Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डंपरच्या धडकेत महिला पादचारी ठार

$
0
0
डंपरने पादचाऱ्याला चिरडल्याची घटना मुंढवा येथील महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. उषा हरिश्चंद्र जाधव (वय ५५, रा. गवळी आळी) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तीन महिन्यांत ‘सीसीटीव्ही’

$
0
0
सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे शहर आणि प‌िंपरी चिंचवड परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.

शिक्षणाधिकारी हक्कासाठी जागे होतात तेव्हा...

$
0
0
पटपडताळणीपासून शिक्षण हक्कापर्यंत नोंदींचे कागदी घोडे नाचविणारी शिक्षणव्यवस्था जागृत झाल्यानंतर शाळा प्रशासन कसे धारेवर धरले जाते, याचा धडा शुक्रवारी पुण्यात दिला गेला.

पुण्यातून उजनीला पाणी अशक्य

$
0
0
पुण्यातील धरणांतून सोलापूरसाठी पाच टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याची मागणी मान्य करणे अशक्य असल्याचे उच्चपदस्थ अधिकाने स्पष्ट केले. पुण्यातील धरणांतच पाणी कमी असताना उजनीला पाणी सोडणे व्यवहार्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘बीएसयूपी’चे १८ कोटी सरकारला परत जाणार

$
0
0
केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ अंतर्गत शहरी गरीब नागरिकांसाठी (बीएसयूपी) २० हजार घरे बांधली जाणार होती. परंतु, जागेच्या अनुपलब्धतेमुळे केवळ चार हजारच घरे बांधली गेल्याचे स्पष्ट करत, योजनेचे १८ कोटी रुपये सरकारला परत करावे लागणार असल्याची कबुली महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी दिली.

जुन्या ग्रंथांचे पुर्नप्रकाशन कौतुकास्पद

$
0
0
‘ज्ञानदान हे सर्वात मोठे कार्य आहे. ग्रंथप्रकाशनातून हे कार्य साध्य होते. जुन्या ग्रंथांचे पुर्नप्रकाशन करून पुणे मराठी ग्रंथालयाने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे मत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

‘पीएमपी’चे संचालक केवळ कागदोपत्रीच

$
0
0
संचालक मंडळाच्या बैठकीला केवळ चहा-पाण्यासाठी बोलाविले जाते..., धोरणात्मक निर्णय ‘केवळ माहितीसाठी’ संचालक मंडळापुढे ठेवला जातो..., संचालकांचा विरोध डावलून प्रशासन कार्यवाही करते... त्यामुळे आम्ही संचालक आहोत, ते फक्त ‘कागदोपत्री’...

निवृत्त कर्नलने केला पत्नीचा खून

$
0
0
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला मारहाण करून खून केल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथे गुरुवारी उघडकीस आला. या निवृत्त अधिकाऱ्याने ३२ वर्षांपूर्वी आपल्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नाचा राग काढण्यासाठी पत्नीला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाजत-गाजत घुमला ‘डमरू’चा नाद !

$
0
0
एकमेकांकडे पाहून केलेले एक ओझरते हसू आणि पुढच्याच क्षणी वाद्यांचा झालेला एकच कडकडाट! घट्टम्, खंजिरा, मोरसिंग आणि मृदंगम् यांच्या स्वरनिनादाने ‘डमरू फेस्टिव्हल’ वाजत-गाजत रंगू लागले.

नाल्यांजवळतच्या इमारतींना ‘अॅप्रोच रोड’ बंधनकारक

$
0
0
नाले साफसफाईसाठी पालिकेची यंत्रणा, मशिनरी जागेवर पोहोचण्यासाठी अडथळा येऊ नये, या साठी नाल्यांशेजारी बांधण्यात येणाऱ्या इमारतींना यापुढे स्वतंत्र ‘अॅप्रोच रोड’ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मिळकतकरातील वाढ हा तुघलकी कारभार

$
0
0
पुणेकरांना गेल्या दहा महिन्यांपासून केवळ एकवेळ पाणी मिळत असतानाही प्रशासनाने पाणीपट्टीत सुचविलेली वाढ म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आला आहे.

काचा पारदर्शक ठेवाः पोलीस

$
0
0
नवी दिल्ली येथे बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. शहरातील खासगी बस आणि चारचाकी वाहनांच्या काचांवरील काळी फिल्म (टिंटेड ग्लासेस) काढण्याची मोहीम राबविण्यात येत असून, मागील दोन दिवसांमध्ये १,२२८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

पाईपलाईन फुटली, वाहतूक अडली

$
0
0
शिवाजीनगर परिसरातील स. गो. बर्वे चौकात शुक्रवारी सकाळी पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे रस्ता खचला. परिणामी, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, गणेशखिंड रोडसह संपूर्ण उत्तर पुण्यातील वाहतुकीचा दिवसभर बोजवारा उडाला

पीएमपीच्या खासगीकरणाला ‘ब्रेक’

$
0
0
जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेअंतर्गत दोनशे बस भाडेकराराने चालविण्यास देण्याच्या व्यवहारात आक्षेपार्ह आणि संशयास्पद बाबी असल्याने हा करार तातडीने रद्द करावा, अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालकांनीच केली आहे.

पुण्यातील महिला असुरक्षितच

$
0
0
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही महिला असुरक्षितच असल्याची भावना व्यक्त करत शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.

ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

$
0
0
जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी थंडावली. या निवडणुकीसाठी आता रविवारी (२३ डिसेंबर) मतदान होणार आहे. हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी शिवाजीनगर येथील शासकीय गोदामात होणार आहे.

१३ मजुरांचा मृत्यू: तिघांना अटक

$
0
0
वाघोली येथील पंचकर्म हॉस्पिटलचे बांधकाम पडून १३ मजुरांच्या मृत्युप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाट्य संमेलनाला आज सुरुवात

$
0
0
येथे आजपासून (२२ डिसेंबर) ९३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाला सुरुवात होत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमलेनाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे असतील. ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. मोहन आगाशे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

‘डमरू’ने धरला फ्युजनचा ताल!

$
0
0
पारंपरिक गोवन संगीताचा बाज, त्याला लॅटिन ड्रमिंग आणि पर्कशनची उत्तम साथ... हा अनोखा ‘फ्युजन’ मेळ साधला होता, गोव्याच्या प्रसिद्ध संगीतकार बाँडो फर्नांडिस आणि त्याच्या साथीदारांनी... या फ्युजनची प्रेक्षकांवरची मोहिनी कमी होत नाही, तोच प्रसिद्ध तबला वादक तलवीन सिंग यांनी इलेक्ट्रॉनिक संगीतावर तबल्याचा ताल धरला.... त्यानंतर विक्कू विनायकराम यांच्या घट्टम वादनाने तर मैफलीची रंगत आणखीनच वाढवली...

‘पीएमपी’ने केले टेंडर रद्द

$
0
0
‘पीएमपी’ला भाडेतत्त्वावर पाचशे बस घेण्यासाठी काढण्यात आलेले टेंडर दर परवडणारे नसल्याने, तातडीने रद्द करण्यात आल्याची माहिती ‘पीएमपी’च्या वतीने शनिवारी देण्यात आली. दरम्यान, पीपीपी तत्त्वावर दोनशे बसेस संचलनात आल्यामुळे पीएमपीचा प्रतिकिलोमीटर दर कमी होणार आहे, असे महामंडळाने म्हटले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images