू अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं पाहता येतो.

विद्यापीठ पदवीप्रदान नऊ फेब्रुवारीला

$
0
0
पुणे विद्यापीठाचा १०६ वा पदवीप्रदान समारंभ नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पदवीप्रदान सोहळ्याला विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) प्रभारी अध्यक्ष डॉ. वेद प्रकाश उपस्थित राहणार आहेत. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळेत पदवी- पदविका प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

‘वायसीएम’च्या भ्रष्टाचारावरून सभा तहकूब

$
0
0
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये अनावश्यक साहित्य व औषध खरेदी, परिचारिकांच्या बदल्या, धुळ खात पडलेली उपकरणे, पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंट पाठविण्याचा प्रकार, इकोमॅन आणि पवना व इंद्रायणी नदीतील जलपर्णी या विषयांवर नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरले.

बेघर आणि भीक मागणाऱ्या मुलांनाही ‘शिक्षणसंधी’

$
0
0
‘रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या मुलांनाही आता शिक्षण घेता येणार आहे. अशा मुलांसाठीची राज्यातील पहिली शाळा पुण्यात सुरू होणार आहे. पहिलीपासूनची ही निवासी शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल,’ अशी माहिती, राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी शनिवारी दिली.

‘एक्स्प्रेस वे’वर अपघात

$
0
0
पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील अमृतांजन पॉइंटजवळील वळणाच्या उतारावर झालेल्या अपघातात कंटेनर ट्रेलर मार्गावर आडवा झाल्याने या मार्गावरील पाच तास ठप्प झाली होती. हा अपघात शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

‘कॅश ट्रान्स्फर’चा फायदा गरिबांनाच सर्वाधिक

$
0
0
बँक खात्यात अनुदानाची रक्कम भरण्याची केंद्राची योजना (कॅश ट्रान्सफर) ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक चांगला पर्याय ठरणारी आहे. अन्नधान्यावरचे अनुदान थेट गोरगरीबांना खात्रीलायकरित्या मिळेल, असे मत फॉर्ड फाऊंडेशन इंटरनॅशनल प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्सचे अध्यापक व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी शनिवारी व्यक्त केले.

पं. रमेश नारायण यांचे ३६ तास गायन सुरू

$
0
0
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त पं. जसराज यांचे शिष्य पं. रमेश नारायण यांनी तब्बल ३६ सलग गायनाच्या विक्रमास शनिवारी प्रारंभ केला. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झालेल्या या अनोख्या मैफलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

पालिका विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे

$
0
0
शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये वाहतूक सुरक्षेचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आता वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत.

बनावट सोने विक्रेते गजाआड

$
0
0
सोन्याच्या मोहापायी अनेकजण स्वतःची जमापूंजी गमावून बसतात. त्यामुळे सोन्याच्या अमिषाला बळी पडणारे हेरून त्यांची फसगत करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मात्र, गोखलेनगर येथील जागरूक नागरिकामुळे बनावट सोने विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा ठकसेनांना गजाआड करण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आले. अटक झालेल्यात एका अल्पवयीनाचाही समावेश आहे.

कोंढवा परिसरात बुधवारी पाणी नाही

$
0
0
लष्कर पाणीपुरवठा विभागांतर्गत कोंढवा विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम असल्याने शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी बंद राहणार आहे.

महिला पक्षकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या वकिलावर बंदी

$
0
0
लंडनहून कोर्टात केस चालविण्यासाठी आल्याची बतावणी करत आपण थेट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांबरोबर फोनवर बोलत असल्याचा बडेजाव करणाऱ्या फॅमिली कोर्टातील एका वकिलाने शनिवारी भर कोर्टात एका महिला पक्षकाराशी असभ्य वर्तन केले. फॅमिली कोर्टातील वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना ‘शो बाजी’ने जेरीस आणलेल्या या वकिलाला फॅमिली कोर्टात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

‘पैलवानां’ना प्रत्येकी ५ किलोचा खुराक!

$
0
0
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निधीच्या फेरविचाराचा प्रस्ताव ‘यशस्वी’पणे मार्गी लावणाऱ्या ‘पैलवानां’ना डीपीच्या आखाड्यातील कुस्तीपोटी वस्तादांकडून पाच किलोचा ‘खुराक’ वाटप झाला असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

बांधकाम विभागाचा कारभार जैसे थे

$
0
0
पुणे महापालिकेची प्रतिमा सुधारण्यासाठी बांधकाम विभागाचे कामकाज सायंकाळी सहानंतर बंद करून सर्व इंजिनीअर्सनी दररोज सकाळी साडेआठ वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशाची महिन्याभरातच या विभागाने पायमल्ली केली आहे. पूर्वीप्रमाणेच महापालिकेचे अन्य विभाग बंद झाल्यावर या विभागाचा कारभार सुरू झाला आहे.

लोकोपयोगी जागांचे आरक्षण 'जैसे थे'

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यातील शाळा, मैदाने, उद्याने आणि भाजी मंडई अशा लोकोपयोगी कामांसाठी ठेवण्यात आलेली आरक्षणे बदलू देणार नाही, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. उपसूचना देऊन कोणी तसा प्रयत्न केला, तर तो आराखडा अंतिमतः राज्य सरकारकडेच येणार आहे, त्यामुळे त्या पातळीवर ही काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जैन मंदिर चोरीप्रकरणी चौघे अटकेत

$
0
0
चिंचवड गावातील जैन मंदिरात चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून, अद्याप दोन आरोपी फरारी आहेत. आरोपींकडून मंदिरातील दागिने आणि रोख रक्कम ३५ हजार जप्त करण्यात आली आहे. मुकेश लालबहादूर साही (वय २३, रा. जुना जकातनाका, चिंचवड), गणेश चंदन शहा (वय २२, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), राजेश पद्मम खत्री (वय ३०) आणि रमेश रूपानंद जोशी (वय ४०, रा. एमआयडीसी, भोसरी. सर्व रा. नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या घरांवर चोरांचा 'पहारा'

$
0
0
शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांचा फटका दस्तुरखुद्द पोलिसांना शनिवारी बसला. वाकड पोलिस वसाहतीमध्ये भर दुपारी घरफोडी करून चोरट्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.

शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रोचे स्टेशन

$
0
0
कोथरूडमध्ये शिवसृष्टीच्या नियोजित जागेवर मेट्रोचे स्टेशन होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. शिवसृष्टीसाठी शहरात पर्यायी जागेचा शोध घेण्यात येईल, त्यामुळे हा भावनेचा प्रश्न करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

२३१ शाळांची मान्यता रद्द होणार

$
0
0
बोगस पटसंख्या दाखवून सरकारी अनुदान लाटणाऱ्या राज्यातील २३१ शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. संबंधित शाळांवर लवकरच ही कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी शनिवारी दिली.

मेणबत्त्या पेटवून प्रश्न सुटत नाहीत!

$
0
0
मेणबत्ती हाती घेतल्याने प्रश्न सुटत नाहीत. अशा लोकांना विरोध नाही. परंतु, सामाजिक संस्था (एनजीओ) समाजाच्या तळापर्यंत पोहोचत नाहीत, हे चित्र नजरेत भरते, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कृतज्ञता निधीच्या विश्वस्त पुष्पा भावे यांनी शनिवारी व्यक्त केली आहे.

‘राष्ट्रवादी’ : टार्गेट २८८

$
0
0
केंद्रात एका पक्षाचे सरकार सत्तेवर येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, तरीही राज्यात एका पक्षाचे सरकार सत्तेवर येऊ शकते, असे सूचक विधान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता विधानसभेच्या २८८ जागा मिळविण्याचे ‘टार्गेट’ असल्याचे सूतोवाच शनिवारी केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images