Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा

$
0
0
उन्हाचा कडाका वाढू लागल्याने ग्रामीण भागातील लोकांना आता पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून, आजघडीला वेगवेगळ्या तालुक्यांतील गावांमध्ये २९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी देण्यात आली.

पट्टी भरा; अन्यथा पाणी तोडू

$
0
0
शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास संबंधित गावांचा पाणीपुरवठा थांबविण्याचा इशारा महापालिकेने सोमवारी दिला.

पुणे-बेंगळुरू शिवनेरीची भाडेवाढ

$
0
0
तुम्ही जर १५ एप्रिलनंतर पुणे-बेंगळुरू शिवनेरी व्होल्व्होने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल, तर तुम्हाला २०० रुपयांची भाडेवाढ सोसावी लागणार आहे. या मार्गावर चालवण्यात येणा-या शिवनेरी बससाठीचे भाडे सध्या अकराशे रुपये आहे.

शहरात कांजण्या, गोवरची साथ

$
0
0
शहरातील चंदननगर, सिंहगड रोड, बाणेर, विश्रांतवाडीसह पिंपरी-चिंचवड भागात मोठ्या प्रमाणात कांजण्यांसह गोवर या संसर्गजन्य आजाराची साथ आली आहे. यामुळे लहान मुलांची काळजी घेण्याचा बालरोगतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

कुणी नाट्यगृह देता का... नाट्यगृह?

$
0
0
बालगंधर्व रंगमंदिर आणि भरत नाट्यमंदिर या दोन प्रमुख नाट्यगृहांच्या नूतनीकरणांची कामे रेंगाळल्याबद्दल टीकेचे प्रवेश होत असतानाच नाट्यकर्मींच्या विवंचनेत भर पडली आहे.

पुणेकरांची वाहने असुरक्षितच

$
0
0
पुण्यातील वाहने वाढली परिणामी, महसुलात भरही पडली. वर्षाकाठी शेकडो कोटींचा महसूल भरूनही 'आरटीओ'त येणा-या पुणेकरांची वाहने मात्र असुरक्षितच आहेत. ठेकेदाराची मनमानी, अपुरी जागा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पैसे मोजूनही वाहनाच्या सुरक्षिततेची हमी उरलेली नाही.

दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार

$
0
0
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद सरकारचे विशेष पथक येत असून, हे पथक पुढील आठवड्यात पुणे विभागातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. दुष्काळी गावांची पाहणी केल्यानंतर हे पथक केंद्राला अहवाल सादर करणार आहे.

परीक्षा तोंडावर, हॉल तिकीट नेटवर

$
0
0
परीक्षा पद्धती निर्दोष व्हावी या उद्देशाने हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या हाती देण्यापूर्वी वेबसाइटवर प्रसिद्ध करून त्यामध्ये काही चुका असल्यास दुरुस्त करूनच विद्यार्थ्यांना देण्याचा स्वागतार्ह निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला.

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संकपाळ

$
0
0
पुणे बार असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत अॅड. अशोक संकपाळ यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी अॅड. शिवराज कदम आणि अॅड. सतीश पैलवान यांची नियुक्ती झाली.

कबूतर जा...जा...

$
0
0
घरातील माळे, गॅलरीचे कोपरे, सोसायट्यांच्या अडगळीमध्ये राहणाऱ्या कबुतरांबद्दल आपुलकीने बोलणारी मंडळी अपवादानेच आढळतील. दिवसेंदिवस कबुतरांचा उपद्रव वाढत असतानाच, त्यांच्या विष्ठेमधील विषाणू आणि जिवाणूंमुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गाड्या स्वच्छतेसाठीचे पाणी रेल्वे 'रिसायकल' करणार

$
0
0
रेल्वेगाड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे पाणी रिसायकलिंग करून पुन्हा वापरण्याची योजना रेल्वे प्रशासन तयार करत आहे. येत्या वर्षभरात ही योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पाणीगळती रोखण्यासाठी प्रशासनाची दिरंगाईच

$
0
0
पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर प्रशासन कारवाई करण्यास सज्ज आहे; मग प्रशासनाच्या या दिरंगाईला कोणी रोखणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे

जिल्ह्यातील ५५ हजार लोकसंख्येला टँकरने पाणी

$
0
0
उन्हाच्या वाढत्या कडाक्याबरोबरच पाणीटंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करू लागला असून, जिल्ह्यातील १९ गावे व १५६ वाड्या-वस्त्यांतील ५५ हजार नागरिकांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे.

राजाश्रयामुळे फोफावतेय गुंडगिरी

$
0
0
औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरीला राजकीय आश्रय असल्यामुळेच ती फोफावली आहे. त्यावर वेळीच आळा न घातल्यास काही उद्योजक अन्यत्र स्थलांतराचा गांभीर्याने विचार करीत आहेत, असा इशारा या क्षेत्रातील उद्योजकांच्या काही संघटनांनी दिला आहे.

'तमसो मा ध्वनिर्गमय'

$
0
0
तुम्हाला वाचनाची आवड आहे? तुमचे शब्दोच्चार स्पष्ट आहेत? वाचनातून व्यक्त होणाऱ्या भावना तुम्ही आवाजातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता? तर मग तुमच्या आवाजामुळे अनेकांना ज्ञानदृष्टी मिळू शकते!

सांगलीतली घड्याळे बिहारमध्ये सापडली

$
0
0
सांगलीत चोरीला गेलेली ४० लाख रुपये किंमतीची टायटन कंपनीची घड्याळे बिहारमधील पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील घोडाहसन येथे सापडली आहे. ही घड्याळे जमिनीत पुरुन ठेवण्यात आली होती. या घड्याळांबरोबरच २५० ग्रॅम सोन्याचे व ७०० ग्रॅम चांदीचे दागिनेही मिळाले आहे.

सोलापुरात आगीत ३ ठार

$
0
0
सोलापूर जिल्ह्यात फटाक्‍याच्या कारखान्याला आग लागून, तिघे जण होरपळून ठार झाले. जिल्ह्यातील शेटफळ येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

मावळच्या प्रांताधिका-यांची विशेष कोर्टाकडून चौकशी

$
0
0
मावळ येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष कोर्टाने बुधवारी मावळचे प्रांत संजय पाटील यांची दोन-अडीच तास चौकशी केली.

सर्व विद्यापीठांत क्रेडिट सिस्टीम?

$
0
0
पारंपरिक विद्यापीठांतील मार्कवादाचे उच्चाटन करून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनविण्याच्या उद्देशाने पदवी-पदव्युत्तर स्तरावर क्रेडिट-ग्रेडिंग सिस्टीमचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने जोर लावला आहे.

हुक्का पाहिजे? पिंपरीमध्ये या...

$
0
0
हुक्का पार्लरवर कडक धोरण अवलंबणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्यामुळे पुणे शहरातील बहुतांशी हुक्का पार्लर बंद पडले आहेत. जे पार्लर सुरू आहेत, त्यांच्यावर पुणे महापालिका व पोलिसांमार्फत तपासणी व कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images