Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाघोली दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव

$
0
0
वाघोलीमधील पंचकर्म हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला पाठविला आहे. पंचकर्म हॉस्पिटलच्या घुमटाची स्लॅब भरण्याचे काम सुरू होते.

संमेलनातील घोषणांची प्रत्यक्ष ‘एन्ट्री’ केव्हा?

$
0
0
संमेलनाच्या निमित्ताने राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत घोषणांचा पाऊस पाडला असला, तरी त्यातील योजना प्रत्यक्षात उतरताना दिरंगाईच होत आहे. त्यामुळे, बारामतीत येत्या शनिवारपासून (२२ डिसेंबर) सुरू होणा-या संमेलनात सरकारतर्फे जाहीर केल्या जाणा-या घोषणांवरचा पडदा बाजूला सारला जाणार का, याचे उत्तर नाट्यप्रेमींना हवे आहे.

वृद्ध व्यक्तीचा खून करणा-याला जन्मठेप

$
0
0
किरकोळ वादातून एका वयोवृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी हा निकाल दिला. रंगोबा भैरु दामगुडे (वय ५३, रा. मोहडे बुद्रक, भोर) असे शिक्षा सुनाविण्यात आलेल्याचे नाव आहे. रामचंद्र सगू दामगुडे या व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी रामचंद्र यांचा मुलगा विठ्ठल (५२) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळकतकरात ८ टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव

$
0
0
मिळकतकरामध्ये आठ टक्के वाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने स्थायी समितीपुढे सादर केला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे.

शहरात ५ प्रभागात पाण्यासाठी मीटर

$
0
0
पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाच प्रभागांमध्ये राबवण्यात येणा-या समान पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. या अहवालानुसार पाच प्रभागांसाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च येणार असून, येथील रहिवाशांना मीटरद्वारे कनेक्शन देण्यासाठी कमीत कमी २७ हजार रुपये, तर जास्तीत जास्त ३३ हजार रुपये खर्च येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

४ आरोपींना १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेल्या चार आरोपींचा ताबा पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडे गुरुवारी कोर्टात सोपविण्यात आला. आरोपींना कोर्टाने एक जानेवारी २०१३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी हा आदेश दिला.

‘कॅरल सिंगिंग’ देतोय आनंदानुभव

$
0
0
ख्रिसमसच्या मुख्य सेलिब्रेशनचा जल्लोष चार दिवसांवर येऊन ठेपला असताना, कॅम्प परिसरात उत्सवी उत्साहाचे वातावरण असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून ख्रिश्चन समाजात सोमवारपासूनच सण साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. कॅम्प भागासह शहराच्या मध्यवर्ती भागातील चर्चची रंगरंगोटी पूर्ण झाली असून, सध्या आकाशकंदिल आणि रंगबिरंगी दिव्यांच्या रोषणाईची लगबग सुरू आहे. रविवारपासून सामूहिक प्रार्थनेला सुरुवात होणार आहे.

भाऊबीज निधी तब्बल ४९ लाखांचा

$
0
0
कुणी सत्तर वर्षांचे आजोबा, कुणी वृद्धाश्रमात राहणा-या आजी, कुणी आठवी किंवा अकरावीची विद्यार्थिनी...गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी अशा अनेक स्वयंसेवकांनी कष्टपूर्वक जमविलेला तब्बल ४९ लाख रुपयांहून अधिक ‘भाऊबीज निधी’ गुरुवारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.

‘पेन्शनरांचे प्रश्न संपलेले नाहीत’

$
0
0
‘पेन्शनरांच्या पेन्शनचा प्रश्न सुटला असला, तरी त्यांचे प्रश्न अद्याप संपलेले नाहीत. अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी त्यांनी संघटित राहायला हवे,’ असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी बुधवारी येथे केले. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनतर्फे राज्यातील विविध सेवानिवृत्त कार्यकर्त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर लोकुर, कार्याध्यक्ष सूर्यकांत मोरे, अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

महिलांवरील अत्याचाराच्या ४६ हजार घटना

$
0
0
गेल्या तीन वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या राज्यात ४६ हजार ५१३ घटना घडल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत दिली. तसेच पोलिसांच्या अहवालाप्रमाणे या काळात ४० हजार ५१६ बालके हरविल्याचे आढळून आले आहे.

इच्छाशक्तीच्या ‘लशी’विना जनता ‘अशक्त’

$
0
0
बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यावर पालिकेच्या सभागृहात दिवसभर नव्हे, तर कित्येक दिवस चर्चा झडतात. मात्र, चाळीस लाख पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आरोग्याच्या प्रश्नांवर सभागृहात वर्षातून किती वेळा, किती तास चर्चा होते हा संशोधनाचाच विषय ठरावा. त्यातूनच लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची आरोग्याविषयी किती अनास्था आहे, हे स्पष्ट होते.

आडत्यांवरील निलंबनाची कारवाई अडली

$
0
0
जुन्या दराने आडत घेणा-या मार्केट यार्डातील आडत्यांवरील परवाने निलंबनाची कारवाई पुन्हा लांबणीवर पडली. बाजार समितीच्या कारवाईला येत्या दोन जानेवारीपर्यंत कोर्टाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. कारवाई लांबणीवर पडली असली तरी, ती अटळ असल्याचे पणन खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

कर्वेनगरात भरतोय रस्त्यावरच बाजार

$
0
0
कर्वेनगरमधील वनदेवी मंदिरासमोरील वर्दळीच्या रस्त्यावरच आता बाजार भरू लागला आहे. विशेष, म्हणजे टेम्पोमधून भाज्यांची विक्री केली जाते. स्वस्तात ताजी भाजी मिळत असल्याने लोकांची गर्दी होत आहे. परिणामी, फूटपाथच नव्हे तर, वर्दळीचा रस्ताही या बाजारामुळे व्यापला जात आहे. वनदेवी मं‌दिरासमोरील रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते.

रंग बदलणारे घड्याळ महाग पडले

$
0
0
सोलर सेन्सर बसवलेले घड्याळ आहे...दोन तासांनी पट्ट्याचा आणि डायलचा रंग बदलेल... सेल्सगर्लच्या या सांगण्यावरून एका कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी ही घड्याळे घेतली खरी, पण त्याचा रंगच न बदलल्याने आपण फसल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.

स्वाइन फ्ल्यूने मुलीचा मृत्यू

$
0
0
तीन वर्षाच्या मुलीला स्वाइन फ्ल्यूच्या आजाराचा संसर्ग झाल्याने तिचा बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. आशिबा राजेश नायर (विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, कुसेगाव लोणावळा) असे या मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. बारा डिसेंबरला तिच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात तिला लागण झाल्याचे निदान झाले.

बापलेकाविरोधात विनयभंगाची तक्रार

$
0
0
मैत्रिणीने बोलावले आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होण्यासारखे वर्तन केल्याच्या आरोपावरून वडील आणि मुलाविरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडीतील ऑरबिट सोसायटीजवळ बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एका महिलेने विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

पुणे झाले बेकायदा बांधकामांचे शहर

$
0
0
शहरात विविध प्रकारचे मिळून तब्बल तीस लाख चौरस फुटांची पावणेतीन हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे उभी राहिली असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यापैकी १३ लाख चौरस फुटांवरील बांधकामांवर महापालिकेने आतापर्यंत कारवाई केली आहे.

कशी साधली मोदींनी हॅट्‍ट्रिक?

$
0
0
गुजरात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; तसेच भारतीय जनता पक्ष यांची प्रयोगशाळा आहे, या राष्ट्रीय स्तरावर व्यक्त होणा-या मतावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा, स्वबळावर पाचव्यांदा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लागोपाठ तिस-यांदा सत्ता काबीज करून भाजपने मक्तेदारी सिद्ध केली आहे.

डोंगरवाडीत ‘नो रॉकेल झोन’

$
0
0
सांगली जिल्ह्यातील डोंगरवाडी (ता.वाळवा ) गावाने गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ गावात किंवा घरात रॉकेलच येऊ दिलेले नाही. गावाने श्रद्धेपोटी हा पायंडा पडला आहे. सध्या गॅसनंतर रॉकेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. खेड्यात तर लाकडांच्या वापरानंतर अनेक ठिकाणी रॉकेल वापरले जाते.

बारामतीत मुलीवर बलात्कार

$
0
0
इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली असून, पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतल आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images