Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बजेटमधील १०८ कोटी रुपयांच्या योजनांना कात्री

$
0
0
महापालिकेच्या बजेटपैकी तब्बल १०८ कोटी रुपयांच्या योजनांना छाटणी लावण्याच्या प्रस्तावास अखेर माननीयांनी सोमवारी मान्यता दिली. मात्र, या विषयावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली.

युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
कॅम्प परिसरात युवतीचा विनयभंग करून तिच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हडपसर परिसरातील एका वीस वर्षीय युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

निवडणूक निकालानंतर दगडफेक, हाणामा-या

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यावर सोमवारी मतमोजणीनंतर मात्र जुन्नरसह काही ठिकाणी दोन गटांमध्ये दगडफेक, हाणामारी असे प्रकार घडले. या प्रकरणी पोलिसांनी २८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या मतदानानंतर तालुकास्तरावर मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर काही ठिकाणी राडेबाजीचे प्रकार घडले.

तरुणाचे अपहरण करणा-या ५ जणांना अटक

$
0
0
भुसारी कॉलनी येथील एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपींवर त्वरित कारवाई करा

$
0
0
दिल्लीमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपींवर त्वरित आणि कडक कारवाई करण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) ने केली आहे. या मागणीसाठी दोन्ही संघटनांनी सोमवारी पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

नेत्रपटलाच्या ऑपरेशनमध्ये नव्या तंत्रामुळे सुरक्षितता अधिक

$
0
0
पडदा सरकणे अथवा रक्तस्त्राव होणे या ‘व्हिक्ट्रेटॉमी’सारख्या विकारामुळे नेत्रपटलावर (रेटिना) होणा-या ऑपरेशनमध्ये आता नव्या तंत्राची (कॉन्स्टीलेशन तंत्रज्ञान) मदत झाली आहे. त्यामुळे या ऑपरेशनमध्ये तंत्राच्या मदतीने सुरक्षितता अधिक निर्माण झाली आहे. तसेच तंत्रज्ञानामुळे डोळ्याच्या पडद्याजवळ जाणे अधिक सोपे झाले.

मनसेकडून बीआरटीची ‘अंत्ययात्रा’

$
0
0
नगर रस्ता, आळंदी रस्ता तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावर होणा-या नियोजन शून्य बीआरटीला विरोध करण्यासाठी मनसेच्या वतीने येरवडा भागात ‘बीआरटी अंत्ययात्रा’ मोर्चा काढण्यात आला.

गावांच्या विकासात राज्य सरकारचा पुढाकार

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केल्या जाणा-या २८ गावांतील तीन वर्षांच्या विकासाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे. तसेच, शहरात या गावांचा समावेश होणारच, असे स्पष्टीकरणही सरकारतर्फे विधिमंडळात देण्यात आले.

‘बफर एरिया’मध्ये पर्यटनसुलभ कामांना परवानगी?

$
0
0
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर भागात (बफर एरिया) स्थानिक नागरिकांना रोजगारांच्या साधनांसह पर्यटनसुलभ कामांना परवानगी देण्याचा विचार करण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधून दहा गावे वगळण्याचाही प्रस्ताव आहे.

कला शिक्षकांचे धरणे आंदोलन

$
0
0
सेवेतून काढलेल्या अंशकालीन शिक्षकांना पुन्हा सेवेत घ्या, अशी मागणी करून महाराष्ट्र राज्य कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक संघाने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे सुरू केले.

गरज पुणेकरांच्या दबावाची

$
0
0
नवीन वर्षाकडून पुण्याच्या म्हणजेच पुण्यात राहणा-र्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पुण्याचे नेते त्या पूर्ण करण्यासाठी काही तरी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. त्याच्यापुढचे वर्ष हे निवडणुकांचे असल्याने त्या परीक्षेच्या तयारीसाठी का होईना, काहीतरी केल्याचे त्यांना दाखवावेच लागेल; पण त्यामध्ये समाधान न मानता या निमित्ताने त्यांच्यावर जास्तीत जास्त दबाव आणण्यासाठी पुणेकरांना प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागणार आहे.

रिक्षा परवाने मिळणार

$
0
0
गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असलेले रिक्षा परवाना (परमीट) पुन्हा देण्यासंदर्भात पावले टाकली जाणार आहेत. प्रत्येक शहरातील लोकसंख्येनुसार परवान्याचे वाटप होणार असून, मुख्यमंत्र्यांनी परिवहन खात्याला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यांसह राज्यभर नव्या परवान्यासाठीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

‘सायकल राजधानी’ साठी पहिले पाऊल

$
0
0
‘आशियातील सायकलची राजधानी’ अशी एकेकीळी ओळख असलेल्या पुण्यात आज दुचाकींमुळे बदलेले चित्र पुर्ववत आणण्याचे ध्येय आशिक जैन या आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांने निश्चित केले आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून त्याने दिल्ली ते पुणे असा सायकल प्रवास नुकताच यशस्वीरित्यापूर्ण केला. दिल्लीहून १२ डिसेंबरला निघालेला आशिक हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश या मार्गावरून प्रवास करीत २१ डिसेंबरला रात्री पिंपरीत दाखल झाला.

लोकसंख्येचा वेग सर्वाधिक, कामे कमी-अधिक

$
0
0
महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडला उल्लेख होतो. या शहराच्या लोकसंख्येत गेल्या दशकात प्रचंड वाढ झाली असून, नागरीकरणाचा वेगही कमालीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साहजिकच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे योगदान महत्त्वाचे आहे. परंतु, लोकसंख्यावाढीचा वेग पाहता तुलनेने विकासकामे मात्र कमी अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

‘गाणा-या व्हायोलिन’मागच्या हाताची गाथा...

$
0
0
ज्येष्ठ व्हायोलिनवादक,संगीतकार प्रभाकर जोग येत्या मंगळवारी (२५ डिसेंबर) वयाची ८० पूर्ण करीत आहेत. लहानपणापासून संगीताची आवड असल्याने व्हायोलिनवर फिरणा-या बोटांतून त्यांनी सुरावटींचे गाणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविले. त्यांच्या या प्रवासाविषयी...

वाहतूक प्रबोधनासाठी घेणार खासगी संस्थांची मदत

$
0
0
वाहतूक नियमांसदर्भात जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आयटी कंपन्या, कॉलेजेस आणि खाजगी संस्थांची मदत घेण्याचे ठरवले आहे. नजिकच्या काळात आयटी कंपन्या आणि कॉलेजेसच्या मदतीने वाहतूक प्रबोधन मोहीम राबवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

‘एक्स्प्रेस वे’वरील दुभाजकाची उंची कधी वाढविणार?

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील दुभाजकाची उंची अडीच फुटापर्यंत वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. ‘एक्स्प्रेस वे’वरील सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती.

अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसेंचा अपघाती मृत्यू

$
0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांच्यासह पेंडसे यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील विविध कलाकारांसह रसिकांनी या दोन कलावंतांना साश्रू निरोप दिला.

फोन खणाणले अन् आभाळ कोसळले...

$
0
0
तासाभरापूर्वी गप्पा मारून निघालेल्या अभ्यंकर-पेंडसे यांच्या अपघाती निधनाची माहिती देणारे फोन घणघणू लागले आणि दोघा अभिनेत्यांच्या सुहृदांवर आभाळ कोसळले. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना कोणत्या तोंडाने सांगावी, असा प्रश्न हॉस्पिटलमध्ये जमलेल्या सर्वांनाच पडला होता.

हरपला ‘अक्षय’ ऊर्जास्रोत....

$
0
0
त्याने केलेल्या पदार्थांची लज्जतदार चव... अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या इतर कलांमधील तबलावादनाचे कौशल्य... त्याच्या स्वभावातील नम्रता आणि मनमिळाऊपणा... त्याने साकारलेल्या विविध भूमिकांचा पट आणि ‘पिता’ म्हणून त्याच्यातून डोकावणारा मायाळूपणा...
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images