Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हापूसचा 'भाव' चार हजारांचा!

$
0
0
मकर संक्रांतीच्या आधीच पुणेकरांना फळांचा राजा (रत्नागिरी हापूस)ची चव चाखता येणार आहे! दहा वर्षात पहिल्यांदाच रत्नागिरी हापूस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात आला. वेळेआधी दाखल होऊनही त्याचा रुबाब मात्र कायम असून, तो 'भाव'ही खातो आहे. त्याच्या एका डझनाचा भाव चार हजार रुपयांच्या घरात आहे.

पुणे स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव नाही

$
0
0
पुण्यातील गहुंजे येथे नव्याने उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम यापुढे सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम या नावाने ओळखले जाणार नाही. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेशी (एमसीए) झालेल्या मतभेदांमुळे सहारा उद्योगसमुहाने या स्टेडियमसाठी सुब्रतो रॉय यांचे नाव न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

विकिपीडियाला द्या तुमचा आवाज

$
0
0
विषय कोणताही असो... अगदी छोट्या मोठ्या बारकाव्यांसह संदर्भ देणारा, हक्काचा ऑनलाइन विश्वकोश समजला जाणारा 'विकिपीडिया' आता बोलता होणार आहे आणि तेही मराठीत... येत्या १३ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या उपक्रमासाठी पुणेकरांनी आवाज द्यावा, असे आवाहन विकिपीडिया क्लबने केले आहे.

'यशदा' होणार प्रशासकीय विद्यापीठ

$
0
0
सनदी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीला (यशदा) प्रशासकीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी आता पावले उचलण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या विविध अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पदवीसाठी या नूतन विद्यापीठाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

डॉ. वि. मा. बाचल यांचे निधन

$
0
0
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. वि. मा. बाचल यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि तितकेच कलासक्त चित्रकार म्हणून बाचल सर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ओळखले जात.

नदीपात्रातील बांधकामास ग्रीन ट्रायब्युनलचा ‘स्टे’

$
0
0
नदीच्या पात्रात राडारोडा टाकणे किंवा बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (ग्रीन ट्रायब्युनल) तात्पुरता स्टे दिला आहे. तसेच महापालिकेला याप्रकरणी बाजू मांडण्याचाही आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी लवादाकडे दाद मागितली होती.

‘पिफ’च्या पडद्यावर स्मरणरंजनाचा ‘फ्लॅशबॅक’

$
0
0
‘मस्त बहारों का मैं आशिक’ म्हणत रुपेरी पडदा ‘जंपिंग जॅक’ या ओळखीने व्यापणाऱ्या अन् ‘सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला’ म्हणताना नायकासह खलनायकी भूमिकांतही ‘देव’पण जपणाऱ्या कलावंतांच्या सन्मानाने ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा गुरुवारी उघडला.

विनयभंग प्रकरण: पालिकेच्या ​अभियंत्यावर गुन्हा

$
0
0
विश्रांतवाडी येथील ३५ वर्षीय आर्किटेक्ट महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या बांधकाम विभागातील सहायक अभियंता दिलीप पावरा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सर्वधर्मीय साधूंच्या संरक्षणाची मागणी

$
0
0
जैन धर्मियांच्या बारा गुरूंवर गेल्या महिनाभरात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांच्या निषेधार्थ जैन सेनेच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. जैन आणि सर्व धर्मीय साधूंना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

‘रोहयो’तील मजुरांचे पैसे थेट बँकेत

$
0
0
रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे त्वरीत मिळावे, यासाठी या योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबविला जाणार आहे.

खासगी विद्यापीठांसाठी मार्गदर्शक तत्वे

$
0
0
‘राज्यात येणाऱ्या खासगी विद्यापीठांसाठी आता मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. त्यासंबंधी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा ‘प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन’ही तयार करण्यात आला आहे,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मेट्रो सल्लागारपदाची माळ ‘डीएमआरसी’च्या गळ्यात

$
0
0
पुणे मेट्रोच्या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’लाच (डीएमआरसी) सल्लागार म्हणून नियुक्त करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी गुरूवारी दिले.

‘डीएमआरसी’ वाक्यम् प्रमाणम्

$
0
0
मेट्रो स्टेशनच्या जागांमध्ये बदल, अलाइनमेंटमध्ये बदल आणि त्यावरून उभ्या राहिलेल्या वादांवरही गुरुवारी तोडगा काढण्यात आला. हे मुद्दे ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या (डीएमआरसी) निदर्शनास आणून द्यावेत, त्यानंतर ‘डीएमआरसी’ सांगेल, त्या सूचना मान्य करण्यात येतील, या तोडग्यास शहरातील सर्वपक्षीय कारभाऱ्यांनी संमती दिली.

‘हे पावडर लावलेल्यांचे संमेलन’

$
0
0
मराठी साहित्य संमेलन सध्या केवळ बारा कुटुंबापुरतेच मर्यादित असून लेले-काणे-साने यांच्याबरोबरीने पानतावणे यांचा समावेश झाल्याशिवाय साहित्य संमेलने विस्तृत होणार नाहीत, अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.

आबांच्या कार्यक्रमावेळीच कैदी पळाला?

$
0
0
येथील येरवडा खुल्या कारागृहात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असल्याची संधी साधत खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने पलायन केल्याची चर्चा आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला.

पुणे-लोणावळा लोकल १० दिवस रद्द

$
0
0
मध्य रेल्वेतर्फे आकुर्डी ते देहूरोड दरम्यान भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दोन लोकलची सेवा दहा दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

पुण्याला उद्ध्वस्त करण्याचा कट

$
0
0
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीस उध्वस्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान उधळून लावा, असे सांगत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शहराच्या विकास आराखड्यास विरोध केला आहे आणि पुण्याचे रक्षण करण्यासाटी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.

ब्रिगेडचा 'संमेलन बहिष्कार' मागे

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असून, त्यावरील परशुरामाची प्रतिमा आणि कुऱ्हाड काढल्याने संमेलनात कोणताही अडथळा करणार नसल्याचे संभाजी ब्रिगेडने गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे परशुरामाच्या प्रतिमेवरून निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे.

एक्झामिनर्स आता 'स्कॅनर'वर

$
0
0
परीक्षा विभागामध्ये झालेल्या गैरप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात संबंधित पेपर तपासनिकांचा हात असल्याची शक्यता लक्षात घेत, त्यांच्या विषयीची सर्व माहिती विद्यापीठातर्फे पोलिसांना देण्यात आली आहे.

पुणे मेट्रोला सोळाशे कोटीचे इंधन

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवडच्या महत्त्वाकांक्षी मेट्रोच्या दोन्ही मार्गांना केंद्र सरकारने गुरूवारी तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यासाठी केंद्राचा वीस टक्के; म्हणजे सोळाशे कोटी रूपयांचा निधीही देण्याची तयारी दर्शविली आहे. मेट्रोच्या जोडीनेच शहरात मोनोरेलचा प्रकल्प राबविण्याची सूचना केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images