Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टिळक रोडचे डांबरीकरण होणार

$
0
0
बजेटमध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही गेल्या वर्षभरात विकासकामे होऊ न शकल्याने आता महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. प्रशासनाने स्थायी समितीच्या एकाच बैठकीत रस्ते, पावसाळी लाइन आणि कल्व्हर्ट या कामांचे तब्बल ४१ प्रस्ताव आयत्यावेळी दाखल केले.

विनोद मेहता यांना टिळक पत्रकारिता पुरस्कार

$
0
0
आउटलुक समूहाचे संपादकीय अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुन्हा नकोत पहिले पाढे पंचावन्न...

$
0
0
गेल्या वर्षभरात वाहतूक सुधारण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. त्यातील काही योजना तुलनेने यशस्वी ठरल्या, तर काही गुंडाळाव्या लागल्या. काही योजनांना तर मुहूर्तच लागलेला नाही...

शपथ... शिक्षणात खंड न पडू देण्याची

$
0
0
शिक्षणहक्क कायदा म्हणजे काय, त्यातील गरिबांची व्याख्या काय, त्याआधारे खासगी शाळेत प्रवेश कसा घ्यायचा... प्रसंगी त्यासाठी लढा कसा द्यायचा, याची इत्यंभूत माहिती कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीच्या सदस्यांना मिळाली, अन् त्यांनीही मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्याची शपथ घेतली...

स्वस्त औषधांसाठी तज्ज्ञांना एकत्र येण्याचे साकडे

$
0
0
सर्वसामान्यांना परवडणा-या दरामध्ये औषधे उपलब्ध होण्यासाठी औषधनिर्मितीच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणा-या विविध शास्त्रांमधील तज्ज्ञांनी आता एकत्र येण्याची गरज असल्याचे मत ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅँड इंडस्ट्रीअल रिसर्च’चे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. समीर ब्रह्मचारी यांनी बुधवारी व्यक्त केले.

अनुदानित गॅस ४ रुपयांनी महाग

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किंमतीचे कारण देत ऑइल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात चार रुपयांनी वाढ केली आहे. नवीन वर्षापासून ही दरवाढ लागू झाल्याने पुणेकरांना सिलिंडरसाठी आता ४३७ रुपये मोजावे लागणार आहे.

‘डीटीएड’ परीक्षेत मुलींची बाजी

$
0
0
अध्यापक पदविका परीक्षेत (डीटीएड) यंदा मुलींनी बाजी मारली असून, परीक्षेला बसणाऱ्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. ‘डीटीएड’चा एकूण निकाल ७१.०९ टक्के इतका लागला असून, त्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७५.७७ टक्के आहे.

विद्रोही संमेलनाचे १३ तारखेला आयोजन

$
0
0
विषमतावादी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकून १३ आणि १४ जानेवारीला धुळ्यात होणा-या ११ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन गुजरातमधील लोककलावंत दक्षिण बजरंगी यांच्या हस्ते होणार आहे.

प्रायोगिक नाटकांचा जागतिक विशेषांक

$
0
0
देश-विदेशातील रंगभूमीवर काम करणा-या दिग्दर्शक, अभिनेत्यांचे विचार, त्यांच्यापैकी काहींच्या विस्तृत मुलाखती अशा स्वरूपात भारतीय आणि जागतिक स्तरावरील प्रायोगिक नाटकांचा वेध घेणारा तब्बल सव्वाचारशे पानांचा विशेषांक येत्या रविवारी प्रकाशित होणार आहे.

खराडी परिसरात शेड्सवर हातोडे

$
0
0
खराडी परिसरातील व्यावसायिकांनी उभारलेल्या अनधिकृत शेड्सवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.खराडी सर्व्हे क्रमांक ६ व ७ येथील डीपीतील रस्त्यावरील फ्रंट व साइड मार्जिनमध्ये १७ व्यावसायिकांनी केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

धर्मादाय हॉस्पिटलांचे ‘डिसेक्शन’

$
0
0
राज्यातील धर्मादाय खासगी हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांवर दिल्या जाणा-या मोफत तसेच सवलतीच्या दरातील उपचारांसह त्यांच्या खर्चाचे आता ‘डिसेक्शन’ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या हॉस्पिटलमध्ये योजनेखाली उपचार देणा-या सर्व पेशंटच्या केसपेपरचे सहधर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती ‘ऑडिट’ करणार आहे.

कळ्या जपण्यासाठी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ची ओंजळ

$
0
0
लैंगिक अत्याचाराला बळी पडणा-या कोवळ्या जिवांना अशा घटनांपासून वाचविण्यासाठी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुलांसाठी काम करणा-या संस्थेने पुढाकार घेतला आहे. गावपातळीवर बालसंरक्षण समिती स्थापन करून खेळ, गप्पागोष्टी अशा माध्यमातून मुलांशी मनमोकळा संवाद या समितीच्या माध्यमातून साधला जात आहे.

केवायसी नाही; मग १२५० रु. मोजा

$
0
0
केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत केवायसीचे (नो युवर कस्टमर) अर्ज न भरणाऱ्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन ब्लॉक करण्यास सुरुवात झाली आहे. एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असतानाही केवायसी न भरणाऱ्या ग्राहकांचा यात समावेश असून, या ग्राहकांना या पुढील काळात ‘नॉन एक्झमटेड कॅटेगिरी’ दरात सिलिंडर घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण १२०० ते १२५० या दरात हे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.

सहा वर्षांच्या पीडित मुलीवर ऑपरेशन

$
0
0
हडपसर येथील सहा वर्षांच्या मुलीवरील अतिप्रसंगात तिला झालेल्या इजांमुळे बुधवारी तिच्यावर छोटे ऑपरेशन करण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर असून, पाच दिवसांनंतर पुन्हा तिची तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

ब्रँच, अकाउंट नंबर सरकारनेच पुरवावे

$
0
0
‘अनुदानाचे कॅश ट्रान्स्फर होण्यासाठी आधार कार्डाची गरज असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र यासाठी सरकारनेच बँक, ब्रँच आणि अकाउंट नंबर पुरविणे गरजेचे आहे,’ असे एका सरकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मटा’ला सांगितले.

‘आधारा’शिवाय शिष्यवृत्ती मिळणार

$
0
0
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ क्रमांक आवश्यक आहे. मात्र बहुतांश लाभार्थ्यांचे आधारकार्ड अद्यापही न आल्याने त्यांचे अनुदान जुन्या पद्धतीनुसार बँकेत जमा केले जाणार आहे. केवळ आधार कार्ड नाही, म्हणून कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.

‘आधार’साठी आणखी २ महिन्यांची प्रतीक्षा?

$
0
0
विविध स्कॉलरशिप योजनांतील विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र यंत्रणा अपुरी असल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नोंदणीची संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांसाठी वापरावी लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे शहरात विद्यार्थी वगळता इतर नागरिकांची आधार कार्ड काढण्यास सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पडताळणीनंतर खरा ‘निकाल’

$
0
0
सरकारी योजनेच्या लाभाचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा बारामती उपविभागात प्रारंभ झाला आहे. आता पहिल्या काही दिवसांमध्ये किती अनुदान जमा झाले, कोणाचे अनुदान कोणत्या कारणासाठी रखडले, याचा लेखाजोखा घेण्याची पडताळणी सुरू केली जाणार आहे. दरम्यान, लाभार्थी खातेदारांच्या नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बसखाली चिरडून विद्यार्थी ठार

$
0
0
येथील बस थांब्यावर थांबलेल्या एसटीमध्ये चढण्याचा प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याला एसटीचा धक्का लागल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. प्रसाद राजेंद्र बागल (११, रा. पिंपळे, ता. इंदापूर) असे या विद्यार्थीचे नाव आहे. हि घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

ट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर टाकवे गावच्या हद्दीतील समुद्र कॉलेज जवळ दुचाकी व वाळूच्या ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (२ डिसेंबर) दुपारी सव्वादोनच्या सुमारास झाला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images