Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षकांच्या मुक्ततेस जिल्हा प्रशासनाची टाळाटाळ

$
0
0
शालेय कामकाज सुरू असताना शिक्षकांना ‘इलेक्शन ड्युटी’ देऊ नये, असे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी देऊनही त्यांची मुक्तता करण्यास जिल्हा प्रशासनातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुरुवारी करण्यात आला.

महापौर निधीचा गैरवापर?

$
0
0
पुणे शहरातील गरीब-गरजू आणि विविध संस्थांना अर्थसाह्य करण्याच्या उद्देशाने राखून ठेवलेल्या महापौर निधीतील रकमेचेही प्रभागातील कामांसाठी वर्गीकरण केल्याचे समोर आले आहे.

विनयभंगप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
सांगवी येथे एका अल्पवयीन मुलीचा आणि चिंचवडमध्ये एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

‘आधार’चा घोळ आता कॅम्पसवर

$
0
0
महापालिकेच्या केंद्रांवर आधार कार्डाच्या नोंदणीवरुन सावळा गोंधळ सुरु असतानाच आता कॉलेज कॅम्पसमध्येही आधार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधार देण्यात येणार आहे.

बजेटचा निधी संपवण्याची घाई

$
0
0
महापालिकेच्या, २०१२-१३ या वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या बजेटमधील तरतुदींचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी नगरसेवक आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. त्यानुसार ५९ नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून नागरिकांना कचरा साठवण्यासाठी सुमारे दोन कोटी ९४ लाख रुपयांच्या प्लॅस्टिकच्या बकेट दिल्या जाणार आहेत.

तिघा लिपिकांना वीस हजारांचा जामीन

$
0
0
पुणे विद्यापीठातील पुनर्मूल्यांकन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा लिपिकांची गुरुवारी वीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. रमेश किसन शेलार (वय ५२), अशोक शंकरराव रानवडे (४४) आणि चेतन गजानन परभाणे (३८) यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

मोबाइल टॉवर्सची बांधकामे नियमित करणार

$
0
0
पुणे शहरामध्ये उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्सची बांधकामे राज्य सरकारच्या धोरणानुसार नियमित केली जाणार असून, त्यांना करआकारणी करण्यात येणार आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर दुचाकीस्वार सुसाट

$
0
0
चारचाकी गाड्यांसाठी वेगवान रस्ता म्हणून ओळखला जाणारा एक्स्प्रेस वे आता दुचाकी स्वारांसाठी आकर्षण ठरला आहे. रस्त्याचे सगळे नियम धाब्यावर बसून दुचाकीस्वार सर्रास ‘एक्स्प्रेस वे’वर प्रवास करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

इंटरेस्ट घेऊन शिकवा!

$
0
0
विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात ‘इंटरेस्ट’ निर्माण व्हावा, असे वाटत असेल, तर शिक्षकांनाही ‘इंटरेस्ट’ घेऊन शिकवले पाहिजे, अशा शब्दांत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी प्राध्यापकांचे कान टोचले.

एक्स्प्रेस-वेवर आंतरराष्ट्रीय डिव्हायडरच हवे

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे याचे वर्णन आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता म्हणून केले जाते. या मार्गावर सगळ्या सोयी केल्या. मात्र, रस्त्याच्यामध्ये सुरक्षिततेसाठी असणारी डिव्हायडर केलेली नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यावर डिव्हायडरसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची असली पाहिजेत, अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरूवारी केली.

आयुर्वेदाला ‘इंटरपॅथी’ कोर्सची गरज नाही

$
0
0
राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे आधुनिक औषधे वापरण्याची परवानगी दिल्याने आयुर्वेद शाखेच्या तज्ज्ञांना इतर पॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी ‘इंटरपॅथी’चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष डॉ. सुहास परचुरे यांनी दिले.

रेश्मा भोसले यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

$
0
0
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्या सदस्यत्वाला आव्हान देणारी आणि त्यांच्यासह महापालिकेच्या मिळकतकर विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने गुरुवारी फेटाळली.

आनंदवनचे युवा अस्मिता पुरस्कार

$
0
0
आनंदनवन बहुउद्देशीय संस्था आणि आनंदवन व्यसन मुक्ती केंद्राच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने देण्यात येणारे युवा अस्मिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार युवकांना व्हिजन इंडिया कार्यक्रमांतर्गत युवा अस्मिता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

नको आरक्षण; कर्तृत्वावर पुढे जाऊ

$
0
0
महिलांना सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोक-यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी नवा कायदा करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पुढाकार घेणार आहे. मात्र, पुण्यातील महिलांनी आम्हाला आरक्षणाची गरज नाही, कर्तृत्वाच्या जोरावर आम्ही पुढे जाऊ, असे मत व्यक्त केले आहे.

१२५ सॉफ्टवेअर्सची लायसन्स मोफत

$
0
0
राज्यातील सरकारी ‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टू-डी, थ्रीडी डिझाइनची सॉफ्टवेअर्स मोफत वापरता येणार आहेत. यासाठी ‘ऑटोडेस्क’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीतर्फे राज्यातील प्रत्येक आयटीआयला ऑटो कॅड, ऑटो डेक्स माया, ऑटोडेस्क थ्रीडी मॅक्स यासारख्या सॉफ्टवेअर्सची १२५ लायसन्सेस मोफत देण्यात येणार आहेत.

१८ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

$
0
0
आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या जिल्ह्यातील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गंत यंदा मोफत शिक्षण मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी येत्या ३१ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून, छाननीनंतर प्रवेश यादी जाहीर होणार आहे.

पाऊण तासात पाच चेन स्नॅचिंग

$
0
0
बिबवेवाडी आणि सदाशिव पेठ भागात गुरूवारी सकाळी साडे नऊ ते सव्वा दहा या काळात पाच सोन साखळी चोऱ्या झाल्या.

'काकस्पर्श'ला संत तुकाराम पुरस्कार

$
0
0
अकराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) मराठी स्पर्धात्मक विभागातील ‘संत तुकाराम पुरस्कारा’साठी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ची निवड झाली. जागतिक स्पर्धात्मक विभागात प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान पटकाविण्यात जर्मनीच्या ‘बार्बारा’ चित्रपटाने बाजी मारली.

'आधार'ने घातला नवा गोंधळ

$
0
0
एकाच व्यक्तीने दोनदा नोंदणी केली किंवा नोंदणी झाल्यानंतर एजन्सीमध्ये बदल झाला, तरीही अंतिमतः बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग केले गेले असल्याने दोनदा आधार कार्ड बनणे शक्य नाही. मात्र, या अत्याधुनिक यंत्रणेत कुठे ना कुठे त्रुटी असतील, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी गुरुवारी दिली.

रेल्वेच्या वेटिंग लिस्टला कात्री

$
0
0
तुम्ही जर रेल्वेने कुठे प्रवास करण्याचे नियोजन करणार असाल तर योग्य वेळी करा. कारण रेल्वेने तिकीटाच्या आरक्षणाच्या वेटिंग लिस्टवर मर्यादा आणली आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असल्याचे समजते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images