Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कच-यामुळे घटले परदेशी पक्षी

0
0
‘अतिथी देवो भवः’ ही आपली संस्कृती असली तरी हजारौ मैलांचा प्रवास करून कवडीपाट येथे येणा-या पक्ष्यांना आता ‘अतिथी येऊ नका बरं’ असे म्हणायची वेळ आली आहे. प्लॅस्टिकचा कचरा, निर्माल्य, फाटके कपडे आणि कच-याने दूषित झालेला कवडीपाट जलाशय म्हणजे पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. त्यामुळे या वर्षी अत्यंत कमी संख्येने पक्षी जलाशयात वास्तव्यास आले आहेत.

मराठा आरक्षण; आठवलेंचा पाठिंबा

0
0
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला ‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी पाठिंबा दिला. या मागणीबाबत सरकारने चालढकल केल्यास प्रजासत्ताक दिनानंतर ‘आरपीआय’ रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यभर मराठा आरक्षण परिषद घेणार असल्याचे सांगत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

सरावादरम्यान जवानाचा मृत्यू

0
0
धावण्याचा सराव करणा-या राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) ग्रुप एकमधील जवानाचा शनिवारी बेशुद्ध पडून मृत्यू झाला. हडपसर येथील रामटेकडी मैदानावर शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला, असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

कायदे कठोर करण्याची गरजः अण्णा

0
0
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तरुणाई रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. अशा खटल्यांचा फास्टट्रॅक कोर्टात लवकरात लवकर निकाल लागावा अशी मागणी अण्णांनी केली आहे.

कच-याच्या डब्यापासून परदेशी वाद्यांची तालजत्रा

0
0
कच-यातून उचललेल्या डब्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक पॅडपर्यंत आणि श्वासापासून ते परदेशी वाद्यांपर्यंत जवळपास प्रत्येक गोष्टीतून तालनिर्मिती होत होती... या तालनिर्मितीवर प्रत्येकजण बेहोश होत होता आणि टाळ्या-शिट्ट्यांची मनमुराद दाद देत होता. उस्ताद तौफिक कुरेशींचा बँड, महान संगीतकार ग्रेग एलिस आणि तालाचा जादूगार शिवमणी या तालवेड्यांनी केलेल्या वादनातून तालबहाराची निर्मिती झाली होती.

‘राज्याला गरज निर्णयक्षम राजकारण्यांची’

0
0
राज्यात सुरू असलेल्या ‘पॉप्युलिस्ट पॉलिटिक्स’मुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ती सुधारण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये निर्णयक्षम लोकांची गरज आहे. हे लक्षात घेता, समाजासाठी काम करण्याची इच्छा मनात असलेल्या निर्णयक्षम राजकारण्यांच्या आधारेच राजकारणातून परीवर्तन होण्याची शक्यता असल्याचे मत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केले.

ग्रामपंचायतींमध्ये ८५ टक्के मतदान

0
0
जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी सुमारे ८५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान भोर तालुक्यातील निवडणुकीत झाले असून हवेलीमध्ये सर्वात कमी मतदान झाले.

मेव्हणीसह जिजाजींची आळंदीजवळ आत्महत्या

0
0
आळंदीजवळील एका लॉजमध्ये मेव्हणीसमवेत पुरूषाने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी कुठलिही सुसाईड नोट सापडली नसून त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास विश्रांतवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.

इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना मिळणार ‘ड्युएल डिग्री’

0
0
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये ‘अॅडिशनल डिग्री’ची तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार, एका स्पेशलायझेशनमध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एक वा दोनच वर्षांत दुस-या स्पेशलायझेनशमध्येही इंजिनीअरिंगची डिग्री घेता येईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या सोयीचा लाभ घेता येणार आहे.

मूकबधीर युवकांचा आत्मनिर्भरतेचा ‘फाइव्हस्टार’ हुंकार

0
0
ते दोघेही खूप हुषार, प्रशिक्षित, उत्तम आकलनक्षमता लाभलेले. परंतु, बोलण्या-ऐकण्याची क्षमता नसल्याने त्यांना नोकरी मिळेल की नाही, याची धास्ती होती. परंतु, ‘मॅरिएट’ या तारांकित हॉटेलने त्यांना कामाची संधी दिली आणि त्यांनी तो विश्वास सार्थही ठरवला!

मुख्यमंत्र्यांची जानेवारीत पुण्याच्या प्रश्नांविषयी बैठक

0
0
पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या जानेवारीमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी रविवारी दिली. पानशेत पूरग्रस्त, झोपडपट्ट‌ी पुनर्वसन आणि वाहतूक या विषयांवर चर्चा होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आणखी संशयितांचा तपास जोरात

0
0
जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटांतील चार संशयितांकडे मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मुख्यालयात कसून चौकशी करण्यात येत आहे. साखळी स्फोट घडवून आणण्यासाठी आणखी काही संशयितांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

एसटी ई-तिकिट रद्द करण्यास ४ तास

0
0
इंटरनेटद्वारे काढलेल्या तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी प्रशासनाने तिकीट रद्द करण्याचा कालावधी प्रवासाअगोदर चार तासावर आणला आहे. येत्या २४ डिसेंबरपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

इंजिनीअरसह कारचालकावर खुनी हल्ला

0
0
कंपनीच्या साहेबांना आणण्यासाठी विमानतळावर जात असलेल्या कंपनीच्या इंजिनीअरला आणि कारचालकाला मारहाण करून, त्याला चाकूने भोसकल्याची घटना भोसरी-आळंदी रस्त्यावर शनिवारी (२२ डिसेंबर) रात्री घडली. जखमीने एका दुचाकीस्वाराकडे मदत मागितली असता, तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात त्याने त्यांना वायसीएममध्ये पोचवले. मात्र, जखमीने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याच्या हातातील दोन मोबाइल घेऊन मदतकर्ता पळून गेला.

स्वतःला पेटवून ट्रकचालकाची आत्महत्या

0
0
पेट्रोलपंपावरून बादलीत आणलेले डिझेल अंगावर ओतून घेऊन एका ट्रकचालकाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर रहाटणी येथे ही घटना घडली. भास्कर उर्फ पप्पू रामराव सानप (वय २६, रा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

लग्नसराईमुळे भाज्यांची ‘सरबराई’

0
0
लग्नसराई आणि नाताळच्या तोंडावर भाज्यांना जोरदार मागणी आहे. त्यामुळे मुबलक भाज्या उपलब्ध झाल्या असल्या तरीही बहुतेक भाज्यांचे भाव टिकून आहेत. बटाटा महाग झाला आहे; तर कांद्याच्या भावात किलोमागे पाच रुपयांची घट झाली आहे. पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

सरकार, नाट्य परिषदेला चालना देणे हेच फलित

0
0
‘नाट्यसंमेलन म्हणजे केवळ उत्सव आणि‌ जत्रा नव्हे तर माझे कलावंतांवर, नाटककारांवर, दिग्दर्शकांवर प्रेम आहे हे नाट्यरसिकांनी उघडपणे दाखवून देण्याची जागा आहे.

मानसनीती, समाजविज्ञान शाखेचे निकाल मुदतीआधी

0
0
‘पुणे विद्यापीठाच्या मानसनीती आणि समाजविज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणा-या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल मुदतीच्या आधीच जाहीर होणार आहेत,’ अशी माहिती विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गौतम भोंग यांनी दिली.

श्रेणीसुधार दोनदा?... आम्हाला माहीत नाही!

0
0
श्रेणीसुधार योजनेचा दोनदा लाभ घेण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब न झाल्याने मार्च २०१३ला श्रेणीसुधार परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारायचे की नाही, असा प्रश्न राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळांना पडला आहे. दुसरीकडे, अर्ज स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

विमा व्यावसायिक डॉक्टर मानधनापासून वंचित

0
0
विविध कंपन्यांसह कारखान्यांत काम करणा-या कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना उपचारसेवा देणा-या विमा व्यावसायिक डॉक्टरांना मात्र निधीच्या ‘लसी’पासून वंचित ठेवण्यात आले आहे. एप्रिल महिन्यांपासूनचे त्यांचे वेतन थकल्याने वारंवार आंदोलन करूनही आरोग्य खात्याला जाग येईना, अशी टीका करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images