Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिस असल्याचे सांगून फसवणूक करणारा अटकेत

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून पोलिस खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून १३०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संदीप उत्तम कोयमहाले (वय ३५, रा. साकोरी, ता. जुन्नर) असे या आरोपीचे नाव आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यासह दोघांना अटक

$
0
0
लोणावळा येथे एका हॉटेल चालकाकडून दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या उपनिरीक्षकाच्या घराची झडती घेण्यात आली असता २५ लाख ५९ हजार रुपयांची रोकड सापडली आहे. तसेच एका डायरीत अनेक हॉटेलची नावे आढळली आहेत.

किवळे येथे अपघातात ११ जखमी

$
0
0
चालकाचा ताबा सुटल्यामुळे केटरिंगचे साहित्य घेऊन मुंबईहून पुण्याकडे निघालेला टेम्पो उलटून किवळे पुलाजवळ शुक्रवारी सकाळी (१८ जानेवारी) ११ जण जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

प्रेयसीच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप

$
0
0
प्रेयसीच्या मुलावर पेट्रोल ओतून त्याचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि दोनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी सोनू चंद्रकांत श्रीनाथ (वय ३२, रा. महात्मा फुले नगर, रामटेकडी, हडपसर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्याविरूद्ध अनिता अशोक बागव (३५, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली होती.

टाटा मोटर्स आठवडाभर बंद

$
0
0
दुरुस्तीच्या कारणास्तव जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनी बंद राहणार आहे. सलग सुट्या आणि ‘ब्लॉक क्लोजर’ ही प्रमुख कारणे आहेत.

चांदणी चौकातील समस्यांविरुद्ध आंदोलन

$
0
0
चांदणी चौकातील वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी चांदणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. मनसेचे नगरसेवक राजेंद्र गोरडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. चांदणी चौकातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेत या चौकातून येणे वाहनचालकांना कठीण होते.

ऊसमळे अन् म्हणे दुष्काळग्रस्त

$
0
0
उसाचे मळे फुलविणा-या दौंड आणि शिरूर तालुक्यातील काही गावांचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झाला असून दोन आमदारांच्या गावांनाही दुष्काळग्रस्तांच्या यादीत स्थान मिळाले आहे. रब्बी हंगामातील पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १८७ गावांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या गावांना आता दुष्काळी गावांना दिले जाणारे कर्जवसुलीपासून वीज बिलातील सवलतीपर्यंतचे लाभ मिळणार आहेत.

पुण्यातून सुटणा-या दुरांतो हाउसफुल्ल

$
0
0
वेळेची बचत आणि आरामदायी प्रवास या दोन कारणांमुळे पुण्याहून तीन ठिकाणी धावणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच, ही गाडी बंद न करता दररोज करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

‘पाणी योजनांची वीज तोडू नका’

$
0
0
दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागांतील नळ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडू नका, असा आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

झुरमुरे पुन्हा वन खात्यात?

$
0
0
‘पाण्याबाबत पुणेकर माजलेत’ अशा शब्दांत दूषणे देणारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना पुन्हा ‘वन’खात्यात पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सव्वादोन किलो चरस जप्त

$
0
0
शिवाजी रोडवर जेधे चौकाजवळ बुधवारी दोघा आरोपींना खडक पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा दोन किलो २८० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केला आहे. पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, पब आणि हॉटेलमध्ये चरसची विक्री करण्यात येणार होती, अशी माहिती खडक पोलिसांनी दिली.

नदीपात्रातील रस्त्याचा ‘सुप्रीम’ विजय

$
0
0
मुठा नदीपात्रातील रस्त्याची कोर्टातील लढाई महापालिकेने अखेर जिंकली आहे. ‘परिसर’ संस्थेने घेतलेल्या आक्षेपांमुळे गेल्या एक तपाहून अधिक काळ कोर्टबाजीच्या फे-यात अडकलेल्या या रस्त्याला सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. हा रस्ता पूर्ण झाल्यास पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून अंशतः सुटका होऊ शकेल.

फ्लॅटवरून पत्नीचा खून

$
0
0
नवीन फ्लॅट घेण्यावरून झालेल्या वादातून बालाजीनगर येथे पतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात बुक्क्या मारून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून पतीला अटक करण्यात आली आहे.

बेकायदा गर्भपात : २ डॉक्टरांना अटक

$
0
0
बेकायदा गर्भपातप्रकरणी काळेवाडी येथील जीवनज्योती हॉस्पिटलमधील महिला स्त्रीरोगतज्ज्ञांसह दोन डॉक्टरांना सांगवी पोलिसांनी अटक केली. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आनंद जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई केली. डॉ. चंद्रशेखर अन्नदाते व डॉ. विद्या आंबटकर (रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

जेनेरिक औषधांचे पहिले दुकान पुण्यात

$
0
0
आवाक्याबाहेर गेलेल्या वैद्यकीय उपचार खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य सेना आणि कष्टकरी-कामगार संघटनेचे रास्त किमतीतील जेनेरिक औषधांचे पुण्यातील पहिले अधिकृत दुकान सुरू होते आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र आयोग हवा

$
0
0
शैक्षणिक स्वायत्ततेची गरज अधोरेखित करतानाच शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र शिक्षण आयोग स्थापन करावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी गुरुवारी केली.

पीएमपीकडून तूर्त दिलासा...

$
0
0
केंद्र सरकारने डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५१ पैशांनी वाढ केल्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडवर (पीएमपी) सुमारे ३२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र, तिकीट दरात वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आता STचाही भाडेवाढीचा विचार

$
0
0
डिझेलच्या दरामध्ये दर महिन्याला वाढ होणार असल्याने एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. डिझेल दरवाढ झाल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागणार आहे. गेल्या महिन्यात डिझेल दरवाढी झाली, त्यावेळी एसटी महामंडळाने तिकीटाच्या दरांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता.

‘स्टारडम’च्या हव्यासात बालपण हरवते

$
0
0
‘मला लहानपणापासूनच वेस्टर्न डान्सची खूप आवड होती, पण मी प्रशिक्षण घेतले नाही. मुलीला मात्र मी तीन वर्षांची असल्यापासूनच क्लासला पाठवते आहे. मोठेपणी तिने प्रसिद्ध डान्सर झाले पाहिजे. याशिवाय तिने केमिस्ट्रीतील संशोधकही व्हावे, असे तिच्या बाबांना वाटते. त्यामुळे आम्ही तिला पहिलीपासूनच सायन्स अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी केले आहे. व्यायाम आणि पोहोण्याचा क्लासलाही आम्ही तिला पाठवतो….’

...उरला केवळ सोपस्कारापुरता!

$
0
0
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने सांस्कृतिक राजधानीला चंदेरी किनार दिली आहे. परंतु, दशकपूर्तीनंतर आता केवळ सोपस्कार म्हणून ‘पिफ’चा खेळ मांडला जातोय का, असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी स्थिती ओढवली आहे. रंग फिकट होत चाललेल्या या महोत्सवाच्या यंदाच्या अंकाविषयी...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images