Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ड्रील मशिन’च्या खरेदीची होणार चौकशी

0
0
राज्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये होणा-या हाडांच्या ऑपरेशनसाठी वापरण्यात येणा-या उपकरणांची बाजारातील किंमतीपेक्षा जादा दराने खरेदी झाल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्याच्या आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी शनिवारी दिले.

‘भारताची प्रगती काँग्रेसमुळेच’

0
0
स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरही वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने प्रगतीची भरारी घेतली, त्या प्रगतीचा पाया काँग्रेसनेच घातला, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी सांगितले.

ग्राहकांच्या हक्कांसाठी झगडणारे ग्राहक मंचच निराधार

0
0
ग्राहकांच्या तक्रारी सोडण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ४० जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचांपैकी तब्बल ३४ जिल्हा ग्राहक मंच अध्यक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. या मंचांवरील ५३ सदस्यांच्या जागाही रिक्त असून, ग्राहकांच्या हक्कांविषयी शासनाच्या उदासीन धोरणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी शनिवारी केला.

नाटकात समाजाला एकत्र आणण्याचे सामर्थ्य

0
0
आपल्या शिक्षणपद्धतीत समाजाचं विघटन करणा-या गोष्टी आहेत. शिकून डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट तयार होतात. आपापले गट तयार करतात आणि आपापल्या गटाचा विचार करतात. आपण या विघटन करणा-या गोष्टींकडून समाजाला एकत्र आणणा-या गोष्टींकडे गेले पाहिजे.

‘ग्रेड सेपरेटर’च्या कामास पुरातत्व खात्याचा आक्षेप

0
0
जंगली महाराज रस्त्यावर स. गो. बर्वे चौकात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला पुरातत्व खात्याने आक्षेप घेतल्याची माहिती शनिवारी समोर आली आहे. दरम्यान, या कामासाठी पुरातत्व विभागाशी पूर्वीच संपर्क साधण्यात आला असून, सार्वजनिक हितासाठी हे काम सुरू असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

‘संमेलनात मांडणार उपेक्षितांचे प्रश्न ’

0
0
चिपळून येथे भरणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर समाजातील उपेक्षितांचे प्रश्न मांडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शनिवारी सांगितले.

अ‌नधिकृत बांधकामांवर धायरीत हातोडा

0
0
सिंहगड रोडवरील धायरी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर शनिवारी महापालिकेचा हातोडा पडला. या कारवाईत या परिसरातील सहा मोठ्या इमारती भुईसपाट करण्यात आल्या.

वाघोली दुर्घटनेप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

0
0
वाघोली येथील पंचकर्म हॉस्पिटलचे बांधकाम पडून १३ मजुरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना शनिवारी सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

‘कार्डिअॅक अरिथमिया’च्या पेशंटला दिलासा

0
0
स्नायूंच्या अनियंत्रित आकुंचनामुळे निर्माण होणा-या हृदयाच्या ठोक्यांचा वेग व नियमितता यांच्यातील बदलांचे निदान व उपचार करणारे तंत्रज्ञान ‘एन. एम. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी’मध्ये उपलब्ध झाले आहे. यामुळे ‘कार्डिअॅक अरिथमिया’सारख्या पेशंटला मोठा फायदा होणार आहे.

दो बिघा जमीन...

0
0
बलराज साहनी यांचा ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट कोणी पहिला असेल, तर त्याला सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन सोडविण्यासाठी काय किंमत मोजावी लागली होती हे कळते. साठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाची कथा आजच्या स्थितीत जशीच्या तशी लागू होते. यात फक्त बदलले आहे ते कथानक आणि खलनायक. नायक असलेला शेतकरी तसाच पिचलेला आणि चक्रव्युहात अडकलेला आहे.

कोरड्या विहिरी, उरते फक्त पायपीट...

0
0
सांगली जिल्ह्यातील गोटी बुद्रुक (ता. खानापूर) गावात चाळीसहून अधिक विहिरी असल्या, तरी सगळ्या कोरड्या ठणठणीत आहेत. पिण्यासाठी तीन किलोमीटरवरील विहिरीवरून पाणी आणावे लागते. पाण्यासाठीची पायपीट बायांच्या नशिबी गोंदली आहे.

अफवांचा महाप्रलय

0
0
नैबरू नावाचा एक ग्रह सापडला असून, तो पृथ्वीवर आदळून २००३ मध्ये पृथ्वी नष्ट होईल असे भाकीत कोणी तरी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केले होते. २००३ ला काहीच घडले नाही. मग या घटनेसाठी पुढची तारीख निश्चित करण्यात आली. माया संस्कृतीच्या कालमापनाचा शेवटचा दिवस म्हणजे २०१२ चा उत्तरायणाचा दिवस. तिथूनच २१ डिसेंबर २०१२ ही पृथ्वीच्या अंताची तारीख निश्चित करण्यात आली...

हँग दी रेपिस्ट्स...

0
0
वी वॉन्ट जस्टीस, हँग दी रेपिस्ट्स... ऑल वी वॉन्ट इज डेथ फॉर रेप... व्हीआयपी सुरक्षा बंद करो, आम आदमी को सुरक्षा दो... हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है... फाँसी दो, फाँसी दो, बलात्कारी को फाँसी दो...

गोठ्याला आग, २३ शेळ्यांचा मृत्यू

0
0
खेड तालुक्यातील टाकळकरवाडी येथील गोठ्याला लागलेल्या आगीत २३ शेळ्या भाजून मृत्यूमुखी पडल्या. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. टाकळकरवाडी येथील शेतकरी बाळासाहेब सांडभोर (वय- ६०) यांच्या शेतातील कुडाच्या शेडमध्ये २६ लहान-मोठ्या शेळ्या व एक गाय बांधलेली होती. रात्री अचानक गोठ्याला आग लागली. शेळ्या व गाय बांधलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना गोठ्याबाहेर पडता आले नाही.

साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दडपण

0
0
किरण सूर्यवंशी खून खटल्यातील आरोपी बाळू वाघिरे विरुद्ध साक्ष देण्यासाठी मनाई करुन साक्षीदारांना मारहाण करणा-या दोघांना कोर्टाने प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी हा निकाल दिला.

मिळकतकरातील वाढ हा तुघलकी कारभार

0
0
पुणेकरांना गेल्या दहा महिन्यांपासून केवळ एकवेळ पाणी मिळत असतानाही प्रशासनाने पाणीपट्टीत सुचविलेली वाढ म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

0
0
जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होणार असून या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.२४) होणार आहे. मतदानासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काळजी नको कायदा हवा

0
0
घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी येईपर्यंत प्रत्येक मुलीच्या किंवा स्त्रीच्या मोबाइलवर तिची चौकशी करणारे एसएमएस किंवा फोन अखंड सुरू होतात. का?..तर ती कुठे आहे आणि काय करतेय यापेक्षा ती सुरक्षित आहे ना, याचीच खात्री करण्याची जणू आता सवयच झाली आहे. इतके का आपण आपल्याच शहरात, समाजात असुरक्षित आहोत. हा प्रश्न मनाला सतावतो आहे.

खिसमसच्या ‘सेलिब्रेशन’ची तयारी

0
0
शांततेचे प्रतिक असलेल्या चांदण्या, बेल्स, सांताक्लॉजच्या प्रतिकृती, आकर्षक आकारातील दिवे, रोषणाईने सजलेली दुकाने, हॉटेल्स, वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पेस्ट्रीज, प्लम केक आणि चॉकलेटस घेऊन सज्ज झालेल्या बेक-या आणि रस्त्याच्या दुतर्फा सांताच्या टोप्या, फुगे घेऊन फिरणा-या फेरीवाल्यांमुळे पुण्यात सध्या ख्रिसमस सेलिब्रेशन मूड पाहायला मिळतो आहे.

उद्वेगासोबतच मॅच्युरिटी हवी...

0
0
दिल्लीतील गँगरेपनंतर महिला अत्याचारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘महानगरांत महिला सुरक्षित नाहीत,’ हा या घटनेकडे पाहण्याचा फेमिनाइन दृष्टिकोन योग्यच असला, तरी तो संपूर्ण समाजापुढे उभ्या राहिलेल्या प्रश्नांच्या चक्रव्यूहाचा एक भाग आहे. त्यामुळे केवळ महिलांच्या अँगलमधून या विषयाकडे पाहणे पुरेसे ठरणार नाही, तर त्यापलीकडे होलिस्टिक अॅप्रोच ठेवून पाहिले, तरच शाश्वत उपायांचा मार्ग दिसू शकेल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images