Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पवना धरणग्रस्तांसाठी आज सुदिन

$
0
0
पवना धरणासाठी तब्बल ४७ वर्षांपूर्वी विनामोबदला जमीन दिलेल्या धरणग्रस्तांसाठी गुरुवारचा दिवस सुदिन ठरणार आहे. दोन पिढ्यांच्या लढ्यानंतर ८६३ धरणग्रस्तांना प्रत्येकी एक एकर जमिनीचे वाटप होणार आहे. काले गावातील शांताई मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता सोडत पद्धतीने पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे.

बनावट दस्तप्रकरणी एका नोटरीला अटक

$
0
0
एका वर्षापूर्वी झालेल्या दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी एका नोटरीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर. भोर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी दिलीप पांडुरंग पवार(वय ४८ रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या नोटरीचे नाव आहे.

सवलतीच्या वीजदरासाठी ओशो फाउंडेशनची याचिका

$
0
0
पुण्यातील ओशो आश्रमाला सवलतीच्या दराने वीजेचा पुरवठा करण्याच्या मागणीसाठी ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर महाराष्ट्र वीज नियामक आयोग(एमईआरसी) व राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. वीज मंडळाने जानेवारी २०१२पासून शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.

२१ जणांवर पोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई

$
0
0
कॉलेजच्या आवारात हिरोगिरी करणा-या सडकसख्याहरींवर गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील आठ कॉलेजच्या आवारातील २१ सडकसक्याहरींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आराखड्याची प्रसिद्धी लांबणीवर

$
0
0
विकास आराखडा प्रसिद्ध करण्यास मान्यता देताना शहरातील माननीयांनी उपसूचनांचा पाऊस पाडल्यामुळे मूळ आराखड्यात त्यानुसार बदल करण्याचे आव्हान आता महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे. हे काम लांबणार असल्यामुळे प्रत्यक्ष विकास आराखडा नागरिकांना उपलब्ध होण्यास आणखी तीन-चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

आयटी युगातही हलव्याच्या दागिन्यांचे ‘क्लिक’

$
0
0
आजकालच्या मुलांना पारंपरिक पद्धतीने सण साजरे करायची हौसच नाही, अशी टीका सर्रास होत असली तरी संक्रात मात्र याला अपवाद ठरली आहे. संक्रांतीचे वैशिष्ट्य असलेले हलव्याचे दागिने घालून ‘फोटो शूट’ करण्याची क्रेझ सध्या नववधू-वरांमध्ये असून काहीजण घरी फोटोग्राफरला बोलावून तर काही स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढत आहेत.

भारतीय विद्यार्थी संसद आजपासून

$
0
0
देशभरातील पाच हजार विद्यार्थ्यांचा समावेश असलेली तिसरी भारतीय विद्यार्थी संसद गुरुवारपासून (१० जानेवारी) सुरू होणार आहे. या तीन दिवसीय संसदेत देशातील विविध पक्षांचे ९७ नेते, उद्योगपती आणि अभिनेते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमातून कैद्याचे ‘धूम स्टाइल’ पलायन

$
0
0
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा ओपन जेलमधून पळून गेला. मंगळवारी सकाळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या, कार्यक्रमादरम्यान जेलमध्ये अधिकारी-कर्मचारी जमल्याची संधी साधत या कैद्याने पळ काढल्याची चर्चा जेल परिसरात रंगली आहे.

‘यशदा’ आता होणार प्रशासकीय विद्यापीठ

$
0
0
सनदी अधिका-यांच्या प्रशिक्षणात मोलाची कामगिरी बजावणा-या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीला (यशदा) प्रशासकीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी आता पावले उचलण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या विविध अधिका-यांना पदोन्नतीसाठी प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पदवीसाठी या नूतन विद्यापीठाच्या माध्यमातून महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

संमेलन आयोजकांवर मार्गदर्शक तत्त्वांचा अंकुश?

$
0
0
साहित्य संमेलनाच्या स्थानिक आयोजकांच्या उत्साहाची परिणती वादात होत असल्याने याबाबत साहित्य महामंडळ अधिक कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. महामंडळातर्फे आयोजकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाण्याचे संकेत मिळत असून, गुरुवारी (१० जानेवारी) होणा-या महामंडळाच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अॅग्रीकल्चर कॉलेजमध्येच मेट्रो हब

$
0
0
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातच मेट्रो हबचे नियोजन करण्यात आले आहे. विकास आराखड्यात तसे आरक्षण ठेवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गणेशखिंड रस्त्यावरील ई स्क्वेअरजवळील आणि रामवाडी येथील मेट्रो स्थानकांच्या आरक्षणांमध्ये माननीयांनी बदल केल्याचे समोर आले आहे.

विद्युत निरीक्षण शुल्क अखेर रद्द

$
0
0
वीजसंचांच्या तपासणीसाठी आकारण्यात येणारे वार्षिक विद्युत निरीक्षण शुल्क रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांवरील बोजा टळला आहे. केंद्र सरकारने नवा कायदा लागू केल्यानंतर गेली दोन वर्षे राज्य सरकारकडून हे शुल्क रद्द करण्यात आले नव्हते. अखेर अनेक क्षेत्रांमधून पाठपुरावा केल्यानंतर या संदर्भातील आदेश काढण्यात आला आहे.

एक्झामिनर्स आता 'स्कॅनर'वर

$
0
0
परीक्षा विभागामध्ये झालेल्या गैरप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढविण्यात संबंधित पेपर तपासनिकांचा हात असल्याची शक्यता लक्षात घेत, त्यांच्या विषयीची सर्व माहिती विद्यापीठाने पोलिसांना देण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ही माहिती दिली. परीक्षा विभागातील गैरप्रकारांची माहिती मिळाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली.

स्वस्त औषधांचा उल्लेख हवा

$
0
0
पेशंटला उपचारासाठी देण्यात येणा-या चिठ्ठीवर (प्रिस्क्रिप्शन) कोणत्याही कंपनीचे औषधे लिहून देण्याबरोबर आता डॉक्टरांनी त्यावर ‘स्वस्तातील औषधे द्यावीत’ अशी सूचना केमिस्टला करण्याचे आदेश खासगी डॉक्टरांना दिले आहेत.

पुण्यात पारा वाढला...

$
0
0
शहर आणि परिसरातील थंडीचा जोर बुधवारी ओसरला. पारा ११.६ अंशांवर स्थिरावला असून, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात फारसे बदल होण्याची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. शहरात थंडीची तीव्रता घटली असली, तरी विदर्भात थंडीची लाट कायम आहे. राज्यातील नीचांकी ५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नागपूर येथे झाली.

कोर्टाच्या अवमानाप्रकरणी याचिका

$
0
0
शिक्षकांना एकदिवसीय शिक्षक अधिवेशनाला जाण्यासाठी सात दिवसांची पगारी रजा देण्याच्या सरकारी अध्यादेशाबाबत कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले.

विद्युत निरीक्षण शुल्क अखेर रद्द

$
0
0
वीजसंचांच्या तपासणीसाठी आकारण्यात येणारे वार्षिक विद्युत निरीक्षण शुल्क रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांवरील बोजा टळला आहे. केंद्र सरकारने नवा कायदा लागू केल्यानंतर गेली दोन वर्षे राज्य सरकारकडून हे शुल्क रद्द करण्यात आले नव्हते. अखेर अनेक क्षेत्रांमधून पाठपुरावा केल्यानंतर या संदर्भातील आदेश काढण्यात आला आहे.

तिसऱ्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन

$
0
0
बालगुन्हेगारांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करतानाच त्याच्याशी संबंधित प्रकरणांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी व्यक्त केली. देशात युवकांचे केवळ मोठे अस्तित्व असून चालणार नाही, तर ही तरुणाई योग्य मार्गक्रमण कसे करेल, याचीही काळजी व्यवस्थेने घेतली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

नगरमधून १८ वर्षीय तरुणीचे अपहरण

$
0
0
नियोजित पतीसह पुण्याहून शिर्डी येथे चाललेल्या अठरा वर्षीय तरुणीचे अपहरण करून, तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीची तक्रार घेण्यास नगर आणि शिरपूर पोलिसांनी टाळाटाळ केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पुण्याच्या काही भागांत आज पाणी नाही

$
0
0
बालभारतीकडून चतुःश्रुंगी परिसराकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आज शुक्रवारी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, गुरूवारी सायंकाळीही या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images