Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ विरोधात पोलिसांची मोहीम

$
0
0
महामार्गावर दारु पिऊन गाडी चालवणा-या वाहनचालकांना शोधण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून ३१ डिसेंबरपर्यंत ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ मोहिम राबवण्यात येणार आहे.

अतिक्रमण काढणा-या ‘JCB’ची तोडफोड

$
0
0
कोंढवा येथील आंबावाटिका सह्याद्री अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या कॉफी शॉपचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या महापालिकेचा ‘जेसीबी’ फोडण्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला.

अभिनयात बुद्धीपेक्षा भावना अधिक महत्त्वाची

$
0
0
‘परफॉर्मन्स’ ही बुद्धीची कला नाही, ती बुद्धीने करून चालतच नाही. त्यासाठी बुद्धी काढून ठेवावी लागते अन् भूमिकेला शरण जात तादात्म्य पावावे लागते,’ अशा शब्दांत नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी भावना व्यक्त केल्या. ‘बौद्धिक नट आणि उत्स्फूर्त अभिनय करणारा नट यातही उत्स्फूर्तताच काकणभर सरस ठरते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनातील परिसंवाद श्रोत्यांच्या शोधात

$
0
0
प्रमुख वक्त्यांची गैरहजेरी, नाट्यपरिषदेच्या संयोजकांची अनुपस्थिती अन‍् त्याचवेळी सुरू असलेल्या दुसऱ्या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ....यामुळे ‘मराठी रंगभूमी नव्या नाटकाच्या शोधात’ या परिसंवादात वक्ते आणि प्रेक्षकांचाच शोध घेण्याची वेळ रविवारी आली.

शाळा- कॉलेजात पोलिसांची पाळत ठेवणार

$
0
0
महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात महिला पोलिसांची पाळत ठेवण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.

खासगी विद्यापीठे हवीत; पण...

$
0
0
उच्च शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी खासगी विद्यापीठांची गरज आहे. मात्र, या विद्यापीठांनी केवळ नफेखोरीचीच भूमिका घेतली तर सार्वत्रिकीकरणाचा हेतू साध्य होणार नाही. उलट त्यामुळे शिक्षणातील सामाजिक समतोल कमी होईल.

रंगभूमीने झुगारावे परंपरेचे जोखड

$
0
0
‘आसपास बदलणा-या समाजाचे, व्यवस्थेचे प्रतिबिंब नाटकांत उमटले पाहिजे. मराठी रंगभूमीने परंपरेच्या जोखडांना झुगारून दिले नाही, तर राष्ट्रीय पातळीवर आपण आघाडीवर असल्याचा भ्रमाचा भोपळा फुटल्यावाचून राहणार नाही,’ असा सूर रविवारी मराठी रंगभूमी नव्या नाटकांच्या शोधात या परिसंवादात उमटला.

अपंगांनाही मिळणार आता ‘यूआयडी’

$
0
0
क्षयरोगाच्या (टीबी) पेशंटप्रमाणे आता राज्यातील कर्णबधिर, मुकबधिर, अंध तसेच हाता पायाने अंपगत्व असणा-या विविध प्रकारच्या अपंगांना आता स्वतंत्र ‘युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक’ (आयडी) मिळणार आहे. त्यामुळे सरकारी वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी होणा-या ‘एजंटगिरी’ला लगाम बसणार आहे.

अखेर आडते नमले

$
0
0
महिन्याभरापासून आठ टक्के आडतीचा हेका धरलेल्या आडत्यांनी अखेर सहा टक्के दरानेच आडत घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारची कारवाई टाळण्यासाठी आडते असोस‌िएशनने भूमिकेत बदल केला आहे.

रसरशीत द्राक्षे बाजारात

$
0
0
थंडीचा जोर वाढत असतानाच गोड, आंबट चवीच्या द्राक्षांनी फळ बाजाराचा दिमाख वाढला आहे. ‘सीझन’ सुरू झाल्याने रसदार द्राक्षे दाखल होत आहेत. एप्रिलअखेरपर्यंत पुणेकरांना त्याची चव चाखता येणार असून, पुढील महिन्यात द्राक्षाचा ‘भाव’ उतरण्याची शक्यता आहे.

सरते वर्ष ठरले मृगजळी स्वप्नांचे

$
0
0
पुण्याच्या विकासाचे नियोजन पुणे महापालिका करते आणि त्याप्रमाणे शहराच्या विकासाला दिशा देण्यासाठी सत्ताधारी कल्पक योजनांचा आधार घेतात. त्या ऐकून पुणेकर हुरळून जातात, हे ओघाने आलेच. यंदाचे वर्षे हे तर पुणेकरांसाठी मृगजळी स्वप्नांचे ठरले. कारण नजरेत भरावी अशी एकही योजना प्रत्यक्षात अवतरलेली दिसली नाही. ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, जेऊनिया अतृप्त पुणेकर राहिले...अशी पुण्याची अवस्था झाली.

१० हजारांचे ब्राउन शुगर जप्त

$
0
0
पाटील इस्टेटमध्ये ब्राउन शुगरची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून साडे दहा हजार रुपयांच्या ब्राउन शुगरच्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या राजकारणात नवी पिढी

$
0
0
शहराच्या वेगवेगळ्या स्तरांवरील राजकारणात जुन्या दिग्गजांना धक्का देऊन नव्या पिढीचा उदय होत असल्याची चाहूल सरत्या वर्षाने दिली. कदाचित याच संक्रमणकाळाच्या पोकळीमध्ये शहराला सध्या एकमुखी नेतृत्वाची उणीव भासत असावी. आता नव्या वर्षात तरी संपूर्ण शहराला बरोबर घेणारे आणि पुढे घेऊन जाणारे नेतृत्व लाभणार का, याबाबत उत्सुकता आहे.

अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन

$
0
0
‘दुनियादारी’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण आटपून, पुण्याहून मुंबईकडे येत असताना प्रसिध्द अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील तळेगाव टोलनाक्याजवळ रात्री ११.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात पेंडसे यांच्या दीड वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला.

अभ्यंकर,पेंडसे अनंतात विलीन

$
0
0
प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘मला सासू हवी’ या मालिकेत सासूची भुमिका करणा-या आसावरी जोशी यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

पाटील यांचा अपघाती मृत्यू

$
0
0
मुंबई-पुणे इंटरसिटीच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे काका शांताराम गिरीधर पाटील (वय ८०, रा. बिजलीनगर) यांचे निधन झाले.

कात्रज शून्य कचरा प्रकल्पासाठी विशेष ‘वॉक’

$
0
0
सार्वजनिक कच-याचे वर्गीकरण आणि ओला कचरा जिरविण्यासाठी येणा-या सर्व समस्यांवर मात करून कात्रज वॉर्ड क्रमांक १४१ने ‘शून्य कचरा प्रकल्प’ यशस्वी केला आहे. शहराच्या विविध भागांतील नागरिक आणि संस्थांनी या प्रकल्पाला भेट देऊन अनुकरण करावे, यासाठी जनवाणी संस्थेने दर शुक्रवारी विशेष ‘वॉक’ आयोजित केले आहेत.

ससूनला दहा कोटींचा निधी लवकरच

$
0
0
ससून हॉस्पिटलच्या अत्याधुनिकीरणासाठी राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिलेल्या १७ कोटींपैकी दहा कोटींचा निधी ससूनला लवकरच मिळणार आहे. त्यामुळे वॉर्डचे नूतनीकरण, स्वच्छतागृहे, ऑपरेशन थिएटर नव्याने केली जाणार आहेत.

थकबाकीदारांना महावितरणचा दणका

$
0
0
वीजबिलांच्या थकबाकीदारांच्या विरोधात आता महावितरणने कठोर पावले उचलली असून थकबाकीदारांचे वीजमीटर आणि सर्व्हिस वायर काढून जमा करण्याची कारवाई राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे.

पार्ट्यांवर करडी नजर

$
0
0
‘डर्टी पार्टी’ आणि ‘चिल्लर पार्टी’च्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणा-या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. विनापरवाना पार्ट्या आयोजित करणा-यांबरोबरच अल्पवयीन मुलांना मद्याची विक्री करणा-या आयोजकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images