Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एनडीएच्या प्रमुखपदी एअर मार्शल गिल

$
0
0
नोकर भरतीतील भ्रष्टाचाराने चर्चेत आलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या प्रमुखपदी एअर मार्शल कुलवंतसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गिल यांनी मावळते कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोकसिंग यांच्याकडून मंगळवारी सूत्रे स्वीकारली.

एका सोशल लग्नाची लाखाची गोष्ट...

$
0
0
तो आणि ती दोघेही उच्चशिक्षित...मनात आणले असते तर धूमधडाक्यात लग्न करू शकले असते. पण त्यांनी असे वाजतगाजत लग्न करण्यापेक्षा आपल्याप्रमाणेच इतरांची स्वप्नपूर्ती कशी होईल, याचा वस्तुपाठ घालून दिला.

बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींना कोठडी

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेले सात आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपींनी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी इ- मेलचा वापर केला केला आहे. बनावट नावाने ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे एटीएसने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

बँक खाती काढण्यास १ मार्चपर्यंत मुदतवाढ

$
0
0
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘कॅश ट्रान्स्फर’ योजनेला बँक खातीच उघडली न गेल्याने पहिल्या दिवशी ब्रेक लागला. परिणामी, खाती उघडण्यासाठी एक मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ताजी अन् स्वस्त भाजी आता थेट दारात

$
0
0
भाजी घ्या भाजी...ताजी भाजी...स्वस्त भाजी...भाजी मंडईतील ही साद बंडगार्डन भागातील नारंगीबाग सोसायटी आणि परिसरातील रहिवाशांच्या कानावर आली. त्यामुळे ‘मॉर्निंग वॉक’ उरकून घरी परतणाऱ्यांनी ताजी भाजी खरेदी केली. नव्याने सुरू झालेल्या ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या उपक्रमाअंतर्गत उभारलेल्या स्टॉलवर ग्राहकांनी गर्दी केली होती.

अत्याचारांचा काँग्रेसकडून निषेध

$
0
0
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच हडपसरमध्ये झालेल्या घटनेचा शहर-जिल्हा काँग्रेसने निषेध केला आहे.

विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल

$
0
0
जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराजवळ; तसेच मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत दोन स्वतंत्र घटनांमध्ये दोन तरुणींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे दत्तवाडी आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोन्हीही आरोपींना अटक केली आहे.

कोरेगाव पार्क हेच अपमार्केट !

$
0
0
शहरातील सर्वात महाग समजल्या जाणाऱ्या डेक्कन आणि प्रभात रोडला मागे टाकून कोरेगाव पार्कने यंदा मोठा भाव खाल्ला आहे. कोरेगाव पार्कमधील सदनिकेचा रेडीरेकनर तब्बल १०,२१० रुपये चौरस फुटांवर पोहोचला आहे.शहरालगतच्या मुंढवा परिसराने हनुमान उडी घेत हेक्टरी सव्वाकोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. वाघोलीतील जिरायती जमिनीनेही हेक्टरी एक कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

एक्स्प्रेसवेवरील वेगावर आता ‘वॉच’

$
0
0
एक्स्प्रेसवेवरील वाहनांच्या वेगावर आता ‘वॉच’ ठेवला जाणार असून, त्यासाठी ‘स्पीडगन’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली. सुरक्षित वाहतुकीसंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘आरटीओ’तर्फे आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा अभियान २०१३’चे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप-राष्ट्रवादी नूरा कुस्ती

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या एका सदस्याने पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेऊन राष्ट्रवादीला दिलेली साथ आणि काँग्रेसचे दोन व शिवसेनेच्या एका सदस्याची ऐनवेळी गैरहजेरी यांच्या अशा हातमिळवणीमुळे महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या संयोजनातील राजकारणाची स्थायी समितीतील कुस्तीचा निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला.

पठ्ठ्यांची कुस्ती; वस्तादांची दोस्ती

$
0
0
गेल्या काही दिवसांत कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून चार पक्षांनी घेतलेल्या तीव्र विरोधाच्या भूमिकेपासून त्याच पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी मंगळवारी काडीमोड घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका ‘वस्तादाने’ एकाच वेळी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांना चितपट केल्याची चर्चा रंगली आहे.

कच-यातून परत मिळाले सोने!

$
0
0
नेहमीप्रमाणेच घंटागाडीत त्यांनी घरातील कचरा टाकला...., दागिन्यांची पिशवीही घंटागाडीत चुकून टाकली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले..., स्त्री-धन कचऱ्यात गेल्याने त्यांचा धीर सुटला आणि अश्रूंचा बांध फुटला... पण घंटागाडीवरील कर्मचारी आणि मुकादम यांच्या अथक प्रयत्नांमुळे सर्वच्या सर्व दागिने मिळाले अन् दागिन्यांच्या प्राप्तीमुळे त्यांच्या चेह-यावर पुन्हा हास्य फुलले!

झिंग आली अंगलट

$
0
0
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या १४५ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून डिसेंबर महिन्यात ७२८ तळीरामांवर कारवाई करण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अपघात टाळण्यावर यंदा पोलिसांचा भर होता.

‘एक्स्प्रेस वे’वर फसवणुकही सुसाट

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघातांबरोबरच फसवणूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हायवेवर त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी चालक करीत आहेत. ग्लोबल टेक इंडियाचे बिझनेस एक्सिक्युटीव निलेश देशपांडे मुंबईला नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना तुर्भे-घणसोली रस्त्यावर त्यांना फसवणुकीचा अनुभव आला.

चतुर्थीच्या 'मंत्रा'साठी एसएमएसचे 'तंत्र'

$
0
0
भिंतीवरील कॅलेंडरकडे पाहून संकष्टी किंवा अंगारकी केव्हा आहे किंवा चंद्रोदय किती वाजता आहे, याची माहिती घेण्यासाठीदेखील वेळ मिळत नाही, अशी स्थिती असताना नव्या युगाची ‘एसएमएस’ सेवा आज भाविकांसाठी वरदान ठरत आहे.

जन्मदात्या पित्याकडून मुलीच्या खुनाचा प्रयत्न

$
0
0
मुलगी झाल्याचा राग मनात धरून पित्याने एक वर्षाच्या चिमुकलीला लाटण्याने मारहाण करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. थेरगाव येथे वीस दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे मंगळवारी उघडकीस आला.

'शिवनेरी'ला पुन्हा पडदे लागणार

$
0
0
दिल्ली बलात्काराच्या पार्श्वभूमीवर काढून टाकण्यात आलेले एसटीच्या शिवनेरी बसच्या खिडक्यांवरील पडदे पुन्हा बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे जादा पैसे मोजून ‘शिवनेरी’ने जाणा-या प्रवाशांना बसणारे उन्हाचे चटके टळणार आहेत.

स्वातंत्र्यसेनानी किशोर पवार कालवश

$
0
0
समाजवादी चळवळीचे आधारवड, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आणि कामगार नेते किशोर पवार यांचे बुधवारी सकाळी रुबी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. गेली दोन वर्षे ते आजारी होते.

एक्स्प्रेस वेवर अपघातात एक ठार

$
0
0
कमी उंचीच्या दुभाजकाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आणखी एक बळी घेतला आहे. उर्से टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. भरधाव कार दुभाजक तोडून पलिकडच्या लेनवर गेल्याने दोन कारमध्ये धडक होऊन हा अपघात घडला. त्यात एक ठार तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

कामगार नेते किशोर पवार यांचे निधन

$
0
0
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी किशोर पवार यांचे बुधवारी सकाळी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, जावई असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images